आजचे चित्रपट निबंध मराठी | AAJCHE CHITRAPAT ESSAY IN MARATHI

आजचे चित्रपट निबंध मराठी | AAJCHE CHITRAPAT ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “आजचे चित्रपट निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये AAJCHE CHITRAPAT ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • वैविध्यपूर्ण चित्रपट
  • दर्जेदार चित्रपट
  • मनोरंजनाचे साधन
  • चित्रपटाचे परिणाम (चांगले-वाईट)
  • चित्रपट निर्मितीत येणारा पैसा व त्याचे परिणाम

आजचे चित्रपट निबंध मराठी | AAJCHE CHITRAPAT ESSAY IN MARATHI

आपले अनेक चित्रपट गल्लाभर आहेत, यात शंकाच नाही. प्रचंड हिंसा, भडक शृंगार, दणदणाट असलेले संगीत, आलिशान घरे, आलिशान गाड्या, वेगवेगळ्या देशांतील दृश्ये यांनी हे चित्रपट भरलेले असतात. खूप लोकांना ते आवडतात.

मात्र, अलीकडे भारतीय चित्रपट प्रगल्भ होऊ लागला आहे. एकापाठोपाठ एक उत्तम दर्जाचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

‘ब्लॅक’, ‘पिकू”, ‘रंग दे बसंती’, ‘लगान’, ‘स्वदेश’, ‘तारे जमीन पर’, ‘दंगल’ यांसारखे विविध सामाजिक समस्या हाताळणारे व बदलते समाजमानस समर्थपणे प्रकट करणारे उत्तमोत्तम चित्रपट येत आहेत. हेराफेरी सारखा निखळ मनोरंजनात्मक चित्रपटही भारतीय चित्रपट दर्जेदार बनत असल्याची साक्ष देतो.

मध्यंतरी मराठी भाषेत ग्रामीण तमाशाप्रधान किंवा सामान्य पातळीवरील एकाच छापाचे मनोरंजनपर चित्रपट निघत असत, पण आजकाल आधुनिक समाजजीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट मराठीत येऊ लागले आहेत. अनेक ज्वलंत व वैविध्यपूर्ण विषय मराठी चित्रपटांतून हाताळले जाऊ लागले आहेत.

‘श्वास ‘, ‘चेकमेट’, ‘वळू’, ‘देऊळ’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ‘एन्टरटेनमेट ‘दुनियादारी’, ‘व्हेन्टिलेटर’ यांसारख्या मराठी चित्रपटांनी प्रादेशिक चित्रपटही जागतिक दर्जाचे बनू शकतात, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे लगान’, ‘श्वास’ यांसारख्या चित्रपटांनी ‘ऑस्कर’ पारितोषिकांच्या स्पर्धेत पडक मारली तेव्हा सर्व भारतीय अभिमानाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

प्रचलित पद्धतीनुसार चित्रपट निर्मितीला खूप-म्हणजे अक्षरश: अब्जावधी रुपये खर्च येतो. निर्मात्याला अनेक लोकांकडून पैसे घ्यावे लागतात. हे पैसे देणारे लोक विविध प्रकृतीचे असतात. भ्रष्टाचारी असतात. राजकारणी असतात, तसेच गुन्हेगारी क्षेत्रातलेही असतात.

पैसे दिल्यामुळे या लोकांचा प्रत्यक्ष चित्रपटात हस्तक्षेप सुरू होतो. कथानक कोणते असावे, त्याचे चित्रीकरण कोठे करावे, कोणते कलाकार घ्यावेत वगैरे बाबतींत ही माणसे ढवळाढवळ करतात. साहजिक चित्रपटाच्या दर्जावर परिणाम होतो आणि अत्यंत सुमार दर्जाचे, कलाहीन चित्रपट निर्माण होतात.

हिंसाचारावर आपारलेले, भडक छंगाचे चित्रपट मोठ्या प्रमाणात दिसण्यामागे हेच कारण आहे. याचा समाजाच्या अभिरुचीवर परिणाम होतोच; शिवाय समाजातले वातावरण विघडण्यास हे चित्रपट कारणीभूत ठरतात.

आता माहिती तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र क्रांती घडू पाहत आहे. चित्रपटकलेची दृष्टी असलेले, प्रतिभावान तरुण दिग्दर्शक नवनवीन कलात्मक चित्रपट निर्माण करीत आहेत आणि हे चित्रपट इंटरनेटवर प्रसिद्ध करीत आहेत. हे चित्रपट आमच्या पिढीला आवडताहेत.

इंटरनेटवरील काही चित्रपटांनी तर चित्रपटगृहात सादर होणाऱ्या चित्रपटांपेक्षा अधिक प्रेक्षकसंखया मिळवली आहे. यामुळे आता उत्तमोत्तम चित्रपट निर्माण होत आहेत. हे चित्रपट समाजाचे वास्तव दर्शन घडवतात. अप्रवृत्तींचे दर्शन घडवतात. चांगल्या मार्गावरून चालण्यासाठी या चित्रपटांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा –