महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती | ABHAYARANYA LIST AND INFORMATION IN MARATHI
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे. या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
निसर्ग हा एक थोर कलावंत आहे. आपल्या विद्यार्थी दशेपासून या थोर कलावंताची ओळख करून घ्यायला हवी. निसर्ग म्हणजे नेमक काय आहे ? तो कसा असतो? अशा प्रकारच्या विविध माहितीकरिता निसर्गामध्ये मनसोक्तपणे फिरायला हवे. निसर्गाच्या सहवासात राहिल्याने आपल्याला किती तरी गोष्टी माहीत होतात.
महाराष्ट्रातील भीमाशंकर, कोयना, रेहकुळी, गौताळा, राधानगरी या बरोबर कर्नाळा, मायणी, नांदुर, मघमेश्वर, जायकवाडी, माळढोक अशा पक्षी अभयारण्यांची ओळखही या पुस्तकातून करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली, मार्ग, स्थळे, निवास व्यवस्था, सोयी याबद्दलही थोडक्यात पण महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. निसर्गप्रेमीना, बालमित्रांना, तरुणमित्रांना ही वेबसाइट निश्चितच आवडेल.
पर्यटकांना मार्गदर्शक सूचना
- अभयारण्य है प्रथमतः वन्यजीवांचे आश्रयस्थान असून आपणच येथे आगंतुक आहात, हे लक्षात असू द्या. > भडक रंगाचे कपडे परिधान करू नका. तसेच मोठ्याने बोलू नका.
- वाहनाची गती कमी ठेवा, तसेच वाहनांचा हॉर्न वारंवार वाजवू नका.
- वाहनाद्वारे भ्रमण करताना वाहनातून उतरू नका.
- अभयारण्यात रेडिओ, टेपरेकॉर्डर वाजविण्यास बंदी आहे.
- सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, डबे इ. आपल्या सोबतच परत न्या. कचरा योग्य त्या ठिकाणीच टाका.
- अभयारण्यात धुम्रपान करू नका किंवा विस्तव पेटवू नका. यामुळे वनवणवा भडकून वन्यजीवांची आश्रय स्थळे व वन्यजीव नष्ट होण्याचा धोका असतो.
- वन्यप्राण्यांच्या व पक्ष्यांच्या सूचक आवाजाकडे लक्ष असू द्या. कदाचित त्यावरूनच जवळपास असलेल्या प्राणी पक्ष्यांच्या अस्तित्वाची सूचना आपणांस मिळेल.
- निसर्गाची क्षणचित्रे दीर्घकाळ स्मरणात राहवीत म्हणून दुर्बीण व कॅमेरा सतत सोबत असू द्या व योग्य वेळी वापरा.
- पक्षी व प्राणी निरीक्षणासाठी ह्या वेबसाइट चा वापर करा.
महाराष्ट्रातील अभयारण्ये यादी माहिती | ABHAYARANYA LIST AND INFORMATION IN MARATHI
- भीमाशंकर अभयारण्य माहिती | BHIMASHANKAR SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- कोयना अभयारण्य माहिती | KOYNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- रेहेकुरी अभयारण्य माहिती | REHEKURI SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- गौताळा अभयारण्य माहिती | GAUTALA SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- चांदोली अभयारण्य मराठी माहिती | CHANDOLI NATIONAL PARK INFORMATION IN MARATHI
- सागरेश्वर अभयारण्य माहिती | SAGARESHWAR ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- राधानगरी अभयारण्य माहिती | RADHANAGARI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- अनेर डॅम अभयारण्य माहिती | ANER DAM WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- तानसा अभयारण्य माहिती | TANSA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- यावल ( पाल ) अभयारण्य माहिती | YAVAL WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- किनवट अभयारण्य माहिती | KINWAT WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- मेळघाट अभयारण्य माहिती | MELGHAT TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- बोर अभयारण्य माहिती | BOR TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- नागझिरा अभयारण्य माहिती | NAGZIRA TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- मायणी अभयारण्य माहिती | MAYANI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती | NANDUR MADHYAMESHWAR BIRD SANCTUARY PARK INFORMATION IN MARATHI
- जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती | JAYAKWADI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI