अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी | AJINKYATARA FORT INFORMATION IN MARATHI

अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी | AJINKYATARA FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी म्हणजेच AJINKYATARA FORT INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी, रचना व ठिकाण

साताऱ्याचा इतिहास म्हणजे अजिंक्यताऱ्याचा इतिहास होय. ( गुगल मॅप )

बऱ्याच ऐतिहासिक घटना येथे घडल्या त्यामुळे अजिंक्यताऱ्याला वेगळेच महत्त्व आहे. हा किल्ला शिलाहार वंशीयांनी ११९०मध्ये बांधला. या ठिकाणी उंची सुमारे २.०७ मी. आहे.

किल्ल्यावरून यवतेश्वर, चंदनवंदन, सज्जनगड तसेच सातारा शहर इत्यादी गोष्टी दिसतात.किल्ल्यास उत्तरेस एक व दक्षिणेस एक असे दोन दरवाजे आहेत.

चांगली तटबंदी बुरुज, भरपूर तळी, दुसऱ्या बाजीरावाने बांधलेला पण मोडकळीस आलेला वाडा, मंगळाईचे देऊळ इत्यादी गोष्टी आपल्याला पाहयला मिळतात.

ऐतिहासिक निर्देश

इ.स. १६७३ मध्ये महाराजांनी परळी किल्ला घेतला.

११ नोव्हेंबर १६७३ रोजी महाराजांनी अजिंक्य उर्फ अजिमतारा घेतला. छत्रपती राजाराम महाराज यांनी १६९८ मध्ये सातारा ही मराठी राज्याची राजधानी केली.

१६९९ मध्ये औरंगजेब त्याच्या अफाट फौजेला घेऊन मराठेशाही नेस्तनाबूत करण्यास चाल करून आला.

गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होता.

किल्लेदारांनी मोठ्या शर्थीने तोंड दिले पण औरंगजेबाने भुयार खणून प्रचंड सुरूंग लावले.

सुरूंगाची कल्पना नसल्यामुळे किल्ल्याच्या रक्षणासाठी बुरुजावरचे १२५ सहकारी घाबरले, काही मातीमध्ये गाडले गेले.

दुसरा सुरुंग लावला त्यावेळेस गाडले गेलेले मातीच्या ढिगाऱ्यातून मोकळे झाले.

औरंगजेबाचे बरेच सैन्य मारले गेले.

शिबंदीव मनुष्यबळ कमी पडल्याने एप्रिल १७०० मध्ये हा किल्ला मोगलांकडे गेला.

अश्मशहाने पहिल्यांदा निशाण लावल्यामुळे किल्ल्यास अझमतारा असे नाव पडले.

मराठी राज्याच्या सर्व मुख्य परिवर्तनाचा खऱ्या अर्थाने उगम याच किल्ल्यावर झाला.

इ.स. १७०८ मध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना या किल्ल्यावर आणण्यात आले.

पायथ्याशी रंगमहालातच राहण्याची सोय करण्यात आली.

१७४९ मध्ये शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सकवारबाई सती गेल्या. मधल्या काळामध्ये दुसरे बाजीराव पेशवे आणि नाना फडणीस या दोघांत मतभेद झाले.

नाना फडणीस यांनी (छत्रपती दुसरे) शाहू महाराजांची भेट १७९८ मध्ये घेतली आणि पेशव्याना ताब्यात ठेवण्यास चर्चा केली. १८०८ मध्ये दुसरे छत्रपती शाहू यांचे निधन झाले.

१० फेब्रुवारी मध्ये इंग्रजांनी संपूर्ण किल्ल्यास वेढा घातला आणि अजिंक्यतारा काबीज केला,

अशा एक ना अनेक घटनांनी अजिंक्यतारा आपल्या लक्षात राहतो.

आज सातारा हे शहर निरनिराळ्या मार्गे उत्तमप्रकारे प्रगतीपथावर आहे. यात शंका नाही.

सातारचे प्रमुख शिल्पकार म्हणून प्रतापसिंह महाराज यांचे आवर्जून नाव घ्यावे लागेल.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा