भीमाशंकर अभयारण्य माहिती | BHIMASHANKAR SANCTUARY INFORMATION IN MARATHI
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच “BHIMASHANKAR SANCTUARY INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण
भीमाशंकर येथील अभयारण्य पाहयला आपल्याला पुणे-खेड मंचर-घोडेगाव या मार्गानी जावे लागते . एस. टी. ची व्यवस्था आहे. सुमारे पाच तासामध्ये या ठिकाणी जाऊ शकतो. पुणे ते भीमाशंकर है अंतर साधारण १२५ कि. मी. आहे.
( गुगल मॅप लोकेशन )
या ठिकाणचे सृष्टिसौंदर्थ, दराडी, बांधकाम असलेले मोठे शंकराचे देऊळ, विविध पक्षी, औषधी वनस्पती, भरपूर वृक्ष अशा एक ना अनेक गोष्टींमुळे भीमाशंकर आपल्या दीर्घकाळ लक्षात राहते.
आजकाल अनेक गिर्यारोहण संस्था निसर्गप्रेमींना मोठ्या प्रमाणावा या ठिकाणी नेतात. पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणचा विद्यार्थीवर्ग येथे मोठ्या संख्येने जातो. खरे तर अशा प्रकारची अभयारण्ये पाहयची असतील तर त्या त्या विषयातील अभ्यासक जर आपल्याबरोबर असतील तर मला वाटते खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानात बऱ्यापैकी भर पडते. माझे मित्र श्री. किरण पुरंदरे पक्ष्यांची माहिती विविध मार्गाने
व्यवस्थित सांगण्याचा उपक्रम गेली काही वर्षे करीत आहेत. माझे दुसरे मित्र श्री. प्र. के. घाणेकर हे सुद्धा एक अभ्यासक, आहेत. विविध वनस्पती व गडकोट याबद्दल गेली अनेक वर्षे सातत्याने निसर्गप्रेमींना माहिती सांगत आहेत.
निसर्ग संपत्ती
कित्येक निसर्ग प्रेमी वर्षाच्या सहलीस या ठिकाणी येतात
आणि मनसोक्त आनंद लुटतात. पाऊस पडला की येथील मातीचा सुगंध, घोंघावणारा वारा, पानांची सळसळ, पाण्याचे ओहोळ, पानावरील टपटप, ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्य, थोडेसे पावसात भिजल्यावर गरम गरम चहा, जंगलात फिरल्यावर मातीने भरलेले कपडे, घामट वास असा जिवंतपणा अनुभवायला एकदा तरी भीमाशंकरला जायला हवे असे मला वाटते.
प्राणी संपत्ती
भीमाशंकर या अभयारण्यामध्ये आपल्याला रानमांजर, रानकुत्रा, लांडगा, तरस, वाघ, बिबट्या, रानडुकर, सांबर, सायाळ, वानर असे विविध प्राणी पाहयला मिळतात. आंबा, पेरू, कारवी, लोहारी, कोरफड, हिरडा, बेहडा, पिसा, कढीलिंब, आघाडा, तुळस, पाणकुटी अशा कितीतरी वनस्पतींनी या ठिकाणचे सौंदर्य वाढवले आहे.
मुंगूस

मुंगूस हा प्राणी दाट जंगले, विरळ जंगले, माळरान, खुरट्या झुडपाची जंगले, भरपूर प्रमाणात असलेली फळझाडे तसेच शेतातून आढळतो.
पूर्ण वाढलेल्या मुंगूसाची लांबी (शेषटी सकट ) ९० से. मी असते याचे वजन साधारण १॥ किलो असते. ह्याचा रंग पिवळसर राखी असतो. त्याच्या केसावर काळसर राखी रंगाचे पट्टे असतात. मुंगूस हा प्राणी खाद्य मिळविण्यास केव्हाही बाहेर पडतो. उंदीर, घूस, साप, बेडूक, विंचू, किटक अशा सगळ्यावर ताव मारतो. कधी,
कधी पक्ष्यांची अंडीसुद्धा खातात. मनुष्यवस्तीच्या आसपास राहणारे मुंगूस कधी, कधी कबुतरे, पाळीव कोंबड्या मारतो व खातो. मेलेल्या प्राण्यांचे मांसदेखील मुंगूसाला आवडते. मुंगुस कधी, कधी झाडाची मुळे व फळेदेखील खातो.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- भीमाशंकर अभयारण्य माहिती | BHIMASHANKAR SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- कोयना अभयारण्य माहिती | KOYNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- रेहेकुरी अभयारण्य माहिती | REHEKURI SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- गौताळा अभयारण्य माहिती | GAUTALA SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- चांदोली अभयारण्य मराठी माहिती | CHANDOLI NATIONAL PARK INFORMATION IN MARATHI
- सागरेश्वर अभयारण्य माहिती | SAGARESHWAR ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- राधानगरी अभयारण्य माहिती | RADHANAGARI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- अनेर डॅम अभयारण्य माहिती | ANER DAM WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- तानसा अभयारण्य माहिती | TANSA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- यावल ( पाल ) अभयारण्य माहिती | YAVAL WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- किनवट अभयारण्य माहिती | KINWAT WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- मेळघाट अभयारण्य माहिती | MELGHAT TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- बोर अभयारण्य माहिती | BOR TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- नागझिरा अभयारण्य माहिती | NAGZIRA TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- मायणी अभयारण्य माहिती | MAYANI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती | NANDUR MADHYAMESHWAR BIRD SANCTUARY PARK INFORMATION IN MARATHI
- जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती | JAYAKWADI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI