चाकण किल्ला इतिहास | CHAKAN FORT INFORMATION IN MARATHI

चाकण किल्ला इतिहास ( संग्रामदुर्ग किल्ला )| CHAKAN FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही चाकण किल्ला इतिहास म्हणजेच CHAKAN FORT INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

संग्रामदुर्ग किल्ला / चाकण किल्ला इतिहास व ठिकाण

पुण्याहून जवळच असलेला चाकणचा किल्ला हा भुईकोट किल्ला होय. या किल्ल्याबाबतइ.स. १४०० पासून उल्लेख आढळतात.

पुण्याहून सुमारे २५ कि.मी. पुणे-नाशिक रस्त्यावर हा किल्ला वसलेला आहे. ( गुगल मॅप लोकेशन )

किल्ल्याच्या सगळ्या अंगांनी व्यवस्थित बुरूज बांधलेले होते. चांगली खोली असलेला एक खंदक या किल्ल्याच्या भोवताली होता.

शत्रूला जेणेकरून लवकर किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या रक्षणार्थ खंदकाची योजना केलेली होती.

किल्ल्याची रचना

किल्ल्याची उंची भरपूर होती. रुंदीसुध्दा चांगली होती. किल्ल्याभोवती खणलेला खंदक नेहमी पाण्याने गच्च भरलेला असे. हा खंदक सहा पुरुष खोत तसेच वीस फूट रुंद होता.

या किल्ल्याकडे कोणी फारसे फिरकत नाही. किल्याचा आकार चौकोनी आहे. सध्याची किल्ल्याची स्थिती अगदीच खराब आहे. हा भुईकोट किल्ला असल्यामुळे शिवाजीराजांच्या काळात किल्ल्याला निश्चितच महत्त्व होते. जिल्हा पातळीवर प्रत्येक किल्ल्याची डागडूजी केल्यास

मोडकळीस आलेल्या किल्ल्याला निश्चितपणे आकार प्राप्त होईल. शासनाने जास्तीत जास्त सहकार्य दिल्यास या जुन्या वास्तू पुन्हा नव्याने उभ्या राहतील.

ऐतिहासिक निर्देश

हा किल्ला बहामनी राजवटीच्याकडे होता. १५९५ मध्ये शिवाजीराजांचे मालोजीराव भोसले यांना बहादुरशहाने हा किल्ला दिला.

इ.स. १६४७ च्या सुमारास चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याला आपलेसे करून महाराजांनी हा किल्ला घेतला. ज्यावेळेस इ.स. १६७२ च्या सुमारास मोगलांचा सेनापती शाहिस्तेखान याने चाकणच्या किल्ल्याला वेढे दिला होता त्यावेळेस या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने मोठ्या शनि हा किल्ला लढवला, पण त्यात त्याला यश आले नाही.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा