चंदन वंदन किल्ल्याची माहिती | CHANDAN VANDAN FORT INFORMATION IN MARATHI

चंदन वंदन किल्ल्याची माहिती | CHANDAN VANDAN FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “चंदन वंदन किल्ल्याची माहिती” म्हणजेच “CHANDAN VANDAN FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

चंदन वंदन किल्ल्याची माहिती, ठिकाण व रचना

मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर या किल्ल्याप्रमाणेच सातारा या जिल्ह्यातील चंदन-वंदन ही जोडी आपल्या वैशिष्ट्यांनी प्रसिध्द आहे. ( गुगल मॅप )

वंदनला जाण्याकरिता जी वाट आहे ती जरंड्याच्या वाडीतून फुटते. थोडासा चढाव आपण चढून गेलो की पूर्वेस आपणास पहिला दरवाजा लागतो.

नंतर आपल्याला फार्शी शिलालेख असलेला दुसरा दरवाजा लागतो. पहारेकऱ्याकरिता बांधलेल्या खोल्या अपल्याला आतील बाजूस आढळतात.

थोड्याफार पायऱ्या आपण चढून गेल्यावर किल्ल्याचा माथा लागतो.

आपल्याला पडझड झालेली घरे दिसतात. वाड्याच्या शेजारी एक मशीद आहे.

कबरस्तानजवळ तसेच सरकारी वाड्याजवळ दोन उत्तम पाण्याचे साठे आपल्याला या दिसतात.

वायव्य दिशेस एक भले मोठे फुटक्या स्वरूपातील तळे दिसते. सरकारीवाडा सोडला तर उभ्या पायऱ्यांची २५ ते ३० मी.

उंचीची एक टेकडी आपणास दिसते. तिच्या पायथ्यावर एका वाड्याचे काही अवशेष दिसून येतात.

त्याच्या भोवताली आवश्यक ठिकाणी बुरुज तसेच तटबंदी बांधलेली आहे.

चंदन हा किल्ला वंदन या किल्ल्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. मा या किल्ल्याचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे.

हा दरवाजा येईपर्यंत वाट खरोखर अवघड आहे.

पुढे थोडेसे अंतर आपण चालून गेलो की माचीवर पोचतो. तिथे महादेवाचे देऊळ तसाच एक भला मोठा वृक्ष आढळतो.

आपण माथ्यावर पोचलो की तिथे अपूर्णावस्थेत असलेले इमारतीचे दोन खांब आपल्याला दिसतात.

खांबाकडे आपण नजर टाकली तर आपल्याला खांब भक्कम व मोठे वाटतात.

बारकाईने आपण पाहिल्यास तटावर मोठाले घोडे कसे काय चढवीत असत याची आपणास कल्पना येते.

त्यावेळचे हे काम किती अवघड स्वरूपाचे असेल याची आपल्याला पुरेपूर कल्पना येते.

राजा भोज शिलाहाराने जे किल्ले निर्माण केले त्यांमध्ये या जोडकिल्ल्यांचा समावेश होतो.

किल्ल्यावर आपण हिंडलो तर काही इमारतींचे अवशेष आपणास दिसतात.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा