चांदोली अभयारण्य मराठी माहिती | CHANDOLI NATIONAL PARK INFORMATION IN MARATHI
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “चांदोली अभयारण्य मराठी माहिती” म्हणजेच “CHANDOLI NATIONAL PARK INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
चांदोली अभयारण्य मराठी माहिती
चांदोली अभयारण्य कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली या चार जिल्ह्यामधे पसरलेले आहे. पश्चिम घाट क्षेत्रातील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील महत्त्वाचे असलेले.
वन्यजीवन व त्यांच्या आश्रयस्थळांचे संरक्षण, वाढ तसेच विकास करून पर्यावरणाकरीता महाराष्ट्र शासनाने दि. १५ सप्टेंबर १९८५ रोजी चांदोली अभयारण्य म्हणून घोषित केले.
क्षेत्राची व्याप्ती
या अभयारण्यात एकूण ३२ गावांच्या क्षेत्रांचा समावेश केलेला आहे. याचे एकूण क्षेत्र ३०८.९७ चौ. कि. मी. आहे.
भौगोलिक परिस्थिती
चांदोली अभयारण्याचे क्षेत्र सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील डोंगर-टेकड्यांचे व दन्याखोऱ्यांनी व्याप्त असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची ५०० मीटर ते ९०० मीटर इतकी आहे. पश्चिमेकडील सीमा सह्याद्रीच्या उंच कड्यांची असून या क्षेत्रातील पर्जन्यमान ३००० ते ५००० मि.मी. एवढे आहे.
( गुगल मॅप लोकेशन )
याठिकाणी उत्तम पर्जन्यमानामुळे परिसर नेहमी हिरवागार असतो. या ठिकाणातील डोंगरावर, टेकड्यावर खडकाळ कडे विखुरलेले आहेत. या ठिकाणी माती कमी अधिक खोलीची असून तांबडी आहे. या परिसरातील एकंदरीत हवा सौम्य व दमट आहे.
वन संपत्ती
या अभयारण्यामध्ये उष्णकटिबंधिय निमसदाहरित, सदापर्णी वृक्षांचे वन आहे. या वनामधील झाडांची सर्वसाधारण उंची १० ते १५ मीटर एवढी आहे. या ठिकाणी आपल्याला जुन्या व नवीन वृक्ष – वेली आढळतात.
वनस्पती
या अभयारण्यामध्ये आपल्याला हिरडा, पीसा, चांदडा, हवा, गेळा, आळू, करंज, नाना, पार जांभुळ. जांभुळ, वारंग, आवळा, लड़की, पांगारा, आंबाडा, धायटी, सर्पगंधा, वाघाटी, आंबा, आपटा, फणशी, फणस, खरसिंग, डंबर, अर्जुनसादडा अशा प्रकारची अनेक जातींचे वृक्ष पाहयला मिळतात. या व्यतिरिक्त करवंद, कारवी, अडुळसा,
निरगुडी, शिकेकाई, तोरण, रानजाई, तमालपत्र, रानमिरी, मुरूडशेंग, वाघाटी इत्यादी झुडपे व वेलींचे दर्शन आपल्याला घडते. बांबूंची बेटे, माड, वेत आपल्याला आकर्षित करतात.
गवत
उघड्या क्षेत्रामध्ये कराड, फुल, तांबट, कुसळ, कोळंब, डोंगरी अशा प्रकारचे गवत आपल्याला पाहयला मिळते.
व्यवस्था व पर्यटन

चांदोली अभयारण्याचे व्यवस्थापन वन्यजीव विभाग, कोल्हापूर यांच्याकडे आहे. पर्यटकांच्या दृष्टीने पश्चिम घाटामधील घनदाट व हिरवेगार जंगल, चांदोली धरण, वसंतसागर, जलाशय, झोळंबी सडा, धबधबा तसेच प्राचीन गड, कलावंतिनीची विहीर, भैरवगड अशी इतिहास प्रसिद्ध ठिकाणे व सह्याद्रीच्या माध्यमावरून कोकणामध्ये उतरण्यास असणाऱ्या शिड्या येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण आहे.
या ठिकाणी वन्यप्राणी निरीक्षणासाठी झोळंबी, खदलापूर, चांदेल येथे मनोरे बांधण्यात आल्यामुळे पर्यटकांची उत्तम सोय झाली आहे. मनोऱ्यावरून विविध प्रकारचे सौंदर्य आपल्याला पाहवयास मिळते.
प्रवेश
दोन ठिकाणाहून आपल्याला या अभयारण्यात जाता येते.
(१) मणदूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. या गावामघून प्रवेश करावा लागतो.
(२) कोल्हापूर जिल्ह्यामधील मौजे उदगिरी या ठिकाणाहूनसुद्धा आपल्याला अभयारण्यात प्रवेश करता येतो. पर्यटकांना चांदोलीच्या अभयारण्यात जीपने अथवा लाँचने प्रवास करावा लागतो.
जवळचे रेल्वे स्टेशन
कराड
जवळचे विमानतळ
कोल्हापूर, कराड
राहण्याची व्यवस्था
चुमरी विश्रामगृह, वारणावती पाटबंधारे विभाग, वारणावती
जवळचे अंतर – (डांबरी रस्त्याने )
१) कराड -चांदोली ५५ कि. मी.
२) इस्लामपूर – चांदोली ६५ कि. मी.
३) कोल्हापूर – चांदोली ७८ कि. मी.
४) कोल्हापूर उदगिरी मलकापूर मार्गे १०५ कि. मी.
आरक्षण संपर्क
१) उपवनसंरक्षक वन्यजीव कोल्हापूर
गंजीगळी, बिंदू चौक कोल्हापूर
२) वनक्षेत्रपाल बन्यजीव चांदोली
अभयारण्य मणदूर ता. शिराळा जि. सांगली
वन्य प्राणी
आपल्याला चांदोली अभयारण्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी पाहयला मिळतात. विविध रंगाची फुलपाखरे आपले लक्ष वेधतात.
तरस
महाराष्ट्रात तरस हा प्राणी साधारण ढाण्या बाघ, मुंगूस, सायाळी अशा प्राण्यांच्या वास्तव्यात आढळतो. तरस हा साधारण कुत्र्यासारखा दिसतो. याचे पुढील अंग व डोके जाड व मागील शरीर निमुळते होत गेलेले असते.
हा प्राणी ओळखण्यास सोपा आहे. याचे मागचे पाय बारीक असतात. त्याच्या मानेवर आयाळीसारखे लांब केस असतात. याचा शरीराचा रंग मळकट पांढरा, उदी किंवा राखी असतो. याच्या अंगावर आडवे पट्टे असतात.
तरस दिवसा कळकी, वेल किंवा बांबुच्या वनामध्ये आढळतात. हा प्राणी रात्र पडली की भक्षाच्या शोधार्थ बाहेर पडतो व दिवस उगवण्यापूर्वी आपल्या गुहामध्ये परत येतो.
बाहेर पडताना जोडीने जातात. या प्राण्याच्या पावलांचे ठसे कुत्र्यासारखे असतात. त्याच्या शरीराचा भार पुढील पायांवर असल्यामुळे पुढील पायाचे ठसे पटकन दिसतात.
याचे खाद्य म्हणजे शेळी, मेंढी, कुत्रे असे प्राणी मारून खातात. यांचा समागमाचा काळ हिवाळ्यामध्ये असतो. हा प्राणी दिसायला बेढब आहे.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- भीमाशंकर अभयारण्य माहिती | BHIMASHANKAR SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- कोयना अभयारण्य माहिती | KOYNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- रेहेकुरी अभयारण्य माहिती | REHEKURI SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- गौताळा अभयारण्य माहिती | GAUTALA SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- चांदोली अभयारण्य मराठी माहिती | CHANDOLI NATIONAL PARK INFORMATION IN MARATHI
- सागरेश्वर अभयारण्य माहिती | SAGARESHWAR ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- राधानगरी अभयारण्य माहिती | RADHANAGARI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- अनेर डॅम अभयारण्य माहिती | ANER DAM WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- तानसा अभयारण्य माहिती | TANSA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- यावल ( पाल ) अभयारण्य माहिती | YAVAL WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- किनवट अभयारण्य माहिती | KINWAT WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- मेळघाट अभयारण्य माहिती | MELGHAT TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- बोर अभयारण्य माहिती | BOR TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- नागझिरा अभयारण्य माहिती | NAGZIRA TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- मायणी अभयारण्य माहिती | MAYANI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती | NANDUR MADHYAMESHWAR BIRD SANCTUARY PARK INFORMATION IN MARATHI
- जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती | JAYAKWADI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI