संगणक निबंध मराठी | COMPUTER ESSAY IN MARATHI

संगणक निबंध मराठी | COMPUTER ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “संगणक निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये COMPUTER ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • संगणक युग
  • जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी
  • मनुष्यशक्ती मोठी
  • नैसर्गिक संकटाच्या वेळी मदत
  • जग जवळ आले
  • तिकिटांचे आरक्षण, कंपन्यांची कामे, बजेट, ज्ञानाचा विधी
  • गुणी

संगणक निबंध मराठी | COMPUTER ESSAY IN MARATHI

आजचे हे “संगणकाचे युग” आहे हे सर्वांनी मान्य केले आहे. त्यामुळे संगणकाला कोणी शाप मानेल, असे वाटत युग नाही. पण ज्या वेळी आपल्याला प्रथम संगणकाची ओळख झाली, तेव्हा मात्र लोकांना ‘संगणक हे मोठे संकट वाटले होते.

एक संगणक अनेकांची कामे करतो. त्यामुळे एखाद्या कार्यालयात एक संगणक आणला, तर अनेकजण बेकार होतील, अशीच भीती सर्वांना वाटत होती.

प्रारंभी निर्माण झालेली ही भीती वगळली तर संगणकाच्या विरोधात एकही गोष्ट दाखवता येणार नाही. उलट, संगणकाचे फायदेच फायदे दिसून येत आहेत. संगणकाचा सर्वात मोठा गुण म्हणजे अत्यंत अचूक आणि प्रचंड वेगात काम करण्याची अफाट दिन क्षमता. या गुणाचा सर्वत्र उपयोग होत आहे.

अगदी गुंतागुंतीच्या गणितांपासून ते छपाईपरयंत सर्व कामे संगणक सहजपणे करू शकतो. यामुळे लहान लहान कार्यालयांपासून ते मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत सगळीकडे संगणकाचा सर्रास उपयोग केला जात आहे. प्रत संगणकात हवी तितकी माहिती साठवून ठेवता येते आणि हवी ती माहिती क्षणार्धात मिळवता येते. यामुळे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर पटापट निर्णय घेता येतात. कामे झटपट होतात. साहजिकच वेगाने प्रगती होते.

इंटरनेटमुळे हे विशाल जग अगदी छोटे बनले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीशी क्षणा्धांत धूप संपर्क साधता येतो. याचा सर्व क्षेत्रांत कल्पनातीत फायदा होत आहे. इंटरनेटवरील माहितीच्या महाखजिन्यातून कोणत्याही विषयावरील अत्यंत अद्ययावत माहिती मिळते.

माणसे एकमेकाला पत्रे पाठवू शकतात बोलू शकतात. नैसर्गिक आपत्ती वा गुंतागुंतीचे आजारपण यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबतीत मदत मागवता येते वा पाठवता येते. त्यामुळे असंख्य लोकांची संकटातून पक्ष मुक्तता होते. प्राणही वाचवता येतात. कोणत्याही बँकेत आपले पैसे असले, तरी जगातील कोणत्याही ‘ए. टी. एम.’ मधून पैसे काढता येतात.

सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात कोणत्याही क्षेत्रांतील स्पर्धेत जिंकायचे असेल तर संगणक टाळता येणार नाही. तसेच, बेकारीबाबत आपली कल्पनाच चुकीची आहे. आता आपण पाहतो की संगणकामुळे कितीतरी नोकऱ्या निर्माण झाल्या आ आहेत. व्यवसाय वाढले आहेत.

पूर्वीच्या नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या नाहीत. पण त्यांच्या कितीतरी पटींनी नवीन नोकऱ्या नाही निर्माण झाल्या आहेत. संगणकाबाबत तर आपण जगात पहिला क्रमांक पटकावला आहे.

अशा या गुणी संगणकाला शाप कोण म्हणेल?

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा –