देवगिरी किल्ला माहिती | DEVGIRI FORT INFORMATION IN MARATHI –
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “देवगिरी किल्ला माहिती” म्हणजेच “DEVGIRI FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
देवगिरी किल्ला माहिती व ठिकाण
अजिंठा-वेरुळ या प्रसिद्ध लेण्यांमुळे आणि परळी वैजनाथ, ओंब्या नागनाथ व घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगामुळे परकीय व भारतीय अशा पर्यटकांचा ओघ औरंगाबादच्या बाजूला सतत वाढत आहे.
औरंगाबादहुन वेरूळच्या लेण्यांकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर डावीकडे प्रकर्षाने दिसणारा एक अजिंक्य, बेलाग नि बुलंद दुर्ग आहे. तो म्हणजे किल्ले देवगिरी. (दौलताबाद)
गडावर कसे जायचे
विमानाने : औरंगाबाद विमानतळ शहरापासून १० कमी अंतरावर आहे. आणि तेथे मुंबईहून थेट विमानसेवा आहे.
रेल्वेने : औरंगाबाद दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड काचिगुडा विभागात मोडते. मुंबई व दिल्ली येथून येणारे उतारू मनमाड जंक्शनवर गाडी बदलतात. तेथून औरंगाबाद, ११८ कि.मी. आहे.
मुंबई : औरंगाबाद (मनमाड मार्गे) ३७५ कि.मी. दिल्ली औरंगाबाद (आग्रा, ग्वाल्हेर, झांशी व मनमाडमार्गे) १३९५ कि.मी. जळगाव हे मध्य रेल्वेवरील स्टेशन अजिंठ्याहून फक्त ५९ कि.मी. आहे.
रस्त्याने : मुंबई- औरंगाबाद ३८८ कि.मी.(मनमाडमार्गे), मुंबई-औरंगाबाद ४०० कि.मी. (पुणे मार्गे), दिल्ली औरंगाबाद १३२३ कि.मी. (मथुरा, आग्रा, ग्वाल्हेर, शिवपुरी, इंदूर, धुळे, जळगाव, अजिंठामार्गे)
राज्य परिवहन मंडळाची बससेवा पुणे, मुंबई, अहमदनगर, जळगाव, शिर्डी, नाशिक व धुळे ते औरंगाबाद आणि जळगाव ते अजिंठा अशी आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची देखील मुंबई ते औरंगाबाद दैनिक आराम बस सेवा असून खास आयोजित सहलीची व्यवस्था आहे.
म. प.वि.म आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अजिंठा वेरुळकडे आणि इतर पर्यटन स्थळांकडे नियमित बससेवा चालवितात. टॅक्सी, ऑटोरिक्षा, टांगे आणि बस यांचीही व्यवस्था स्थानिकरित्या करता येते.
( गुगल मॅप लोकेशन )
राहण्याची सोय
औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळ म.प.वि.म. चा पर्यटक निवास आहे.
अजिंठा येथे अजिंठा ट्रॅव्हलर्स लॉज आणि फर्दापूर (अजिंठयापासून सहा कि.मी.) येथील पर्यटक निवासात राहण्याची स्वच्छ व आरामदायी व्यवस्था आहे.
याखेरीज प्रत्येकाला परवडतील अशी इतरही बरीज हॉटिल्स व लॉजेस आहेत.
औरंगाबाद हिमरु व किनखाबी विणकामाबद्दल प्रसिद्ध आहे. ब्रिद्रीवेअर, आगेट आणि पैठणी रेशमी साड्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
देवगिरी किल्ला माहिती ऐतिहासिक निर्देश
राष्ट्रकुटचा राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवी सनाच्या आठव्या शतकात केली.
पुढे दुबळ्या केंद्रसत्तेचा फायदा घेऊन कल्याणीच्या चालुक्यांची ताबेदारी झुगारून देऊन महासावंत यादव कुलोत्पन्न वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या सहाय्याने आपली स्वतंत्र राजवट सुरू केली.
देवगिरी हे नाव कसे पडले ती आख्यायिका मोठी मनोरंजक आहे.
देवगिरीची आख्यायिका | देवगिरी किल्ला माहिती
एकेकाळी आदिमाया पार्वती अन् भगवान महादेव याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्याडावात पार्वती जिंकली. पण संसाराचाडाव उधळून श्री शिवशंकर वेरुळच्या घनदाट अरण्यात निघून गेले.
देवी पार्वतीने भिल्लीणीचे रूप घेतले व ती देखील त्या वनात वास्तव्य करण्यास गेली. शंकर व ती भिल्लीण यांचे प्रेम जडले.
कुणाचा संपर्क नको म्हणून सर्व देवादिकांना वेरूळच्या डोंगरावर येण्यास बंदी केली.
पण शिवशंकराच्या सहवासाला आतुर झालेले सर्व देव नजिकच्या एका डोंगरावर राहावयास गेले, तोच हा डोंगर देवगिरी,
दुसरी एक उपपत्ती अशी की, यादव राजे आपल्या नावापुढे ‘देव’ हे पद लावीत असत. उदा. कृष्णदेव, महादेव, रामदेव, हरदेव व त्यांचा तो देवगिरी नाव या राजकुलापेक्षा अधिक प्राचीन आहे. याच किल्ल्याला देवगड किंवा धारागिरी असेही संबोधित. पण दौलताबाद हे नाव अधिक प्रचलित आहे.
दौलत+आबाद म्हणचे खूप धनसंपदा असणारे स्थान अशी यांची फोड आहे. उभ्या महाराष्ट्रात देवगिरीसारखा किल्ला नाही.
रचना व स्थळे | DEVGIRI FORT INFORMATION IN MARATHI
चोरवाटा, भुयारे, फरवे रस्ते, दुर्लध्य खंदक, तासलेले कडे अन् अभेद्य तटबंदीने युक्त असा हा दुर्गराज म्हणजे एका प्रचंड भुईकोट किल्ल्यामध्ये सुरक्षित सांभाळलेले दुर्गरत्न आहे.
या भुईकोट किल्ल्याला ७ वैशी असून २ कि.मी. लांबीचा अभेद्य तट आहे. त्याला कटक म्हणतात.
आतला बालेकिल्ला हा आसपासच्या पठारी प्रदेशांपेक्षा सुमारे दोनशे मीटर उंचीचा आणि पटावरच्या सोंगटीसारखा उठून दिसणारा आहे.
त्यात प्रवेश करणे आजही अवघड आहे. एका पाठोपाठचे तीन दरवाजे आहेत.
तट, बुरुजावरील बुलंद तोफा, पहारेकऱ्यांच्या देवड्या पुढच्या मोकळ्या भागात आपल्या दृष्टीस पडतात. तिथे एक उंच स्तंभ आहे.
काही तज्ज्ञांच्या मते तो प्राचीन वेधशाळेचा विशष्ट भाग आहे तर काहींच्या मते हा चितोडसारखा जयस्तंभ आहे.
काहीच्या मते हा किल्ला उभारणीचे श्रेय इ.स. १४४५ मध्ये राज्य करणाच्या अहमदशाह अलीला देतात.
चांगला ७० मीटर उंचीचा अन् बुंध्याशी २० मीटर परीघाचा हा चार मजली स्तंभ चढून जाण्यास आतून पायऱ्या आहेत.
प्रत्येक मजल्याचे वर सज्जा आहे. जयस्तंभाच्या समोर आहे बंदिस्त पटांगण, हत्ती हौद, येथे हत्ती झुलत असत
अन् त्यांची ही जलक्रिडेची जागा होती असे मानतात.
पण यात हत्ती उतरणे किंवा उतरलेला हत्ती त्यातून बाहेर पडणे शक्य होईल असे वाटत नाही.
५० मीटर लांब, ३० मीटर रूंद अन् ७ मीटर खोल अशा हौदाच्या चारही काठांवरील तटावरून चक्कर मारता येते.
येथे जवळच भारतमातेचे मंदिर आहे.
याच्यापुढे आहे काळकोट दरवाजा. येथे एक महालाचा काही भाग आहे.
तोच चिनी महाल, शिवस्नुषा येसूबाई अन् युवराज शाहू यांनी येथेच बंदिवास भोगला.
पुढे हेच नष्टचर्य शिवरायांना दक्षिणेकडील मोहिम यशस्वी करण्यास मदत करणाऱ्या गोवळकोंड्या सुलतान अबुल हसन तानाशहाच्या नशिबी आले.
यानंतर आहे अंधारी भुवारी मार्ग, तो ३७ मीटर्स लांबीचा आहे. यालाच मोठ अंधेरी’ किंवा ‘मशाल का बंगला असे म्हणतात.
हा अंधारी मार्ग मोठा खडतर आहे.
तो सरळ तर नाहीच पण त्यातही फसव्या वाटा आहेत. अगदी शेवटी एक जाड लोखंडी तवा आहे.
त्यावर सरपण ठेवून पेटवले की हा बंदिस्त भुयारी मार्ग म्हणजे भट्टीच होते.
गार वारा येणाऱ्या दिशेकडे गेलो तर तेथून रवानगी थेट खालच्या खंदकात, तोही सुसरी-मगरी युक्त ! याशिवाय सहज दृष्टीस न पडणारा झरोका आहे. यातून शत्रूच्या अंगावर उकळतेतेल ओतत असत.
सध्याया ठिकाणीशासनाने मशाल पेटवून रस्ता दाखविण्यास माणूस ठेवला आहे.
शिल्पज्ञ हेमाद्री, भगवताचा भाष्यकार व प्रसिद्ध वैष्याकरण बोपदेव, संगीत शांईदेव, गायक गोपालनायक, महाकवी नरेंद्र कल्याणीचे विज्ञानेश्वर व या सर्वांचा कल्याणकारी राजा येथे राहून महाराष्ट्राच्या सौभाग्यलक्ष्मीची काळजी वहात होते.
प्रसिद्ध संत एकनाथ यांचे गुरू जनार्दन स्वामी यांची समाधी याच किल्ल्यावर आहे.
आजवरच्या ज्ञात इतिहासावरून हा किल्ला एकदाही सरळ जिंकता आला नाही.
फितुरी या एकेमव रोगाने हा किल्ला पोखरला गेला. तेव्हाच तो शत्रुपक्षाच्या हाती पडला.
६ फेब्रुवारी १२९४ रोजी हा किल्ला जो परस्थ जुलमी राजांच्या हाती पडला, त्याला स्वातंत्र्याचा वारा लागायला सुमारे सहाशे वर्ष लागली.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- महाराष्ट्रातील किल्ले | FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI
- सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये | SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पुरंदर किल्ल्याची माहिती | PURANDAR FORT INFORMATION IN MARATHI
- राजगड किल्ला माहिती मराठी | RAJGAD FORT INFORMATION IN MARATHI
- तोरणा किल्ल्याची माहिती | TORNA FORT INFORMATION IN MARATHI
- रोहिडा किल्ला माहिती | ROHIDA FORT INFORMATION IN MARATHI
- चाकण किल्ला इतिहास | CHAKAN FORT INFORMATION IN MARATHI
- शिवनेरी किल्ल्याची माहिती | SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI
- लोहगड किल्ल्याची माहिती | LOHAGAD INFORMATION IN MARATHI
- सज्जनगड ची माहिती मराठी | SAJJANGAD FORT INFORMATION IN MARATHI
- चंदन वंदन किल्ल्याची माहिती | CHANDAN VANDAN FORT INFORMATION IN MARATHI
- वासोटा किल्ला माहिती मराठी | VASOTA FORT INFORMATION IN MARATHI
- अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी | AJINKYATARA FORT INFORMATION IN MARATHI
- प्रतापगडाची माहिती | PRATAPGAD FORT HISTORY INFORMATION IN MARATHI
- रायगड किल्ला माहिती | RAIGAD FORT INFORMATION IN MARATHI
- कर्नाळा किल्ला मराठी माहिती | KARNALA FORT INFORMATION IN MARATHI
- जंजिरा किल्ला माहिती मराठी | JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI
- लिंगाणा किल्ल्याची माहिती | LINGANA FORT INFORMATION IN MARATHI
- गडदचा किल्ला, गडद गणपती | GADAD FORT INFORMATION IN MARATHI
- हरिश्चंद्रगड माहिती मराठी | HARISHCHANDRAGAD IN MARATHI
- धोडप किल्ला माहिती | DHODAP FORT INFORMATION IN MARATHI
- पन्हाळगड किल्ला मराठी माहिती | PANHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पारगड किल्ला माहिती मराठी | PARGAD FORT INFORMATION IN MARATHI
- विशाळगड किल्ला माहिती मराठी | VISHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- देवगिरी किल्ला माहिती | DEVGIRI FORT INFORMATION IN MARATHI
- सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी | SUVARNADURG FORT INFORMATION IN MARATHI
- सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI