ज्ञानगंगा अभयारण्य माहिती | DYANGANGA ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI

ज्ञानगंगा अभयारण्य माहिती | DYANGANGA ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “ज्ञानगंगा अभयारण्य मराठी माहिती” म्हणजेच “DYANGANGA ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

ज्ञानगंगा अभयारण्य मराठी माहिती व ठिकाण

ज्ञानगंगा हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मोताळ आणि चिखली तालुक्यात वसलेले आहे. ज्ञानगंगा ही नदी या अभयारण्यातून वाहत असल्यामुळे या अभयारण्यास ज्ञानगंगा अभयारण्य या नावाने ओळखले जाते.

गुगल मॅप लोकेशन )

निसगनि नटलेल्या ज्ञानगंगा या नदीवर माटरगाव या गावाच्याजवळ धरण बनवले असून त्यास ज्ञानगंगा धरण म्हणून ओळखले जाते. या संपूर्ण भागातील वन्यप्राण्यांना अभय देण्याच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाने योग्य निर्णय घेऊन ९ मे १९९७ चे अधिसूचनेनुसार ज्ञानगंगा या अभयारण्याची स्थापना केली.

निसर्ग व प्राणी, पक्षी संपत्ती

या अभयारण्यात आपल्याला सांग, धावडा, मोईन, बिजा, मोहा, आवळा, अंजन, बेहडा, सालई, बेल अशा प्रकारची मोठी झाडे पाहयला मिळतात. लहान झाडामध्ये आपटा, हिवर, खैर, लोखंडी, पळस, अमलतास

अशा झाडांचा समावेश आहे. वेलीमध्ये गवत प्रताजी, पिवळवेल, धामणवेल आदींचा समावेश आहे. निगुडी, आमटी, बोराटी, रायमोनीया, भराटी अशा प्रकारच्या झुडपांचा समावेश आहे.

या अभयारण्यात सरपटणाऱ्या प्राण्यापैकी धामण, मण्यार, नाग, अजगर, सरडा, घोरपड इत्यादींचे आपल्याला दर्शन होते.

घुबड, कबुतर, पाणकोंबडी, मोर, पोपट, सुगरण खंड्या, तितर, सतार, टकाचोर, धोबी अशा कितीतरी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे वास्तव्य या ठिकाणी आहे.

वन्यप्राण्यांपैकी जंगली कुत्रा, रानमांजर, तडस, रानडुक्कर, बिबट नीलगाय, चौसींगा, भेडकी, वटवाघूळ, वानर, अस्वल आपल्याला पाहयला मिळते.

थोडक्यात पण महत्त्वाचे

  • क्षेत्र : २०५. २२ चौ. कि. मी.
  • उंची : ३६० मीटर ते ६०० मीटर (समुद्र सपाटीपासून)
  • हवामान : मार्च ते मे- उष्ण, जून ते ऑक्टोबर -मध्यम, नोव्हेंबर ते फेब्रुवारी-थंड
  • जाण्यास योग्य वेळ : १ ऑक्टोबर ते १५ जून
  • निवास व्यवस्था : १) वन विश्रामगृह बखंड- २ कक्ष २) वन विश्रामगृह माटरगाव- १ कक्ष
  • जवळचे बस स्थानक : खामगाव, बुलढाणा
  • इंधन मिळण्याचे ठिकाण : खामगाव, बुलढाणा
  • जवळचे रेल्वे स्थानक : खामगाव, जलब, शेगाव
  • जवळचे विमानतळ : नागपूर, औरंगाबाद
  • अधिक माहितीकरिता : उपवनसंरक्षक-अकोला दूरध्वनी-०७२४ – ४१६११३

ह्या पोस्ट सुद्धा वाचा