पावसाळी सहल मराठी निबंध | ESSAY ON AAMCHI PAVASALI SAHAL IN MARATHI

पावसाळी सहल मराठी निबंध | ESSAY ON AAMCHI PAVASALI SAHAL IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये आमची पावसाळी सहल या विषयावर सविस्तर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये पावसाळी सहल यावर विसतृत माहिती लिहीलेली आहे, तसेच पावसाळी सहलीतील मज्जा, गमती जमती यांवरही या चर्चा केलेली आहे.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • पावसाळी हवेचा अनुभव
  • खंडाळ्याचा घाट
  • हिरवेगार डोंगरमाथे, कोसळणारे धबधबे
  • धुके व ढग यांचा संचार, पावसाची रिमझिम
  • माकडांसोबत गंमत-जंमत

पावसाळी सहल मराठी निबंध | ESSAY ON AAMCHI PAVASALI SAHAL IN MARATHI

ESSAY ON AAMCHI PAVASALI SAHAL IN MARATHI

‘खंडाळ्याच्या घाटात गाडी चाले घुक्यात’ हे गाणे गात गात आम्ही खंडाळ्याला निघालो होतो. प्रत्यक्ष घाटात गाडी शिरलो आणि काय आश्चर्य। चारी बाजूंनी डोंगरमाथ्यावर काळे ढग वर-वर जाताना दिसत होते!

आम्ही सगळे त्या वातावरणाने भारावलो आणि चिडीचूप झालो! मला तर वाटत होते की, आपणही ढगांसोबत डोंगरमाथ्यावर जावे. थोड्याच वेळात पावसाची रिमझिम सुरू झाली. आम्ही बसमधूनच हे दृश्य भान हरपून पाहत होतो.

आम्ही राजमाचीवर पोहोचलो. तोपर्यंत पाऊस थांबला होता. त्यानंतर डोंगरावरून वाहणारे पाण्याचे धबधबे दिसू लागले. तेवढ्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला. कोसळणारे पाणी सूर्याच्या किरणांमुळे चांदीसारखे चमकत होते. हिरवी शाल पांघरलेला डोंगरमाथा आणि दऱ्या पाहताना तर मन हरखून गेले होते.

एव्हाना आम्हाला खंडाळ्याला येऊन एक तास झाला होता. पण सगळेच जण त्या पावसाळी हवेचा अनोखा आनंद ख घेण्यात गुंग झाले होते. मध्येच धुक्याचे लोट आले.

आम्ही धुक्यात बुडून गेलो होतो. पाचसहा फुटांवरचेही दिसत नव्हते. पाऊस होता आणि नव्हतासुद्धा, कोसळताना तो दिसतच नव्हता. पण सूक्ष्म कणांनी आम्हांला भिजवत होता. हळूहळू धुके विरत गेले. तेवढ्यात बाईनी मक्याची गरम कणसे हातात दिली आणि मग काय! आम्ही मक्याच्या दाण्यांचा आस्वाद घेण्यात दंग झालो.

तो कणसे खाण्याचा अनुभव घेत असतानाच एक गंमत घडली. एक माकडीण आपल्या पिलाला उराशी कवटाळून बसली होती. खायला मिळेल या आशेने ती आमच्याकडे पाहत होती. माझ्या हातात भूईमुगाच्या शेंगा होत्या. त्यावर तिने झडप घातली. आम्ही सगळेच घावरलो. पण क्षणभरच कारण ती शेंगा खाण्यात रमली होती आणि आम्ही तिला पाहण्यात रमलो.

दिवसभर भुशी धरण, वळवण धरण, काला लेणी, बॅक्स म्यूझिअम अशा सर्व ठिकाणी फिरलो. गरमागरम भोजनावर तात्र मारला आणि परतीच्या वाटेला लागलो.

हे निबंध सुद्धा वाचा-