गुणगौरव समारंभ मराठी निबंध | ESSAY ON AWARD CEREMONY IN MARATHI

गुणगौरव समारंभ मराठी निबंध | ESSAY ON AWARD CEREMONY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये गुणगौरव समारंभ या विषयावर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये माझा गुणगौरव समारंभ कसा झाला, मी त्यातून काय शिकलो, माझा अनुभव यांवर सविस्तर चर्चा केलेली आहे.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • मुख्याध्यापकांच्या हस्ते विशेष सत्कार
  • टाळ्यांचा कडकडाट
  • शिक्षकवृंदाकडून कौतुक
  • आईवडील कृतार्थ
  • निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
  • कृतज्ञता व्यक्त करणारे रोहितचे मनोगत

गुणगौरव समारंभ मराठी निबंध | ESSAY ON AWARD CEREMONY IN MARATHI

ESSAY ON AWARD CEREMONY IN MARATHI

“लेकी वाचवा’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत रोहित पाटील याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे; त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन!” शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी बक्षीस समारंभाच्या वेळी चषक देऊन माझे खास कौतुक केले. तसेच माझी अभ्यासू वृत्ती, अवांतर वाचन व लेखनकौशल्य या गुणांचेही कौतुक केले.

माझ्या आईवडिलांचा तर या प्रसंगी ऊर भरून आला होता.

माझ्या आईवडिलांनी बालपणापासून किशोर, ठकठक, वयम् यांसारख्या मासिकांचे वाचन करण्यासाठी प्रेरणा दिली. सिंदबादच्या सफरी, गोटया ते महाभारत, रामायणपर्यंतची पुस्तके नेहमी वाचनात आली.

जे काही वाचले आणि ज्यांचे आकलन झाले त्यावर स्वतंत्रपणे लिहीत गेलो. त्यांतील काही लेखन शाळेच्या वार्षिकात छापले गेले. माझा हरूप त्यामुळे वाढला.

नववीत गेल्यावर मी स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, लोकसंख्या वाढ, लेकी वाचवा अभियान इत्यादी सामाजिक विषयांवर स्वतंत्र विचार करीत गेलो आणि ते लिहीत गेलो. त्यामुळे आजच्या गुणगौरवास मी पात्र ठरलो आहे.

तसेच “स्त्री आणि पुरुष एकाच गाडीची दोन चाके आहेत. कुटुंब आणि समाज निकोपपणे चालण्यासाठी स्त्री- 1-पुरुष समानतेची गरज आहे. त्यामुळे सर्व लेकींचे जन्मणे आणि जगणे हे नैसर्गिक असले पाहिजे.”

मी मांडलेल्या या विचारांचे सर्वांनी स्वागत केले.

कृतज्ञता व्यक्त करताना माझ्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणाच्या पालक व शिक्षक यांचे मी मनापासून आभार मानले.

हे निबंध सुद्धा वाचा-