बाकाचे आत्मकथन मराठी निबंध | वर्गातील बाकाचे आत्मकथन मराठी निबंध

वर्गातील बाकाचे आत्मकथन मराठी निबंध – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “बाकाचे आत्मकथन मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • बाकाची अस्वस्थता
  • वर्गाच्या विरहाचे दुःख
  • वर्गातील भांडणे, मस्ती अनुभवणे
  • वर्गातील रंगीबेरंगी दिवस
  • अभ्यासाच्या तासाची आठवण
  • मुलांच्या गजवजाटाचा अनुभव

बाकाचे आत्मकथन मराठी निबंध | वर्गातील बाकाचे आत्मकथन मराठी निबंध

ये, ये मित्रा! बस, बस इथे. काहीही इकडेतिकडे बघू नकोस, मी, मी तुझ्या वर्गातला हा बाक बोलतोय.

मला आता इथून हलवणार आणि गावातल्या एका सभागृहात माझी रवानगी करणार आहेत, असे कळल्यापासून मी अस्वस्थ झालोय. अरे, तुमच्या संगतीत असताना दिवस कसा फुलपाखरासारखा भिरभिरत निघून जातो. रात्री दिवसभराच्या आठवणी

काढत काढत थोडी विश्रांती घेतो. दुसरा दिवस रंगीबेरंगी क्षण घेऊन येणार असतो. त्या कल्पनेतले सुख मनात तरळत असते; म्हणून रात्रही सुखात जाते.

आता मात्र हे संपणार! तुमच्याबरोबरचे दिवस आठवले की मन भरून येते! तुमची गडबड, तुमचा गोंधळ, आरडाओरड, हाकारे यांनी सगळी खोली भरून जाते. थट्टा-मस्करी, विनोद, हास्याचे फवारे, हास्याचा गडगडाट यांनी आसमंतही सुखावतो. शिक्षक वर्गात येताच सगळे शांतपणे अभ्यासाला लागता.

आज मी शाळेच्या स्टोअररूमच्या एका कोपर्‍यात पडलेला एक जुना तुटलेला बाक आहे. मुले माझ्यावर बसण्यासाठी एकमेकांमध्ये भांडायची. जसजशी वर्षे गेली तशी विद्यार्थी माझ्या वर्गातील इतर बाकांप्रमाणे मी ही जुना होऊ लागलो.

काहींनी माझ्यावर लिहिलं तर काहींनी ब्लेड किंवा कंपास वापरुन माझ्यावर ओरखडा केला, ज्यामुळे मी खूप कुरुप झालो. विद्यार्थ्यांचा एक विशिष्ट गट खूप खोडकर होता आणि ते माझ्यावर उड्या मारुन खेळ खेळायचे. अशाप्रकारे मी तुटून पडलो आणि सध्या मी जिथे आहे तेथे हलविण्यात आले.

किती छान वाटते हे पाहन! तशा काही जणांच्या लबाडी, खोटेपणा, भांडणे हेही पाहिले आहे मी. या वाईट गोष्टीसुद्धा दिसतात, नाही असे नाही. पण खरे सांगू का? त्या क्षणभंगुर असतात. तुमचा आनंदोत्साह हाच चिरंतन असतो इथे.

या चिरंतन सुखाला आता मी मुकणार आहे. याचे मला दुःख होत आहे.

यूट्यूब व्हिडिओ

हे निबंध सुद्धा वाचा –