पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन | ESSAY ON COPPER VESSEL IN MARATHI

पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन | ESSAY ON COPPER VESSEL IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON COPPER VESSEL IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • आजीने हौसेने आणलेली भांडी
  • पितळी भांड्यांचे अनेकविध उपयोग
  • भांड्यांची घेतलेली काळजी
  • भांड्यांना केलेली कल्हई
  • स्वयंपाकखोलीचे किचनमध्ये रूपांतर
  • पितळेच्या भांड्यांची खंत
  • जुने दिवस पुन्हा येण्याची आशा

पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन | ESSAY ON COPPER POT IN MARATHI

पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन

“ऐकलंत का रे सगळ्यांनी; आता या घराचे नूतनीकरण होणार आहे म्हणे!” अरे बापरे! म्हणजे आपल्या

उरल्यासुरल्या भावंडांना दुकानात विक्रीसाठी पाठवणार. घरात नव्या पद्घतीची भांडी आणायला हवीत; अशी वहिनीची कुरकूर चालू होतीच. म्हणजे आपला पितळी धातूचा जमाना संपला, असे म्हणायला हरकत नाही.

मला आठवतंय, खूप वर्षांपूर्वी आजीने किती हौसेने आम्हांला विकत आणले होते. स्वयंपाकासाठी, पाणी साठवण्यासाठी,

वस्तू भरून ठेवण्यासाठी आम्हांला स्वयंपाकखोलीत मानाचे स्थान होते. घरातला रुचकर स्वयंपाक जेव्हा आमच्यामध्ये शिजायचा तेव्हा आम्हांला धन्य धन्य वाटायचे. किती मजेचे आणि मानाचे दिवस होते ते ! सणासुदीला श्रीखंड, बासुंदी, मसाला दूध यांनी आम्ही न्हाऊन निघायचो.

भरली वांगी, डाळिंबी, पंचामृत, डाळीची आमटी यांच्या वासाने आम्ही तृप्त असायचो. खरं तर आम्हाला गरम चुलीवर पदार्थ गरम करण्यासाठी पुन्हा पुन्हा ठेवत. आम्ही सारे लालबूंद होत असू. पण आलेले पाहणे बोटे चाटून जेवले की आजीचा समाधानी चेहरा पाहताना आम्हांला खूप बरे वाटे.

आजी आमची उत्तम बडदास्त ठेवत असे. आम्हांला दर दोन दिवसांनी चिंच-मीठ लावून लख्ख घासून घेतले जायचे. त्या वेळी स्वयंपाकखोलीतील फळी आमच्यामुळे झळाळून उठायची.

वर्षांतून एकदा आमची रवानगी कल्हईवाल्याकडे व्हायची. तो तर पेटत्या धगीवर भाजून काढत असे. त्यानंतर आतून चकचकीत कल्हई लावत असे. त्या वेळी चंदेरी रंगाच्या कल्हईमुळे आम्हांला नवे झगे घातल्यासारखे वाटे.

आता स्वयंपाकखोलीचे किचन झाले. पितळेच्या जागी स्टील आले आणि आता तर निर्लेप; बजाज आले. काचेची आणि सिरॅमिकची भांडी तर कपाटात जागा पटकावून बसलीच आहेत.

पण आम्हांला आशा आहे, लोकांना परत चुलीवरचे जेवण आवडायला लागले आहे. तसेच आमचा (पितळी भांड्यांचा) जमाना परत येईल.

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा-