गाईचे गार्‍हाणे मराठी निबंध | ESSAY ON COW IN MARATHI

गाईचे गार्‍हाणे मराठी निबंध | ESSAY ON COW IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “गाईचे गार्‍हाणे मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON COW IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • फटाक्याच्या आवाजाची भीती
  • मुक्या प्राण्याची काळजी घेण्याबद्दल विनंती
  • जीवाची भीती
  • रक्तदाब वाढण्याची काळजी
  • फटाके लावणाऱ्यांचा राग
  • अंधत्व, बहिरेपण येण्याची भीती

गाईचे गार्‍हाणे मराठी निबंध| ESSAY ON COW IN MARATHI

अरे, अरे मुलांनो, थांबा थांबा जरा! तुमची गंमत चालू आहे; पण माझा जीव चाललाय! माझं काळीज थरथरत. हातपाय लटलटताहेत. मी पळूही शकत नाही. फटाके लावू तरी नका किंवा मला तरी सोडा. तुम्ही पाहा कसें, फटाके लावता आणि दूर पळता. तुम्हांला तुमच्या जिवाची भीती वाटते ना! मलाही तशीच वाटत असेल, हे कळत कसं नाही तुम्हांला!

मी पळायचा खूप प्रयत्न केला. पण माझं दावं या खुंटीला बांधलेलं आहे ना ! जरा लांब तरी लावा रे. छे, छे! ही मुले ऐकायलाच तयार नाहीत. अरे बघा, बघा. तो तुमचाच एक मित्र तुम्हांला सांगतोय ‘असं करू नका’ म्हणून. त्याचं तरी ऐका.

किती दुष्टपणा हा! अरे, थोडा विचार करा. हे फटाके माझ्या अंगावर उडाले तर? मी भाजले, तर काय करणार? माझ्या जखमांकडे कोण लक्ष देणार? माझ्यावर उपचार कोण करणार? ते राहू दया. पण भाजल्यामुळे होणाऱ्या वेदना तुम्हांला कळतील? तुम्हां माणसांवर उपचार करायला हजारो डॉक्टर आहेत; शेकडो दवाखाने आहेत. माझ्यावर उपचार करायला कोण आहे?

फटाक्यांच्या आवाजाने माझा रक्तदाब वाढला आणि पटकन मेले, तर ? विचार केलाय का तुम्ही? या धूमऽऽ धडाम आवाजांनी मी बहिरी होईन.. तुम्हांला ते तर कधी कळणारच नाही.

तुम्ही खूप हाका माराल. पण मला ऐकूच येणार नाही, कारण मी बहिरी. पण तुम्हांला वाटणार, मी मुद्दामच हे असं करतेय. मग मला बेदम मार देणार! एखादी ठिणगी माझ्या डोळ्यांत उडाली तर ? तर मी आंधळी होईन. त्या वेळी उपचार काय करणार? कोणी नेत्रदान करणार का मला?

पण तसल्या शस्त्रक्रिया करण्याची सोय निर्माण केली आहे का तुम्ही? छे, छे. तुम्ही मला घरातून हाकलून दयाल, नाहीतर जंगलात सोडून दयाल.

थोडा तरी विचार करा. तुमच्या बाबतीत असं झालं तर काय होईल ? चालेल का तुमच्या आईबाबांना? आम्हांला बोलता येत नाही; पण आम्हांलासुद्धा तुमच्यासारखेच मन आहे. विचार करा, जरा विचार करा !

हे निबंध सुद्धा वाचा –