धान्याच्या रोपाचे आत्मकथन | ESSAY ON CROPS IN MARATHI

धान्याच्या रोपाचे आत्मकथन | ESSAY ON CROPS IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “धान्याच्या रोपाचे आत्मकथन” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON CROPS IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • वाऱ्यावर लवलवणारे पीक
  • बी पेरणी, मशागत
  • रोपांचे संगोपन
  • रोपांची लावणी
  • पाखरांची धाड
  • वारा, पाऊस यांना तोंड देणे
  • माणसांसाठी तग धरणे

धान्याच्या रोपाचे आत्मकथन

धान्याच्या रोपाचे आत्मकथन | ESSAY ON CROPS IN MARATHI

वाऱ्यावर होणारी माझी लवलव तुम्ही पाहिली की तुमचे सगळ्यांचे भान हरपते, हो ना? ती लय तुम्हांला सगळ्यांना आवडते. त्या वाऱ्याशी खेळत असतानाच नवी कणसे जन्म घेतात.

बालकणसाचा तुरा डोक्यावर नाचवताना; मला खूप आनंद होतो. माझ्या या आनंदाचा सोहळा जूनमध्ये बी पेरणीपासूनच सुरु होतो. बी पेरणी करण्यापूर्वी शेतकरीदादा जमिनीची मशागत करतो.

मे महिन्यात एका खाचरात शेणखत, पालापाचोळा पसरवतात. पालापाचोळा जाळतात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर नांगरणी आणि बी पेरणी होते. मग मी माती अलगद बाजूला करून सूर्यकिरणाच्या हेरवी, दिशेने वाढायला लागतो.

जमिनीच्या बाहेर आल्यावर माझे छान संगोपन होते. माझ्या आजूबाजूचे तण काढले जातात. फळे खात घातले जाते. आमच्यावर औषध फवारणी पण होते. त्या उ्र वासाने गुदमरायला होते. पण कीटकांच्या दंशापेक्षा औषध सहन करणे सोपे वाटते. काही दिवसांत मी रोपणीसाठी तयार होतो.

मला आणि माझ्याबरोबरच्या इतर रोपांना अलगद काढले जाते. आमचे ‘मुठे’ तयार केले जातात. त्याला ‘आवण’ म्हणतात.

मऊ चिखलात आमची लावणी होते. त्याच चिखलात इतर रोपांसह मी जीव धरतो, वाढतो आणि माझे धान्याच्या रोपात रूपांतर होते.

त्याच वेळी नवे कणीस जन्म घेत असते. चिमण्या, पाखरे, कावळे आमच्यावर धाड घालायला येतात. पोपट तर अख्खे कणीस पळवतात. मला त्या वेळी खूप वाईट वाटते.

पाऊस, वारा, सूर्यप्रकाश आम्हांला जगण्यासाठी संजीवनी आमची देतात. पण कधी कधी जोरदार वारा आणि पाऊस आम्हांला चिखलात लोळवतात. मग कसले पीक नि कसले काय?

अशा वेळी शेतकरी दादाचा चिंताग्रस्त चेहरा पाहवत नाही. तरीही, वादळ-वाऱ्याला तोंड देऊन माझे काही भाई-बांधव तुमच्यासाठी तग धरून जगतातच !

धान्याच्या रोपाचे आत्मकथन | ESSAY ON CROPS IN MARATHI या बरोबरच खालील निबंध सुद्धा वाचा.

हे निबंध सुद्धा वाचा –