डस्टरचे आत्मकथन | डस्टर चे आत्मकथा | ESSAY ON DUSTER IN MARATHI

डस्टरचे आत्मकथन | डस्टर चे आत्मकथा | ESSAY ON DUSTER IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “डस्टर चे आत्मकथा मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON DUSTER IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • फळा स्वच्छ ठेवतो.
  • वर्गात मस्ती करताना गैरवापर
  • डस्टरमुळे फळा देखणा
  • बेंचवर आपटला जाणे
  • स्वच्छतेसाठी उपयोग
  • चुका दुरुस्त करण्यासाठी उपयोग

डस्टरचे आत्मकथन | डस्टर चे आत्मकथा | ESSAY ON DUSTER IN MARATHI

बघितलतं, ही आहे रोहिणी. अहो, ती मॉनिटर आहे वर्गाची. बाई यायच्या आत ती वर्गात येते. मी डस्टर. माझी ती मदत घेते. माझ्या साहाय्याने फळा स्वच्छ पुसते. त्याच्यावर कोणतीही वेडीवाकडी खूण ठेवत नाही. मग सुंदर अक्षरांत इयत्ता,

तुकडी, मुलांची संख्या, दिनांक इत्यादी तपशील लिहिते. मग वर मध्यभागी एखादा सुंदर सुविचार लिहिते. फळा एकदम देखणा दिसू लागतो. म्हणजे बघा. तुमच्या दिवसाची, शाळेतल्या दिवसाची सुरुवात माझ्यापासून होते. तुमचा दिवस सुंदर व्हावा म्हणून पहिल्या क्षणापासून मी कामाला लागतो.

कल्पना करा की, रोहिणीने माझा उपयोग केलाच नसता तर? म्हणजे फळा पूर्ण पुसलाच नसता तर? मग त्यावर कितीही सुंदर अक्षरांत लेखन केलं असतं, तरी फळा सुंदर दिसला असता? नाही ना?

म्हणून लक्षात ठेवा, सौंदर्यनिर्मितीसाठी माझीच गरज असते. मी नसेन तर सौंदर्य निर्माणच होणार नाही. म्हणजे बघा, मी तुमचा दिवस प्रसन्न व्हावा म्हणून झटतो. माझा मुख्य उपयोग तुम्हांला माहीतच आहे. काहीतरी चुकलं की मी पुसून टाकतो. चुका दुरुस्त करतो.

म्हणजेच तुम्हांला जास्तीत जास्त अचूक ज्ञान देण्यासाठी मी साहाय्य करतो. ज्ञानातील जे अयोग्य, चुकीचे व दूषित आहे ते मी काढून टाकतो. म्हणजे तुमच्यापर्यंत शुद्ध ज्ञान पोहोचवतो. शुद्ध ज्ञानामुळे प्रगती होते. मी तुमच्या प्रगतीतला साथीदार आहे.

पण काहीजण माझा दुरुपयोग करतात. मला तुमच्या बाकांवर आपटून खडूची धूळ मुद्दाम पसरवतात. काहीजण तर दुसऱ्यांच्या कपड्यांवर खडूची धूळ पसरवतात. आपटून आपटून कर्णकटू आवाज करतात. पूर्वी तर एका शिक्षकांनी मला विद्यार्थ्यांवर फेकले होते आणि त्याला मारले होते त्या बिचार्याच्या कपाळाला जखम झाली होती.

भळाभळा रक्त वाहिलं होतं. हे सर्व वाईट आहे. तुम्ही असं करू नका. माझा योग्य उपयोग करा आणि आयुष्य सुंदर बनवा.

जे जे कुरूप आहे, ते ते जीवनातून काढून टाका आणि जे जे चुकीचे आहे, अज्ञान आहे, ते काढून टाका. तुमचे आयुष्य सुंदर व ज्ञानसंपन्न बनेल. हाच माझ्या जीवनाचा संदेश आहे.

हे निबंध सुद्धा वाचा –