ममते शिवाय समता नाही मराठी निबंध | ESSAY ON EQUALITY IN MARATHI

ममते शिवाय समता नाही मराठी निबंध | ESSAY ON EQUALITY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “ममते शिवाय समता नाही मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON EQUALITY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • मी दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ या भावनेतून विषमतेचा जन्म
  • जात, पंथ, पर्म, वर्ण
  • आर्थिक विषमता
  • एक माणूस दुसऱ्यावर अन्याय करतो
  • स्त्री-पुरुष भेद
  • कोणताही भेदभाव नको
  • आपण जगावे, इतरांना जगू दयावे

ममते शिवाय समता नाही मराठी निबंध | ESSAY ON EQUALITY IN MARATHI

‘आम्ही सारे बांधव आहोत. आम्ही एकाच देशाचे नागरिक आहोत,’ अशी प्रतिज्ञा आपण सारे दररोज शाळेत घेत असतो. पण खरोखरच आपले वर्तन त्यानुसार आहे का? प्रत्येकाने आपल्या मनाला हा प्रश्न विचारला पाहिजे व आपले आचरण चाचपून पाहिले पाहिजे.

भारत हा एक विशाल देश आहे. या देशात विविध पर्मांचे, जातींचे, पंथांचे लोक राहतात. किंबहुना या विविधतेचा आपल्याला अभिमान वाटतो. पण काही वेळेला आपले वर्तन याच्याशी विसंगत असते, लाजिरवाणे असते. माझी जात श्रेष्ठ, इतर लोक माझ्यापुढे कनिष्ठ असे काहींना वाटत असते.

काही लोकांना इतरांचा स्पर्श, इतरांची सावलीही रुचत नाही. हे असे का घडते? यामागे कोणते कारण असावे?

खरे तर सामाजिक जीवन सुव्यवस्थित राहावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी कामांची विभागणी केली. त्यावरून आपण वेगवेगळ्या जाती मानू लागलो. कालांतराने या जाती जन्मावरून वाट्याला येऊ लागल्या. मग त्यांतून समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठता ठरु लागली. हेच सामाजिक विषमतेचे मूळ आहे.

एक गोष्ट नक्की की, कामाची विभागणी ही केवळ सोय आहे. कुणीही श्रेष्ठ नाही, कुणीही कनिष्ठ नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही काम हे कमी प्रतीचे नाही, हलके नाही. असे काम करणाऱ्याला कनिष्ठ मानणे हे चूक आहे, हे जाणूनच आपल्या घटनेने सर्वांना समान हक्क दिले आहेत. प्रत्येकाला आपल्या विकासाची समान संधी आहे.

जाती, धर्म, पंथ, वर्ग यांवरून समाजात जशी विषमता केली जाते तशीच विषमता, तसाच भेदभाव काही वेळेला आर्थिक स्थितीवरूनही केला जातो. अनेकदा धनिक स्वत:ला गरिबांपेक्षा श्रेष्ठ समजतात.

मालक नोकरांना तुच्छ लेखतात. काही ठिकाणी आजही जमीनदार आपल्या सेवकांना गुलामाप्रमाणे वागवतात. सावकार ऋणकोची गळचेपी करतात. अशा तर्‍हेचे वर्तन समाजाची निकोप वाढ होण्याच्या दृष्टीने घातक ठरते.

स्त्री-पुरुष भेदभावही काही समाजात आढळतो. मग स्त्रीला ‘पायातली वहाण’ असे मानले जाते, हेही त्या समाजाला लाजिरवाणे आहे. हीसुद्धा सामाजिक विषमताच आहे.

तेव्हा अशा प्रकारची कोणतीही विषमता समाजविकासाला घातक आहे. हेच प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. कुणीही ‘कानूस’ होऊ नये, असे कवयित्री बहिणाबाई चौधरी विनवते. आपण जगावे व इतरांनाही जगू दयावे.

हे निबंध सुद्धा वाचा –