कुंडीचे आत्मकथन मराठी निबंध | ESSAY ON FLOWER POT IN MARATHI

कुंडीचे आत्मकथन मराठी निबंध | ESSAY ON FLOWER POT IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “कुंडीचे आत्मकथन मराठी निबं” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON FLOWER POT IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • मानवाजवळ राहण्याचे भाग्य
  • वांग्याचे रोपटे असलेली कुंडी
  • (माती) पृथ्वीचे लहान रूप
  • गच्चीतल्या शेतीसाठी उपयोग
  • मोठे वृक्ष लावण्यासाठी उपयोग

कुंडीचे आत्मकथन

अहो, शुक् शुक्! तुमच्याशीच बोलत्येय मी. नेहमीची कंडी नव्हे मी, बरं का! मला खात्रीच आहे. तुमचा गैरसमज झाला असणार. तुम्हाला वाटलं असणार की, या कुंडीत तुळस असेल, नाहीतर एखादे फुलझाड असेल किंवा एखादे शोभेचे रोपटे असेल.

तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका. माझ्याकडे नीट बघा. बघितलंत? माझ्यामध्ये रोपटे कोणते आहे, कळले ना! तुमच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसतंय. होय, हे वांग्याचे रोपटे आहे. वांग्याच्या रोपट्यांचा

वाफाच असतो. मग हे कसं काय? ही कमाल आहे गच्चीतील शेतीची ! गच्चीतील शेती म्हणजे शहरातील शेती. काहीजणांनी गच्चीत अनेक कुंड्या ठेवून त्यांत विविध फळभाज्यांची लागवड केली आहे.

त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी घरातच माझी प्रतिष्ठापना केली. भाज्यांची रोपे लावली आणि आता रोज ते घरगुती भाज्या खाताहेत.

खरे वाटत नाही ना! भाज्याच काय, आंब्या -फणसाची झाडेही मी वाढवते – जोपासते. मग घरातच पिकलेली फळे तुम्ही खाऊ शकता. अहो याच झाडांचे काय घेऊन बसलात? वाटेल ते रोप मी वाढवते. अगदी वडा-पिंपळाचेही!

या मोठ्या झाडांना कुंडीत वाढवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. ती पाळली की कोणीही ही शेती घरात करू शकते. कोणीही घरातील ताज्या भाज्या जेवणात वापरू शकतील.

ही आहे माझी -या कुंडीची -किमया. मी आहे पृथ्वी. पृथ्वीचे अतिशय लहान रूप. तुम्ही माणसांनी निसर्गावर अत्याचार केलेत. निसगांपासून दूर गेलात. म्हणून मीच आता निसर्गाला तुमच्या घरात आणत आहे. त्याला जवळ करा आणि आपले जीवन सुखी करा.

हे निबंध सुद्धा वाचा –