कोल्ह्याला द्राक्षे आंबट (कोल्ह्याचे आत्मकथन) | ESSAY ON FOX IN MARATHI

कोल्ह्याला द्राक्षे आंबट (कोल्ह्याचे आत्मकथन) मराठी निबंध| ESSAY ON FOX IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “कोल्ह्याला द्राक्षे आंबट (कोल्ह्याचे आत्मकथन) मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON FOX IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • उंचीवर असणाऱ्या वेलींचा राग
  • आंबट द्राक्षांचा मोह सोडणे
  • द्राक्षे मिळवण्याचे सर्व प्रयत्न कुचकामी
  • उड्या मारण्याचा प्रयत्न निष्फळ
  • द्राक्षे खाण्याची तीव्र इच्छा

कोल्ह्याला द्राक्षे आंबट (कोल्ह्याचे आत्मकथन) मराठी निबंध | ESSAY ON FOX IN MARATHI

छे, छे! दमलो, दमलो मी. किती उड्या मारायच्या? ही माणसं तरी किती लबाड! कोणाच्या हाती लागू नयेत, म्हणून द्राक्षांची वेल उंचावर लावली आहे. इतक्या उड्या मारल्या, पण अजून एकही द्राक्ष मिळालेलं नाही. काय करावं बरं? तुम्ही नेहमी म्हणता ना, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे!

मी काय कमी प्रयत्न केले? द्राक्षांच्या घोसाखाली उभा राहून उड्या मारल्या. उंच उडी मारणारा धावपटू जसा लांबून धावत येतो आणि उडी मारतो, तसं मीही करून पाहिलं. पण व्यर्थ! आणखी किती वाळू रगडायची? घाम मात्र बराच गळला!

तुम्ही माणसंसुद्धा बिलंदर, स्वार्थी. द्राक्षांच्या वेली तुम्ही लावल्या, कबूल. त्यांना खतपाणी धातलं, निगराणी केली, हेही कबूल, पण त्या वेलींवर द्राक्षे कोण निर्माण करतो? तुम्ही? सांगा, सांगा. आता बोला. आता का आवाज बंद झाला ? निसर्गच ही फळंफुलं निर्माण करतो ना?

मग त्या द्राक्षांवर फक्त तुमचाच हक्क कसा काय? आम्हीसुद्धा निसर्गाची लेकरं आहोत. आमचाही हक्क आहे त्या द्राक्षांवर. पण तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही स्वा्थीच आहात.

ते जाऊ द्या. आता मला स्वत:लाच प्रयत्न करावे लागणार, अरे हो, पण किती प्रयत्न करायचे? हा खांबसूदधा मी हलवला. एक तरी द्राक्षं पडेल तर शप्पथ. अरे, हो, द्राक्षे पडतील तरी कशी? बघा, बघा.

अजून ती हिरवी हिरवीगार दिसताहेत. आकाराने सुद्धा लहान आहेत. म्हणजे अजून पिकलेली नसणार, कच्ची काढून काय उपयोग! ती आंबटच असणार. छे, छे. मीच वेडा आहे. या आंबट द्राक्षांसाठी किती धडपडत होतो! मला नकोच ती आंबट द्राक्षे!

हे निबंध सुद्धा वाचा –