गणेशोत्सव मराठी निबंध | Essay on Ganesh Utsav In Marathi

गणेशोत्सव मराठी निबंध | Essay on Ganesh Utsav In Marathi  नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये गणेशोत्सव या विषयावर सविस्तर निबंध मिळेल, 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव चे महत्त्व, इतिहास यावर विसतृत माहिती लिहीलेली आहे, तसेच गणेशोत्सवातील मज्जा, गमती जमती यांवरही या चर्चा केलेली आहे.

Essay on Ganesh Utsav In Marathi

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • सुखद अनुभव
  • गावकऱ्यांचा सहभाग
  • आनंददायी मिरवणूक व आरास
  • शहरातील गणेशोत्सव
  • गावातील घरगुती गणेशोत्सव
  • घरगुती खाद्य- पदार्थ

गणेशोत्सव मराठी निबंध | Essay on Ganesh Utsav In Marathi

“गणपतीबाप्पा मोरया!” असे ऐकू आले आणि मी गॅलरीत धावलो. ढोल-ताशे, गुलाल, बेभान नृत्य त्यात मोठ्ठे गणपतीबाप्पा, अशी मिरवणूक दिसली की मला खूप बरे वाटते. शहरात सण म्हणजे रोषणाई, थाटमाट आणि गोंगाट यांची अक्षरशः रेलचेल असते. त्यामुळे सण असाच साजरा करायचा हे माझ्या मनात निश्चित झाले होते.

काल आईबाबांनी फर्मान सोडले! ह्या वर्षी गणपतीसाठी गावी जायचे. पालघर जिल्ह्यातील चिंचणी हे आमचे गाव. सुरुवातीला आम्ही कुरकुर केली पण आईबाबा त्यांच्या निर्णयावर ठाम!

गणपतीला गावी पोहोचलो. मनात थोडी नाराजी होती. अंगणात शिरलो तेव्हा मुगाच्या पिठाचा सुगंध दरवळत होता. साजूक तुपात आजी पीठ भाजत होती. दोन्ही काकू चिवडा करण्याची तयारी करीत होत्या. एका बाजूला नारळ खवला जात होता. मोदकाची तयारी सुरू होती. एकंदरीत गणपती खाद्य मेजवानी ची जय्यत तयारी दिसत होती.

टाळ, मृदंग आणि आरती यांच्या जयघोषात सकाळी गणपतीबाप्पाचे आगमन झाले.

बाबासह सगळ्यांनी पगडी, सोवळे आणि उपरणे परिधान केले होते. समस्त महिलामंडळ नथ, नऊवारी, अंबाडा त्यावर वेण्या यांनी सजल्या होत्या.

गणेश मखराची आरासही खास होती. पळसाची पाने, कमळे आणि घाणेरीच्या फुलांचे रंगीबेरंगी गुच्छ यांच्या साहाय्याने सुंदर व कल्पक सजावट केली होती. पगडी, भिकबाळी घातलेली गणपतीची छोटीशी मूर्ती त्यात साजत होती.

सकाळी आरती, श्लोक पठण यांनी सगळे घर मंगलमय झाले होते. आरतीला तर गावातील शेतकरी, शेतमजूर सारेच जमले होते. गणपती पुढे आपल्या बाडीतील शिराळी, काकडी, भोपळा, नारळ पपनस भक्तिभावाने ते अर्पण करीत होते. मी रोक माझ्यासाठी हा नवा अनुभव होता. “आपल्या परसातील पहिली भाजी देवाला वाहायची प्रथा आहे, ” असे बाबा म्हणाले.

रात्री सर्व गावकऱ्यांनी छान भजने गायली. त्यानंतर उकडीचे मोदक, चिवडा, मुगाचे लाडू व खमंग काकडी असा मस्त बेत होता. आम्ही सर्वांनी त्यावर ताव मारला.

दुसऱ्या दिवशी विसर्जन सोहळा होता. लेझिमच्या तालावर आम्ही सारेच नाचलो. समुद्रकाठी विसर्जन हौद तयार केला होता. गणपती बाप्पाचे विसर्जन तेथेच करण्यात आले.

इतका देखणा आणि भावभक्तीने भारलेला गणेशसोहळा मी पहिल्यांदाच अनुभवला. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आईबाबा सुखावले.

आता दरवर्षी चिंचणीला गणेशोत्सवाला जायचे हे मी मनाशी निश्चित केले.

हे निबंध सुद्धा वाचा-