झाडे बोलू लागले तर मराठी निबंध | JHADE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI

झाडे बोलू लागले तर मराठी निबंध | JHADE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “झाडे बोलू लागले तर मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये JHADE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • मैत्रीचे नाते
  • उन्हाचे चटके
  • माणसाला फळे, फुले
  • झाडांची सावली
  • पक्षी-प्राणी संगोपन + झाडांची लागवड

झाडे बोलू लागले तर मराठी निबंध | JHADE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI

या वर्षी उन्हाच्या झळा सहन होत नाहीत. छे बुवा! खूपच गरम होते आहे. सावलीसाठी फारशी झाडेही कुठे दिसत नाहीत. कोठे गेली सगळी झाडे? जेव्हा अशी उष्णता वाढते; चटके बसू लागतात; तेव्हा झाडांच्या सावलीची आठवण येऊ लागते.

पावसाचे प्रमाण कमी झाले की झाडांची आठवण येते. अशा वेळेस झाडे बोलू लागली तर म्हणतील – तुम्हांला गरज लागली की आमचा शोध घेता.

आम्ही असे पटकन कसे उपलब्ध होणार? आमची दरवर्षी लागवड करा. आमचे संगोपन करा. मग बघा, काही वर्षांतच आम्ही तुमची सेवा करायला तत्पर असू.

आमच्या अंगाखांदघावर पक्षी, कीटक आनंदाने राहतात. आमची फळे, फुले, कोवळी पाने त्यांना खायला अनेक प्राणी, वाटसरू आमच्या सावलीत विसावतात. आम्हा सर्व झाडांना यामुळे खूप बरे वाटते.

आम्ही तुम्हांला विविध चवींची फळे देतो. रंगीबेरंगी फुले देतो. औषधी वनस्पती देतो. थंडगार सावली देतो. जमिनीतील मिळतात.

माती घट्ट धरून ठेवतो. या सर्व गोष्टी करताना आम्ही मनोमन सुखावतो. दरवर्षी २ कोटी, ३ कोटी झाडे लावण्याचा जोरदार संकल्प तुम्ही करता, पण आमची कत्तल करायलाही कचरत नाहीत.

शहरीकरणासाठी आमच्या अनेक बांधवांचा अक्षरश: बळी गेला आहे. “तुम्हांला सुखाने जगायचे असेल, तर आम्हांला वाचवा!”

तुमचे आणि आमचे मैत्रीचे नाते अनेक वर्षे असेच राहो हीच इच्छा!

यूट्यूब व्हिडिओ

हे निबंध सुद्धा वाचा –