मुक्या प्राण्यांवर दया करा (बेडकाची कैफियत) | जगा आणि जगू द्या निबंध मराठी

मुक्या प्राण्यांवर दया करा (बेडकाची कैफियत) | जगा आणि जगू द्या निबंध मराठी – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “मुक्या प्राण्यांवर दया करा (बेडकाची कैफियत) मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये जगा आणि जगू द्या निबंध मराठी यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • बेडकाची तक्रार
  • कोणालाही त्रास न देणारा प्राणी
  • माणसाची कीव वाटणे.
  • पाणी शुद्ध करतो.
  • पिकांचे संरक्षण करतो.
  • संवेदनशील बनण्याची इच्छा व्यक्त

मुक्या प्राण्यांवर दया करा (बेडकाची कैफियत) | जगा आणि जगू द्या निबंध मराठी

अर्ग आई ग! मेलो, मेलो! वाचवा, वाचवा मला! अहो, बचत काय राहिलात नुसते ? हा दुष्ट मुलगा मला दगड मारतोय. मला वेदना होताहेत. अहो, कुणी याला सांगत का नाही? कोणीच कसं लक्ष देत नाही. मोठ्या माणसांनी याच्यावर काही संस्कार केलेच नाहीत का?

सांगा बघू, मी तुमचा शत्रू आहे का? मी सापासारखा विषारी आहे का? मी तुम्हांला दंश करतो का? कुत्र्या-मांजरासारखा चावतो का? वाघ-सिंहासारखा तुम्हाला खाऊन टाकतो का ? ती माकडे तुमचं किती नुकसान करतात! तस मी करतो का? मी एक अत्यंत गरीब प्राणी, तरी मला छळता!

या मुलाचा खेळ होतोय. बघा, कसा हसतोय मला दगड मारताना. पण माझा जीव जातो त्याचं काय? दोन-तीन दगड लागले तर मी मरून जाईन. अहो, सांगा, सांगा याला कोणीतरी. मी तुमचा शत्रू नाही. तुम्हाला त्रास देत नाही. मी तुमचा मित्र आहे. होय, होय मी तुमचा मित्रच आहे.

विहिरी-तळ्यांमध्ये मी राहतो. तिथे पाण्यातले कृमिकीटक मी खातो. पाणी शुद्ध करतो. ते कोणासाठी? तुमच्यासाठीच ना? तुमच्या शेतात मी वावरतो, तेव्हा तेथील कृमिकीटक खातो. तुमच्या पिकांचे रक्षण करतो. याचा उपयोग तुम्हांलाच होतो ना?

तुम्हाला कोणी असा दगड मारला तर चालेल? तुम्ही कळवळणार नाही? तुम्हांला वेदना होणार नाहीत? आम्ही मुके प्राणी म्हणून आम्हाला त्रास देता का? तुम्ही बुद्धिमान प्राणी ना? मग तुम्हांला स्वतःवरून दुसऱ्याची दुःखं ओळखता येत नाहीत? शिका, शिका. दुसऱ्यांची दुःखं ओळखायला शिका.

संवेदनशील व्हा. संवेदनशील बनला नाहीत आणि अशा प्रकारे मुक्या प्राण्यांना त्रास देत राहिलात, तर हळूहळू क्रूर बनत जाल, मग तुम्ही एकमेकांनाच माराल.

म्हणून सावध व्हा, सावध व्हा. संवेदनशील बना. दुसऱ्यांवर प्रेम करायला शिका.

हे निबंध सुद्धा वाचा –