क्रीडांगणाचे मनोगत निबंध मराठी | ESSAY ON KRIDANGANACHE MANOGAT IN MARATHI

क्रीडांगणाचे मनोगत निबंध मराठी | ESSAY ON KRIDANGANACHE MANOGAT IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “क्रीडांगणाचे मनोगत निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल,

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON KRIDANGANACHE MANOGAT IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • मुलांशी गप्पा मारण्याची हौस
  • कचरा, घाण, वृक्षतोड यांमुळे दुःख
  • महान खेळाडू तयार झाल्याचा अभिमान
  • डेरेदार वृक्षवैभव
  • जागा बळकवण्याची कारस्थाने
  • ज्येष्ठ नागरिकांचा फेरफटका

क्रीडांगणाचे मनोगत निबंध मराठी | ESSAY ON KRIDANGANACHE MANOGAT IN MARATHI

हे पाहा मुलांनो! अरे, इकडेतिकडे पाहू नका. बावरू नका. तुम्ही जिथं उभे आहात ना, ते मैदानच, म्हणजे मी तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही खेळण्यासाठी मित्रांची वाट पाहत आहात ना ? म्हटलं, तेवढ्यात तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात. म्हणून तुम्हाला हाक मारली!

अरे मुलांनो, तुम्ही माझ्याजवळ आलात की मी खुशीत असतो. तुमच्यासारखी खूप मुलं यावीत असंच मला वाटत असतं. मुलं असतील तर खरं चैतन्य संचारतं माझ्यात.

माझा जन्म झाला तेव्हापासून आजपर्यंत शेकडो, नव्हे हजारो मुलं इथून खेळून गेली आहेत. तुम्हांला ठाऊक नसेल कदाचित, वाडेकर, गावस्कर, वेंगसरकर, तेंडुलकर वगैरे खेळाडू नावाजलेले नव्हते; तुमच्यासारखे साधे विद्यार्थी होते, तेव्हा ते येथे, माझ्या अंगाखांद्यावर खेळले आहेत.

मला त्यांचा खूप अभिमान है. वाटतो. कधीही त्यांची नावं ऐकली की ऊर भरून येतो!

मी किती मोठं कार्य करतो ठाऊक आहे? मुलांच्या खेळण्याची सोय तर मी केलेलीच आहे. शिवाय, माझ्या काठाकाठाने मोठमोठे डेरेदार वृक्ष डौलात उभे आहेत. या परिसराचं मोठं वैभव आहे ते. संध्याकाळी लहान मुलं व महिलासुद्धा येथे विरंगुळ्यासाठी येतात. सकाळी व संध्याकाळी फेरी मारण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तर आवर्जून येतात.

इमारतींनी भरलेल्या या परिसरात ही माझी जागाच तेवढी मोकळी आहे. काहीजण त्यामुळेच हे मैदान म्हणजे या परिसराचं फुप्फुस आहे, असं म्हणतात. केवढा हा माझा सन्मान!

मात्र अलीकडे मला वेदना होऊ लागल्या आहेत. काही दुष्ट लोक माझे लचके तोडत आहेत. मला बळकावण्याचं कारस्थान चालू आहे. शिवाय सगळेजण येऊन येथे घाण करतात. सकाळी तर दुर्गंधी पसरते! फेरीवाले, भिकारी यांनीही माझे लचके तोडण्याचे काम चालू ठेवलं आहे. काहीजण इथली झाडही अकारण तोडत असतात.

असं दुर्दशेत राहण्यापेक्षा माझा उपयोग फक्त मुलांना खेळण्यासाठीच असेल, असा कायदा केला तर किती बरं होईल ?

हे निबंध सुद्धा वाचा –