माझी लढाई मराठी निबंध | ESSAY ON MAJHI LADHAI IN MARATHI

माझी लढाई मराठी निबंध | ESSAY ON MAJHI LADHAI IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये माझी लढाई या विषयावर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये माझा संघर्ष   एका आजारपणाशी कसा झाला, मी त्यातून काय शिकलो, कसे बाहेर पडलाे व कसा प्रवास केला यांवर सविस्तर चर्चा केलेली आहे.

माझी लढाई मराठी निबंध | ESSAY ON MAJHI LADHAI IN MARATHI

ESSAY ON MAJHI LADHAI IN MARATHI

सकाळी अंथरुणात मी डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहतो, तर औषधे, सलाईन, नर्स, डॉक्टर, चिंताक्रांत आईबाबा असे सारे दिसले. मला काही कळेना! आई सारखी विचारत होती-‘मी कोण आहे? मला ओळखतोस ना?

माझ्या लक्षात आले आई असे का विचारत होती ते. फुटबॉल खेळताना मित्राच्या पायात पाय अडकून मैदानावर पडलो होतो; तेव्हापासून मी बेशुद्धच होती आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. शुद्धीवर आलो तेव्हा लक्षात आले डावा पाय आणि डावा हात प्लॅस्टरमध्ये आहे. पायाचे ऑपरेशन करावे लागले होते. ‘पुढील सहा महिने मैदानावर खेळता येणार नाही, डॉक्टरांचे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि मनाशी ठरवले आता या परिस्थितीशी लढायचे आणि जिंकायचेही! आईबाबांनी माझी समजूत घालण्यापूर्वीच मी स्वतःला सावरले. त्यांनाही माझ्या या वागण्याचे समाधान वाटले.

मला माझी शाळा, वर्ग, मैदानावरचे स्वच्छंदी धावणे हे सगळे घरी बसल्यावर आठवू लागले. सहली, ट्रेक या सगळ्या गोष्टी आठवणींची शिदोरी बनले होते. शाळेतील मी फुटबॉल चॅम्पियन! सर्वांत अधिक गोल करणारा विक्रमवीर! सध्या फक्त आठवणींवर दिवस घालवत होतो.

माझ्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग निबंध
,प्रसंगलेखन मराठी
,प्रसंग लेखन मराठी कौतुक सोहळा
,प्रसंग लेखन मराठी 10वी
,प्रसंग लेखन मराठी माझे बालपण
,प्रसंग लेखन म्हणजे काय
,प्रसंग लेखन हिंदी
,माझी लढाई मराठी निबंध
,माझी लढाई निबंध
,ESSAY ON MAJHI LADHAI IN MARATHI
,essay on my fight in marathi
,my struggle essay in marathi
,marathi essay on my fight
,marathi essay on majhi ladhai
,marathi nibandh majhi ladhai,
majhi ladhai marathi nibandh,

दोन दिवसांनी माझ्या मित्रांनी माझ्या घराचे दार ठोठावले. बास्केटबॉल, कॅरम बोर्ड, रंग, ब्रश यांच्यासह मित्रमैत्रिणींचे टोळके माझ्या खोलीत आले. शाळेतल्या गप्पा, अभ्यास, बैठे खेळ, गाणी यांनी माझी खोली दुमदुमली. मी चालू-फिरू लागेपर्यंत हे रोज चालू होते.

एका बाजूला फिजिओथेरपी चालू होती. थेरपी चालू असताना वेदना व्हायच्या, चालताना तोल जायचा, पण सगळे सहन करीत गेलो. औषधे, आहार काटेकोरपणे सांभाळत गेलो फुटबॉल प्रशिक्षक मदने सर रोज माझे मनोबल वाढवायचे.

सहा महिने कसे गेले कळलेच नाही. आता मी शाळेत चालत जाऊ लागलो आहे. माझे पाय भक्कम होत आहेत, हे माझे मलाच जाणवत आहे. फक्त थोडे दिवस थांबा. मी तुम्हांला माझ्या लाडक्या फुटबॉल मैदानावर दिसणार आहे!

हे निबंध सुद्धा वाचा-