मी चहा बोलतोय मराठी निबंध | MI CHAHA BOLTOY NIBANDH IN MARATHI

मी चहा बोलतोय मराठी निबंध | MI CHAHA BOLTOY NIBANDH IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “मी चहा बोलतोय मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये MI CHAHA BOLTOY NIBANDH IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

मी चहा बोलतोय मराठी निबंध | MI CHAHA BOLTOY NIBANDH IN MARATHI

तुमची नि माझी खूप गट्टी आहे. कारण तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवातच मुळी माझ्या, म्हणजे चहाच्या सेवनाने होते.

चहाचा एक कप घेतल्याशिवाय तुमच्या कामाला सुरुवात होत नाही. कचेरीत काम करताना किंवा अभ्यास करताना कंटाळा आला की, तुम्ही माझी आठवण काढता. एक कप गरमागरम चहा मिळाला की, पुन्हा कामाला, पुन्हा अभ्यासाला सुरुवात!

संध्याकाळी कामावरून दमून परत आल्यावर पुन्हा माझी आठवण होतेच. तुमच्यासाठीच मी दूरवरून येतो. तुमची आणि माझी पहिली ओळख करून दिली ती चिनी प्रवाशांनी.

आसाममधील एका मळ्यातल्या छोट्या झुडपावर माझा जन्म झाला. स्थानिक स्त्रिया आमच्या खुडणीचं काम करतात. दोन्ही हातांनी पानं खुडून त्या पाठीवरच्या टोपलीत टाकतात. तेथून आमची रवानगी कारखान्यात होते. पुढील सर्व कामं कारखान्यात चालतात.

यंत्राच्या साहाय्याने पानं वळवणं, वाळवणं वगैरे सोपस्कार होतात आणि मग खास खोक्यांतून आम्हांला देशोदेशी पाठवलं जातं. तेव्हा तेथे आम्हाला विविध नावे मिळतात. आज भारतात आमची एवढी विपुल निर्मिती होते की, परदेशात आमची निर्यात होते. भारताला आम्ही भरपूर परकीय चलन मिळवून देतो.

आज मला जगात सर्व ठिकाणांहून मागणी आहे. श्रीमंतांच्या महालापासून गरिबांच्या झोपडीपर्यंत सर्वत्र माझे कायमचे वास्तव्य असते. माझ्यापासून पेय बनवण्याच्या विविध पद्धती आढळतात. बहुसंख्य लोक पाणी, दूध, साखर यांचा चहापेय बनवण्यासाठी उपयोग करतात.

काही देशांत चहात लिंबू, लोणी टाकतात; तर काहीजण मीठ टाकून चहाला नमकीन बनवतात. कुणाला चहा फार कडक लागतो; तर कोणाला अतिशय सौम्य लागतो.

तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण समारंभांची लज्जत वाढवण्यात तुम्हाला माझी मोलाची मदत होते. अशी आहे ही तुमच्या-माझ्यातील दोस्ती!

हे निबंध सुद्धा वाचा –