माझे बालपण मराठी निबंध | ESSAY ON MY CHILDHOOD IN MARATHI | MAJHE BALPAN MARATHI NIBANDH

माझे बालपण मराठी निबंध | ESSAY ON MY CHILDHOOD IN MARATHI | MAJHE BALPAN MARATHI NIBANDH – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये माझे बालपण यावर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये माझे बालपण यावर विसतृत माहिती लिहीलेली आहे, तसेच बालपणातील आठवणी, गमती जमती व मज्जा यांवरही यामध्ये चर्चा केलेली आहे

माझे बालपण मराठी निबंध | ESSAY ON MY CHILDHOOD IN MARATHI | MAJHE BALPAN MARATHI NIBANDH

माझे बालपण मराठी निबंध

आसपासची लहान मुले आणि त्यांचे खेळ पाहिले की, माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. त्या आठवणींमध्ये काही काळ तरी मी हरवून जातो. मला माझे सगळे बालपण नक्कीच आठवत नाही. पण आठवतात त्या थोड्या आठवणीसुद्धा मला काही काळ सुखावतात.

जुन्या आठवणींना उजाळा, विहिरीत उतरण्याचा अनुभव

ESSAY ON MY CHILDHOOD IN MARATHI

कितीतरी आठवणींनी माझे बालपण सजले आहे. एकदा आमच्या विहिरीतला गाळ काढण्याचे काम चालू होते. माझे बाबासुद्धा विहिरीत उतरले होते. मी काकुळतीला येऊन मलाही विहिरीत उतरवायला सांगत होतो. मग बाबांना अचानक काहीतरी सुचले. त्यांनी माझ्या एका काकांना सांगितले, “रहाटाला बादली बांध. तिच्यात त्याला बसव आणि खाली सोड. मग मी एखाद्या सम्राटासारखा विहिरीत उतरलो होतो! त्या वेळच्या माझ्या मित्रांच्या आरोळ्या अजूनही मला आठवतात.

माझा भित्रा स्वभाव, आजोबांच्या गोड आठवणी

एकदा झाडावर चढलो. थोड्या अंतरावर गेलो. पण उतरता येईना म्हणून भीतीने थरथरत मोठमोठ्याने रडलो. मित्रांनी केवढी बट्टा केली! नदीत उतरल्यावर मासे गुदगुल्या करतात म्हणून नदीतून एकदा पळालो होतो. माझ्या हातातले घावणे

माकडांनी एकदा पळवले. म्हणून मी कित्येक दिवस माकडांच्या टेकडीकडे फिरकलो नाही. दुधावरच्या सायीचा आनंद तर अवर्णनीय आहे. हा आनंद मला माझ्या बालपणाने दिला आहे. त्या काळात मी रोज सकाळी वाड्याकडे धाव घेत असे आणि आजोबांनी माझ्यासाठी खास राखून ठेवलेल्या पेलाभर सायीचा आस्वाद घेत असे. आजोबा गुरांच्या रक्षणासाठी रात्री वाड्यावर झोपायला जात. सकाळी मी साय मटकावली की, आम्ही दोघे आनंदाने घरी परतत असू.

माझे बालपण म्हणजे आठवणींचा ताजमहाल आहे!

हे निबंध सुद्धा वाचा-