माझे घर मराठी निबंध | ESSAY ON MY HOME IN MARATHI | घर माझे प्रसन्न

माझे घर मराठी निबंध | ESSAY ON MY HOME IN MARATHI | घर माझे प्रसन्न – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये माझे घर यावर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये माझे घर यावर विसतृत माहिती लिहीलेली आहे, तसेच घरातील आठवणी, गमती जमती व मज्जा यांवरही यामध्ये चर्चा केलेली आहे.

माझे घर मराठी निबंध | ESSAY ON MY HOME IN MARATHI | घर माझे प्रसन्न

माझे घर मराठी निबंध

घर असावे घरासारखे। नकोत नुसत्या भिंती।

प्रेम, जिव्हाळा लाभो तेथे। नकोत नुसती नाती।

कवयित्री विमल लिमये यांच्या कवितेतील या ओळी मला खूप भावल्या. त्याला कारणही तसेच आहे. माझे घरही तसेच आहे. घरातील आईंबावा, आजीआजोबा, ताई ही सारी ‘जिव्हाळ्याची वेटे’ आहेत.

पाहुण्यांचे आदरातिथ्य हा आमच्या घराचा आत्मा आहे. तर घरातील प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचे, विकास करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. तसे घरात आजी आणि आजोबांची मजेदार भांडणे होतात. चिडवाचिडवी, रडारड, रुसवेफुगवे या सगळ्या गोष्टी आमच्या घरी मुक्तपणे होतात. तसेच, राजकारणापासून ते संध्याकाळी स्वयंपाक कोणता करायचा इथपर्यंत सर्व विषयांवर मुक्त चर्चाही घरी होते. त्यामुळे घरी संवाद साधण्याची कधी भीती वाटत नाही.

आता माझ्या बाबतीत घडलेला प्रसंगच पाहा, म्हणजे तुम्हांला याचा प्रत्यय येईल. गेल्या बर्षी नववोत असताना प्रथम सत्र परीक्षेत मी दोन विषयांत चक्क नापास झाले. माझ्या काही मैत्रिणीही नापास झाल्या होत्या. त्यांना निकालपत्र घरी दाखवायची खूप भीती वाटत होती. तसे मलाही वाईट वाटले होते, पण घरी सांगायची भौती वाटत नव्हती.

त्या दिवशी घरी सर्वांना निकालपत्र दाखवले. घरी शांतता पसरली होती. संध्याकाळी बाबा म्हणाले.मोरा. तुला गुण कमी का मिळाले त्याचे कारण कळेल का?” “गेले वर्षभर कब्बड्डीच्या सामन्यांमुळे मो मैदानावरच होते. त्यामुळे विज्ञान व गणित विषयांतील मूळ संकल्पना नीट कळल्या नाहीत” असे मी म्हणाले आणि माझ्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहू लागल्या. सगळ्यांनी मला मनसोक्त रडू दिले.

my house essay in marathi

त्यानंतर घरी अभ्यास व खेळ यांच्या वेळाचे नियोजन करण्यात आले. आजोबा आणि आईने न समजलेल्या संकल्पना पक्क्या करून घेतल्या. बाबांनी सराव घेतला. त्यामुळे द्वितीय सत्र परीक्षा उत्तम गुणांनी मी पास झाले.

संकटसमयी संयम बाळगणे, अपयशावर मात करणे अशा अनेक गोष्टी माझ्या घराने मला प्रसन्नपणे शिकवल्या.

हे निबंध सुद्धा वाचा-