पक्षी बोलू लागले तर निबंध मराठी | ESSAY ON PAKSHI BOLU LAGLE TAR IN MARATHI

पक्षी बोलू लागले तर निबंध मराठी | ESSAY ON PAKSHI BOLU LAGLE TAR IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “पक्षी बोलू लागले तर निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल,

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON PAKSHI BOLU LAGLE TAR IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • माणसाबरोबर पक्ष्यांचे बोलणे
  • दाणा-पाणी ठेवण्याबाबत आनंद व्यक्त
  • पहाटे किलबिलाट करणे
  • आवाज कमी करण्याबद्दल विनंती

पक्षी बोलू लागले तर निबंध मराठी | ESSAY ON PAKSHI BOLU LAGLE TAR IN MARATHI

अग ए मुली, तुझ्याबरोबरचा छोटा मुलगा माझ्यावर खडे मारतोय, आवर त्याला. इथे-तिथे काय पाहतेस? तुझ्याजवळच असलेल्या झुडपावर बसलोय. तुम्ही मला पक्षी म्हणता. मला तुम्हा माणसांबरोबर बोलायला खूप आवडते. तुमच्याबरोबर राहायलाही आवडते.

तुझ्या घराच्या आजूबाजूला झाडे असतील तर माझ्या बंधू-भगिनी तुम्हांला दिसतील. आम्ही पहाटे लवकर उठतो. किलबिलाट करतो. तुम्हांला जागवतो. माझा भाऊ कोकीळ गाऊ लागतो, तेव्हा सारे खूश होतात. तुम्हा माणसांना मला एक विनंती करायची आहे :

तुम्ही मिरवणूक काढता. जोरजोरात वादये वाजवता. फटाके फोडता. त्या वेळी मोठा आवाज होतो. आम्ही सारे पक्षी घाबरतो. तुम्हांला ठाऊक आहे? तुमच्या या आवाजामुळे, आम्ही आता दूर दूर राहायला जाऊ लागलो आहोत. आमची पिल्ले तर या आवाजामुळे घाबरीघुबरी होतात कधी कधी आजारी पिल्ले मरणसुद्धा पावली आहेत. थोड्या दिवसांनी तुम्हांला पक्षी दिसणार नाहीत. आम्ही किडेकीटक खातो, उष्टे-खरकटे खातो. त्यामुळे तुमच्यावरची संकटे टळतात. आमचा सहवास हवा असेल तर मोठ्याने आवाज करणे टाळा.

उन्हाळ्यात तुमच्यापैकी अनेकजण आमच्यासाठी दाणा-पाणी ठेवतात. आम्हाला खूप बरे वाटते. तुम्ही माणसे आमचे खरे मित्र आहात. आपणा सर्वांसाठी हे सुंदर जग निर्माण झाले आहे. आपण येथे सर्वजण आनंदाने राहू या!

हे निबंध सुद्धा वाचा –