पाणी अडवा पाणी जिरवा | PANI ADVA PANI JIRVA NIBANDH MARATHI

पाणी अडवा पाणी जिरवा | PANI ADVA PANI JIRVA NIBANDH MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “पाणी अडवा पाणी जिरवा निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये PANI ADVA PANI JIRVA NIBANDH MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • पाणीटंचाई ही समस्या
  • शेतीच्या उत्पादनांवर परिणाम
  • पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन
  • वृक्षलागवडीची आवश्यकता
  • पाणीटंचाई दूर झाल्यास भूमी सुजला सुफला

पाणी अडवा पाणी जिरवा | PANI ADVA PANI JIRVA NIBANDH MARATHI

हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवण्याला अग्रक्रम द्यावा लागतो. खेड्यापाड्यांतून ही समस्या फारच बिकट आहे. शहरात ठरावीक वेळी पाणी येत असेल, तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते.

पण खेड्यापाड्यांतील लोकांना यडाभर पाण्यासाठी मैलोन्मेल पायपीट करावी लागते किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते.

स्वच्छतेसाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळे अस्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय ? माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते, तर शेतीला आणि वनस्पतींच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल, याची कल्पना केलेलीच बरी!

आपली पाण्याची सर्व गरज पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. फक्त चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवणे, मुरवणे, साठवून ठेवणे आणि मग गरजेनिहाय काटकसरीने वापरणे एवढेच आपल्या हाती आहे.

आपण धान्य पेरतो. मग त्यातून अमाप धान्य उगवते. त्याप्रमाणे पाणी पेरून पाण्याचे पीक घेता येत नाही. आपल्याला फक्त पावसाचे पाणी मिळते. हे पाणी कसे अडवायचे व आपल्याकडे वळवायचे याचा अत्यंत अनोखा प्रयोग सुप्रसिंद्ध कर्तबगार, बुद्धिमा अभिनेता आमिर खान याने केला.

शेकडो गावातील शेतकऱ्यांना प्रेरित केले. बंधारे बांधणे, चर खोदणे, तळी खोदणे अशी कामे लोकांची अफाट शक्ती वापरून उभी केली अशीच कामे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांनीही केली. खरे सांगायचे म्हणजे या मंडळींनी पाणी मिळवण्याचा एक आदर्शच घालून दिला आहे.

सध्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत. झाडे नुसती लावणे उपयोगाचे नाही, तर त्यांचा सांभाळही केला पाहिजे. प्रत्येकाने किमान दहा झाडे लावावीत, अशी सक्तीच केली पाहिजे.

कल्पना करा की भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे. प्रत्येकाच्या नावाने दहा-दहा झाडे लावली गेली, तर एका वर्षात १२५० कोटी झाडे लागतील. पण हे होत नाही. झाडांमुळे जमिनीखालचे पाण्याचे झरे वाहते राहतील. जमिनीखालची पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना, नक्ष्यांना बारमहा पाणी राहील. हे सर्व आम्हांला शाळेत शिकवलें जाते. पण व्यवहारात मात्र हे दिसत नाही. असे का?

आता खूपच उशीर झाला आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे अक्राळविक्राळ दर्शन घडलेले आहेच. त्यातून बाहेर पडण्यासाठी आता युद्धपातळीवर काम करावे लागेल. मग मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अथनि बहरेल.

हे निबंध सुद्धा वाचा –