पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध | ESSAY ON PATRACHE ATMAVRUTTA IN MARATHI

पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध | ESSAY ON PATRACHE ATMAVRUTTA IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON PATRACHE ATMAVRUTTA IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • पत्र नव्हे मित्र
  • सर्वांना बातम्या देणे
  • पत्रप्रकाराला महान व्यक्तींनी प्रसिद्धी दिली
  • चित्रपट, नायक, गाणी यात उल्लेख
  • पत्रांची विविध रूपे
  • डिजिटल माध्यमांचे आगमन
  • विदयाथ्यांशी अजून मैत्री

पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध | ESSAY ON PATRACHE ATMAVRUTTA IN MARATHI

ESSAY ON PATRACHE ATMAVRUTTA IN MARATHI

‘पत्र नव्हे मित्र’ अशी गेली अनेक वर्षे आमची ख्याती होती. गाव असो की शहर सगळीकडे पाठीवर खाकी

पोतडीत, खाकी वेशात आमचे गठठे घेऊन पोस्टमन जात असे. पोस्टमन आला की प्रत्येक घरातल्यांना माझ्या येण्याची उत्सुकता असे. कारण मी सगळ्यांसाठी कोणती ना कोणती खबर घेऊन येत असे. माझ्यावर काहीजण खुशाली पाठवत; काहीजण विशेष बातमी पाठवत, कधी खरमरौत कानठ्याडणी असे, कधी शुभवार्ता घेऊन जात असे. माझ्या घरी येण्याने घरातले वातावरण बदलत असे एवढे मात्र खरे! यामुळेच मी सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होतो.

पं. नेहरू, साने गुरुजी, ना. ग. गोरे यांसारख्या महान व्यक्तींनी माहितीपूर्ण लेख आमच्यावरच लिहिले. म्हणून पाठ्यपुस्तकात सुधास पत्र असा धडा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी होता. अनेक चित्रपटांमध्ये आमच्यावर गाणी लिहिली गेली. काही चित्रपट, नाटक यांच्या संहितांमध्ये आमचा उल्लेख करण्यात आला आहे. काही कविनी आमच्यावर कवीता

लिहिल्या. लोकगीते, लोककथा यांमध्ये आम्हांला स्थान देण्यात आले आहे. पाकीट, अंतर्देशीय, लिफाफा अशी माझी अनेक रूपे आहेत. मजकूर जास्त असेल, काही खास असेल तर पाकिटात मला सुरक्षित केले जाई. परंतु कार्ड है माझे मूक रूप आहे. माझ्यावर योग्य पिनकोड आणि योग्य पत्ता लिहिला की माझा

प्रवास इच्छित स्थळी होत असे. सध्या नवे तंत्रज्ञान आले आहे. संपकांसाठी अनेक नवी साधने हाताशी आली. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्वीटर, ई-मेल उपयोग लिंक्डइन

यांमुळे तुमच्या दारात पोस्टकार्ड, पोस्टमन न येता, बातम्या, निरोप कळू लागले. या बदलाला मी मनापासून स्वीकारले आहे. त्यामुळे या सर्व माध्यमांना मी माझे आधुनिक (डिजिटल) रुप समजतो.

मुलांनो, तुमच्यासोबत मात्र मी पत्रलेखन नमुन्याच्या रूपात कायम राहणार आहे आणि ‘मामाचे पत्र हरवले’ हा खेळ तुम्ही शाळेत असेपर्यंत खेळणारच आहात. तेव्हा मी तुमचा मित्र राहणार आहे.

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा –