प्लास्टिकचे दुष्परिणाम मराठी निबंध | ESSAY ON PLASTIC SIDE EFFECTS IN MARATHI | प्लास्टिक एक समस्या !

प्लास्टिकचे दुष्परिणाम मराठी निबंध | ESSAY ON PLASTIC SIDE EFFECTS IN MARATHI | प्लास्टिक एक समस्या – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर सविस्तर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणांबद्दल व अडचणीं बद्दल तसेच प्लास्टिक एक समस्या कशी आहे हे समजून घेतले आहे, प्लास्टिक मुक्त भारन का गरजेचा आहे हे ही निबंधातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे विसतृत चर्चा केलेली आहे.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • प्लास्टिकबंदीचा परिणाम
  • रोजच्या सवयीवर मात करणे.
  • बाजारात पिशवीशिवाय खरेदीला जाणे.
  • घरातून व मनातून प्लास्टिक हद्दपार करणे.

प्लास्टिकचे दुष्परिणाम मराठी निबंध | ESSAY ON PLASTIC SIDE EFFECTS IN MARATHI | प्लास्टिक एक समस्या

ESSAY ON PLASTIC SIDE EFFECTS IN MARATHI

आज सकाळी आईने मला लवकर उठवले आणि बाजारात पिटाळले. “मंदार, बाजारात जा आणि कांदे-बटाटे घेऊन ये! मला ऑफिसला जायला उशीर होतोय! चटकन जा आणि पटकन ये.” मी पैसे खिशात ठेवले आणि सायकलला पायडल मारली. पाच मिनिटांत बाजारात पोहोचलो.

“सखूमावशी, एक किलो कांदे आणि एक किलो बटाटे दे.”

नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत कांदे-बटाटे देणारी सखूमावशी आज कापडी पिशवी मागू लागली.

“समद्यांना सांगून थकले, प्लास्टिक बंद झालंया!”

मी पटकन भानावर आलो. शासनाने प्लास्टिकबंदी नुकतीच जाहीर केली आहे. प्लास्टिक वापरले, तर पाच हजार रुपये दंड! , प्लास्टिकची इतकी सवय झाली होती की, त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. असा विचार कधी मनात आला नाही.

प्लास्टिक एक समस्या

सखूमावशीने कागदी पिशवीत कांदे-बटाटे दिले पण, कसले काय! अर्ध्या रस्त्यात कागदी पिशवी फाटली.

एका हातात सायकलचे हॅण्डल आणि दुसऱ्या हाताने फाटकी पिशवी सावरत मी अर्ध्या तासाने घरी पोहोचलो.

फाटक्या कागदी पिशवीसह माझे ध्यान पाहून आईच्या लक्षात सारा प्रकार आला. आता खरेदीला जाताना कापडी पिशवी बाळगायला हवी. आई एवढे ठरवून थांबली नाही. तिने रविवारी घरातील सर्व, प्लास्टिक बाहेर काढायचा चंग बांधला, मी, आई आणि बाबा सगळेच या कामाला लागलो. घरातून पिशव्या, बाटल्या, छोटे-मोठे डबे इत्यादी, प्लास्टिक सामानाचा ढीग तयार झाला. हा ढीग ‘, प्लास्टिक निर्दालन केंद्रात नेऊन दिला.

त्या दिवसापासून आम्ही सगळ्यांनी , प्लास्टिकला आमच्या मनातून कायमचे हद्दपार केले.

हे निबंध सुद्धा वाचा-