रस्त्याचे मनोगत मराठी निबंध | ESSAY ON RASTYACHE MANOGAT IN MARATHI | रस्त्यावर मराठी निबंध

रस्त्याचे मनोगत मराठी निबंध | ESSAY ON RASTYACHE MANOGAT IN MARATHI | रस्त्यावर मराठी निबंध – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “रस्त्यावर मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये रस्त्याचे मनोगत यावर सविस्तर निबंध मिळेल, या निबंधामध्ये ,रस्त्याचे मनोगत, या मुद्द्यावर विसतृत चर्चा केलेली आहे.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • रस्ता
  • सर्व लोकांची ये-जा
  • सर्व व्यवहार पार पाडण्यासाठी उपयोग
  • माणसाच्या जीवनाचा आधार
  • माणसांच्या सर्व भावभावनांचे व्यवहार रस्त्याच्या साक्षीने
  • रस्त्याचे दुःख
  • रस्त्याची दुर्दशा
  • रस्त्याच्या कडेला झाडे लावणे
  • माणसांना त्रास

रस्त्याचे मनोगत मराठी निबंध | ESSAY ON RASTYACHE MANOGAT IN MARATHI | रस्त्यावर मराठी निबंध

ESSAY ON RASTYACHE MANOGAT IN MARATHI | रस्त्यावर मराठी निबंध

लोकहो, मी रस्ता बोलतोय! माझं ऐकता का जरा ? तुम्ही सारे माझ्या अंगाखांद्यांवरून सकाळ-संध्याकाळ ये-जा करता. कुणी शाळेत जातात. कुणी गिरण्या-कारखान्यांत जातात. कुणी शेती करायला जातात. तर कुणी आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी जातात.

काहीजण एकमेकांना भेटण्यासाठी इथेच येतात. म्हणजे बघा, माणसाच्या विविध गरजा भागवण्यासाठी मी मदत करतो. त्यांच्या सर्व सुखदु:खांच्या गोष्टींत मी सहभागी होतो. मला बढाई मारायची नाही, पण मी आहे म्हणून माणसांचे जीवन आहे. मी आहे म्हणून जग तग धरून आहे.

कल्पना करा, मी नसतो तर? मी नसतो तर यातले काही घडलेच नसते! माणूस आपले व्यवहार करू शकला नसता!

किती तर्‍हेतर्‍हेची माणसे पाहिली आहेत मी! काहीजण स्वत:शीच, मनातल्या मनात बोलत बोलत चालत असतात. काहीजण एकटेच स्वतःशीच बडबडत जातात काहीजण चालता चालता मजेत गप्पा मारतात. काहीजण आपल्या सुखदु:खांच्या गोष्टी सांगतात; अडी-अडचणी मांडतात, त्यांना पुढचा मार्ग कळत नाही. ते व्याकूळ होऊन मित्रांकडे सल्ला मागत असतात. काहीजण रस्त्यावरच उभ्याउभ्याने कडाडून भांडतात.

खरे तर मी सर्वसाक्षी परमेश्वरासारखाच आहे. हजारो वर्षांपासून मी माणसांचे जीवन पाहत आलोय. अगदी त्याच्या पायाशी राहून! माणूस पूर्वी कसा होता व आता किती बदलला आहे, हे मला ठाऊक आहे.

मानवजातीचा आजवरचा सर्व इतिहासच माझ्या डोळ्यांसमोर घडलेला आहे. असे असूनही माणसांना माझी खरी किंमत कळलेलीच नाही. माझ्याशी माणसे नीट वागत नाहीत. मला विद्रूप करतात. माझ्या अंगावर कचरा टाकतात, थुंकतात.

कित्येक ठिकाणी तर रस्ता की गटार अशी शंका येण्यासारखी माझी दयनीय स्थिती असते. मला स्वच्छ ठेवता येत नसेल तर ठेवू नका. पण निदान घाण तरी करू नका!

माणसे स्वत: सून तर्‍हेतर्‍हेचे पोशाख करून, नटून-थटून माझ्या अंगावरून ऐटीत चालत असतात. पण माझ्या रूपाबद्दल विचार करीत नाहीत. माझी नीट निगा राखली तर काय होईल? सर्व खड्डे बुजवावेत, घाण दूर करावी. माझ्या कडेने मोठमोठी झाडे लावावीत.

मी जातो तिथपर्यंत दोन्ही अंगांनी हिरवळ लावली तर? कोणाचा फायदा होईल, माणसांचाच ना? पण माणसे इतकी स्वार्थी बनली आहेत की, त्यांना थोडासुद्धा विचार करता येत नाही. जाऊ दया. काय करणार? माणसांना त्यांच्या कर्माची फळे मिळतीलच !

हे निबंध सुद्धा वाचा-