आभाळाचे गार्‍हाणे | ESSAY ON SKY IN MARATHI

आभाळाचे गार्‍हाणे | ESSAY ON SKY IN MARATHI  नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “आभाळाचे गार्‍हाणे मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON SKY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • आभाळाची पृथ्वीवर अपार माया
  • धूर, धुळीमुळे आभाळाचा जीव कोंडलेला
  • पृथ्वीचे संरक्षण करणे
  • विविध शोधांबद्दल कौतुक
  • प्रदूषणांचे दुष्परिणाम
  • सावधानतेचा इशारा

आभाळाचे गार्‍हाणे | ESSAY ON SKY IN MARATHI

केवढे मोठे आभाळ आहे मी ! क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मी पसरले आहे. अखंड पृथ्वीवर मी माझे छत्र धरले आहे. अनेक कविलेखकांनी माझ्यावर कविता लिहिल्या आहेत. मनोरम लेख लिहिले आहेत. केवढा अभिमान वाटायचा मला ! किती आनंद व्हायचा ! पण आता मात्र तुम्ही माणसांनीच माझी रया घालवली आहे.

काय हे ? असे काय बघत राहिलात ? नाही कळले का ? तुम्ही एकेका ठिकाणीच कारखाने कोंबत चालला आहात. खतांचे कारखाने, रसायनांचे कारखाने, ओषधांचे कारखाने. हे कारखाने उभारलेत तेव्हा मलाही आनंद झाला. वाटले, ही माझी लाडकी पृथ्वी आता खूप विकसित होईल. पण तुम्ही या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक कचऱ्याची काहीच विल्हेवाट लावली नाही. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराने मला पुरते व्यापून टाकले आहे. मला माझी ती सुंदर पृथ्वी दिसेनाशी झाली आहे.

मी तुमच्या पृथ्वीला माझ्या ओंजळीत घेतले आहे. किती सुरक्षित ठेवले होते मी पृथ्वीला ! सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांना मी थोपवून धरते. तुमच्या आरोग्याचे रक्षण करते. ढगांना मीच गोळा करते. तुमच्यावर पावसाचा वर्षाव करते. तुमच्या अन्नाची तरतूद करते, तरी तुम्हांला माझे महत्त्व कळत नाही ? तुम्ही विविध प्रकारच्या शोधांसाठी आकाशात उपग्रह पाठवता, इतर कोणत्या ग्रहावर तुमच्यासारखी मनुष्यवस्ती आहे का? यांसारख्या अनेक गोष्टींचा तुम्ही शोध घेता तेव्हा मला तुमच्या जिज्ञासू वृत्तीचे, बुद्धिमत्तेचे आणि कष्टाळूपणाचे कौतुक वाटते. हल्ली तुम्हांला अस्मानी संकटांची चाहूल आधीच लागते; त्यामुळे प्राणहानी टळते. तुम्हा सर्वांची प्रगती व्हावी हीच माझी सदिच्छा!

फक्त मलाच त्रास होतो, असे नाही. सगळीकडे रोगराई पसरत आहे. पशुपक्षीसुद्धा त्रस्त झाले आहेत. त्यांची संख्या रोडावत आहे. वृक्षवेली लयाला चालल्या आहेत. माणसांनो, तुमच्या नाशाची घंटा वाजू लागली आहे. सावध व्हा, या प्रदूषणाविरुद्ध युद्ध सुरू करा.

हवा आणि आकाश प्रदुषणावर निबंध येथे लिहीला आहे.

हे निबंध सुद्धा वाचा –