वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | ESSAY ON THE CONTRIBUTION OF VARKARI MOVEMENT IN MAHARASHTRA

वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | ESSAY ON THE CONTRIBUTION OF VARKARI MOVEMENT IN MAHARASHTRA IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON THE CONTRIBUTION OF VARKARI MOVEMENT IN MAHARASHTRA IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • दरवर्षी वारी
  • आळंदी ते पंढरपूरपर्यंत चालत
  • नियमित
  • वारी म्हणजे भक्ती, मोठी निष्ठा
  • वारी म्हणजे भक्तांचे जीवनसत्त्व
  • अडचणी फिक्या वाटणे
  • वारीकडे जगाचे लक्ष
  • वारी : भक्तीची पेठ
  • शेतीची कामे न टाळता वारी

एका वारकऱ्याचे मनोगत | ESSAY ON THE CONTRIBUTION OF VARKARI MOVEMENT IN MAHARASHTRA

मी एक वारकरी आहे. नुकतीच वारी पूर्ण करून आलो आहे. कितीतरी अडचणी आल्या तरी मी वारी चुकवत नाही. ही वारी, ही तुळशीची माळ मला माझ्या वडिलांकडून मिळाली आहे. जर शेतीवाडी मला वंशपरंपरेने मिळत असेल; तर वडिलांची भक्ती, निष्ठाही वंशपरंपरेने का मिळू नये ? पण एक गोष्ट नक्की ही भक्ती काही मी आंधळेपणाने स्वीकारलेली नाही.

मी शेतकरी आहे, मला शेती करायला आवडते. मी सुशिक्षित आहे, पदवीधर आहे. तरी पण वारीला जायलाही मला आवडते. वारी हे सर्व वैष्णवांचे विदयापीठ आहे. या विद्यापीठात मिळणारे टॉनिक, जीवनसत्त्व हे आम्हांला वर्षभरासाठी पुरते. किंबहुना वर्षभरात येणाऱ्या विविध अडचणींवर आम्ही याच जीवनसत्त्वांमुळे मात करतो.

वारी हे महाराष्ट्राचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी लाखो भक्त आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत जातात. या दिंडीत सर्व जाती-धर्माचे लोक असतात.

सर्व वयाचे -अगदी वृद्धांपासून युवकांपर्यंत – सर्वजण वीस-एकवीस दिवस बरोबर असतात. सर्व गैरसोयी सहन करतात. कारण त्यांना त्या गैरसोयी वाटतच नाहीत. त्यांची जात, त्यांचा धर्म एकच असतो. ते सर्वजण त्या एकाच पंढरीची लेकरे असतात. विठाई माउलीबरोबर ते ग्यानबा-तुकोबांचे सखे असतात.

ज्ञानेश्वर, तुकाराम आणि इतर संतांचे अभंग गुणगुणत वारीत चालतात. त्या नामस्मरणात दंग असल्यामुळे त्यांना चालण्याचे कष्टही वाटत नाहीत. नाचत, गात, कीर्तन करीत आणि वेगवेगळे खेळ खेळत हे लाखो वारकरी जेव्हा एवढी वाट तुडवतात, तेव्हा ते केवळ भक्तिरूपच झालेले असतात.

हल्ली माध्यमातील लोक वारीबरोबर येतात. आमच्याबरोबर सहभोजन व भजन करतात. ठिकठिकाणी वैदयकीय सेवा उपलब्ध करून देतात. त्यामुळे या वारीच्या काळात आलेल्या अडचणी, आजारपण या सगळ्यांवर मात करू शकतात.

लाखो लोक एवढे एकदिलाने कसे एकत्र राहू शकतात, याचेच देशी-परदेशी लोकांना नवल वाटते. अनेक विद्वान, अभ्यासू लोकही या वारीत असतात. समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे या स्वतः वारीबरोबर आल्या होत्या. त्यांनी, विठ्ठलाचा उल्लेख ‘माय बॉयफ्रेंड’ असा केला होता.

सर्वच वारकऱ्यांना विठोबा हा आपला ‘सखा’ वाटतो आणि या सख्याला भेटायला जाताना ते आपले ‘तनमनश्रम’ सर्व विठ्ठलाच्या पायाशी अर्पण करुन विठ्ठलमय झालेले असतात. मित्रांनो, वारकरी आणि त्यांची दिंडी ही खरी भक्तीची पेठ आहे.

मृग नक्षत्रावर शेताची पेरणी करून तो वारीला जातो आणि पंढरपूरच्या देवळाचा कळस पाहून तो मिळेल त्या वाहनाने परत फिरतो. कारण त्याचे शेत, शेतातील कामे त्याची वाट पाहत असतात. आल्या आल्या तो दुप्पट जोमाने कामाला लागतो. कोणत्याही इतर फळाची त्याला अपेक्षा नसते. कारण वारीचे फळ त्याला मिळालेले असते.

हे निबंध सुद्धा वाचा –