झाडाचे महत्व निबंध मराठी | IMPORTANCE OF TREES ESSAY IN MARATHI

झाडाचे महत्व निबंध मराठी | IMPORTANCE OF TREES ESSAY IN MARATHI | झाडांवर निबंध | ESSAY ON TREES OUR BEST FRIEND IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “झाडांवर निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये झाडाचे महत्व यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • लहानशा रोपट्याचे मोठे रूप
  • माणसाच्या विसाव्याचे ठिकाण
  • माणसांच्या अनेक कृतींचा साक्षीदार
  • माणसांच्या कथा-व्यथा माहीत
  • प्रेमाने माणसाला सर्वस्व दान
  • माणूस कृतघ्न, वृक्षाला चिंता

झाडाचे महत्व निबंध मराठी | IMPORTANCE OF TREES ESSAY IN MARATHI

या, वाटसरूंनो या. या माझ्या सावलीत क्षणभर विसावा घ्या. तुम्हांला खूप काही सांगावं, असं माझ्या मनात येतंय, ऐकताय ना तुम्ही? ऐका तर मग!

तुम्हांला आता मी हा असा महावृक्ष दिसतोय. आज माझं वय शंभराच्या वर गेलेलं आहे. खरं तर जन्माच्या वेळी मी अगदी लहानसं रोपटं होतो. हळूहळू मोठा होत गेलो.

काही समजूतदार व्यक्तींनी माझ्या खोडाभोवती छानसा पार बांधला. तुम्ही आता बसलाय ना तो पार! येणारा-जाणारा वाटसरू त्यावर अगदी सहज क्षणभर तरी विसावतो. माझ्या सहवासात त्याच्या जिवाला थोडंतरी सुख मिळतं. येथे बायका-मुलं, तऱ्हेतऱ्हेचे लोक यांची सतत वर्दळ असते. मुलं

उत्साहाने बागडतात. बायका आपापल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करतात. काही उत्साही माणसे तावातावाने वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात.

कित्येक चळवळ्या माणसांनी आखलेल्या समाजसुधारणेच्या योजना मी ऐकल्या आहेत. माझ्या अंगाखांदयांवर बागडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट मी ऐकतो आणि या एका जागी स्थिर राहूनही मला देशोदेशीच्या हकिकती कळतात. माणसांच्या कितीतरी पिढ्या मी पाहिल्या आहेत. त्यामुळे माणसांच्या सुखदुःखांचा मी साक्षीदारच बनलो आहे.

आम्हां वृक्षांना माणूस हा प्राणी खरोखरच खूप प्रिय बनलेला आहे. त्यामुळे आम्ही माणसाला शक्य ती सर्व मदत करतो. आमचा संपूर्ण देह माणसाच्या पूर्ण उपयोगाला येतो. तर्‍हेतर्‍हेच्या चवदार फळांचा आस्वाद आम्ही माणसाला देतो. पानांचेही कितीतरी उपयोग आहेत.

आमच्या फांदया-खोड यांचा सरपणासाठी, बांधकामासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, कागद तयार करण्यासाठी उपयोग करू देतो. आम्ही हवा शुद्ध ठेवतो. जमिनीतील पाण्याचे स्रोत घरून ठेवतो. त्यामुळे विहिरी, नदयानाले यांना पाण्याचा पुरवठा होतो. म्हणजे आम्ही पर्यावरणाचा समतोल राखतो. यात आमचा फायदा काय? काहीच नाही! आम्ही हे सारं तुमच्यासाठी करतो.

तुम्ही माणस मात्र कृतघ्न! तुम्हाला मदत करणाऱ्या माझ्यासारख्या मित्रांवरच कुर्हाडीचे घाव घालता. जुलै महिन्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम होतो पण: संगोपनाचे काय? नंतर कोणीही माझी निगा राखत नाही.

केवळ तात्कालिक फायद्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही माणसे बेसुमार जंगलतोड करता. खरं म्हणजे याचे पुढे होणारे गंभीर परिणाम तुमच्या लक्षातच येत नाहीत.

आज ना उदया ते त्यांना, त्यांच्या मुलाबाळांना भोगावे लागणार आहेत. आताच अनेक ठिकाणी कधी कधी भीषण दुष्काळ पडतो, शेकडो माणसे मृत्युमुखी पडतात. ही माणसाच्या कर्माचीच फळे आहेत.

हे लक्षात घेतलं नाही, तर आमच्याबरोबरच सर्व जीवसृष्टीच नष्ट होईल. तेव्हा, हे वाटसरुंनो, तुम्ही हे लोकांना समजावून सांगाल का?

आम्ही आशा करतो की या निबंधातून झाडांवर निबंध | ESSAY ON TREES OUR BEST FRIEND IN MARATHI या विषयावर तुम्हाला एक चांगला निबंध लिहिण्यात मदत झाली असेल.

हे निबंध सुद्धा वाचा-