वाचन प्रेरणा दिन मराठी निबंध | ESSAY ON VACHAN PRERNA DIN IN MARATHI

वाचन प्रेरणा दिन मराठी निबंध | ESSAY ON VACHAN PRERNA DIN IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये वाचन प्रेरणा दिन या विषयावर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये वाचन प्रेरणा दिन महत्व अनुभव, वाचन प्रेरणा दिन घोषवाक्य, वाचन प्रेरणा दिन तारीख व वाचन प्रेरणा दिन माहिती मराठीमध्ये दिलेली आहे यांवर सविस्तर चर्चा केलेली आहे.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • उताऱ्याचे अभिवाचन
  • सामुदायिक काव्यगायन
  • बालवर्गांचे सादरीकरण
  • सुप्रसिद्ध कवी, लेखक यांच्याकडून मार्गदर्शन
  • कोशांचे प्रदर्शन

वाचन प्रेरणा दिन मराठी निबंध | ESSAY ON VACHAN PRERNA DIN IN MARATHI

ESSAY ON VACHAN PRERNA DIN IN MARATHI

अवांतर पुस्तकांचे वाचन करा’ म्हणजे तुम्हांला निबंध, पत्रलेखन करण्यासाठी मोठे शब्दभांडार उपलब्ध होईल असे आमचे पानसरे सर नेहमी सांगतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही अवांतर वाचन सुरू केले. हा वाचनप्रवास चालू असतानाच डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (१५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला. गणपती अक्षरश

या दिनानिमित्ताने आम्ही सुप्रसिद्ध लेखक व कवी श्री. अनंत भावे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यांनी आम्हांला कोणकोणती पुस्तके वाचावीत, ती कशी वाचावीत याबद्दल मार्गदर्शन केले.

छान छान कविता वाचून दाखवल्या आणि आम्हांला म्हणायलाही लावल्या. त्या वेळी सर्व विद्यार्थी काव्यगायनात रंगून गेले होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे अभिवाचन केले.

मी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील संभाजीचे मनोगत रंगून जाऊन वाचले. त्याबद्दल माझे स्वानी कौतुक केले.

बालवर्गातील दोन धिटुकल्यांनी तर साभिनय गोष्टी सादर केल्या. त्यानंतर त्यांनी ‘परी जगत ‘मधील वाचलेल्या पुस्तकांची यादी सादर केली. सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

आम्ही दहावीच्या विदयार्थ्यांनी आमच्या वर्गात विविध प्रकारच्या कोशांचे प्रदर्शन भरवले होते. व्युत्पत्ती कोश, शब्द कोश, मराठी लेखन कोश कसे वापरायचे यांचे आम्ही सादरीकरण केले.

पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या सादरीकरणास छान प्रतिसाद दिला. प्रमुख पाहुणे श्री. अनंत भावे यांना हा उपक्रम अतिशय आवडला.

माझ्यासाठी प्रत्येक दिन हा वाचनदिन असतो. दिसामाजी वाचावे काहीतरी’ या उक्तीप्रमाणे वाचनानंद मी रोजच घेत असतो. परंतु वाचन प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी हा दिन साजरा करायला मला आवडतो.

यूट्यूब व्हिडिओ

हे निबंध सुद्धा वाचा-