पाणी हे जीवन मराठी निबंध | ESSAY ON WATER POLLUTION IN MARATHI | मी पाणी बोलतोय मराठी निबंध

पाणी हे जीवन मराठी निबंध | ESSAY ON WATER POLLUTION IN MARATHI | MARATHI NIBANDH PANI HECH JIVAN  नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “मी पाणी बोलतोय मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये WATER POLLUTION ESSAY IN MARATHI LANGUAGE यावरही सविस्तर चर्चा केलेली आहे,PANI ADVA PANI JIRVA NIBANDH MARATHI का गरजेचे आहे हेही सांगितले गेले आहे,  PANI ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • पाण्याचा अपव्यय
  • पाणी सगळ्यांसाठी
  • उन्हाळ्यात गढूळ होणे
  • शेती पाण्यावर अवलंबून
  • नवे तंत्र अवगत करण्याची विनंती
  • व्यवस्थापन करण्याची अपेक्षा

मी पाणी बोलतोय मराठी निबंध | पाणी हे जीवन मराठी निबंध | ESSAY ON WATER POLLUTION IN MARATHI | PANI ADVA PANI JIRVA NIBANDH MARATHI

ESSAY ON WATER POLLUTION IN MARATHI | PANI ADVA PANI JIRVA NIBANDH MARATHI | मी पाणी बोलतोय मराठी निबंध

अग काय करतेस? मला चक्क ओतून टाकतेस! विसरलीस का? मे-जून महिन्यातले दिवस, डोक्यावरून हंडा भरून आणताना तुझ्या नाकीनऊ आले होते! ओळखलंस, मी कोण बोलतोय ते? अगदी बरोबर ओळखलंस! मी पाणी बोलतेय. मी नसल्यामुळे तुमचे होणारे हाल मला बघवत नाहीत. तरी बरं झालं, या वर्षी पाऊस चांगला बरसला. सगळ्या नदया, विहिरी, तळी, कालवे यांच्यात मी भरभरून वाहू लागले, म्हणून माझी उधळ-माधळ करायची का?

कित्येक जण पाणी भरण्यासाठी नळाखाली भांडे ठेवतात. मग गप्पांत रमतात. मी वाहतेय! योग्य वेळी नळ बंद करा हे तुम्हांला सगळ्यांना सांगावे लागते. बरं किती ठिकाणी वाया घालवता मला? सकाळी तोंड धुताना नळ वाहता ठेवता. नळाच्या वाहत्या धारेत भाज्या, फळे धुता. कपडे धुताना, भांडी धुताना माझा मुबलक वापर करता.

शेती, फळबागा, उद्योगधंदे आणि सर्व प्राणीमात्र या सगळ्यांसाठी मी आहे. त्यामुळे सर्वांना मी मिळावे म्हणून करते. तुमच्या प्रत्येकाने काटकसर केली पाहिजे. मे महिन्यात विहिरी, नदया, तलाव यांच्यातील माझे अस्तित्व संपायला लागते. काही ठिकाणी गढूळ अवस्थेत असतो. मग मला उकळून उकळून पितात. त्यापेक्षा मला सांभाळून वापरले तर पावसाळा येईपर्यंत मी तुम्हांला साथ देईन.

मला माहीत आहे शेती पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. पण शेतातही बऱ्याच वेळा गरजेपेक्षा माझा जास्त वापर करतात. उन्हाळ्यात भाजीपाल्यासाठी माझा भरमसाट उपसा करतात. त्यापेक्षा रोपाच्या मुळाला पाणी देण्याचे तंत्र ( पाणी व्यवस्थापन )अवगत करून घेतले तर बरे होईल. माझी तुम्हां सर्वांना विनंती आहे की शेतीसाठी, घरासाठी माझे व्यवस्थापन करायचे ठरवा. व्यवस्थापन तंत्र शिकून घ्या. म्हणजे माझा पुरवठा वर्षभर राहील आणि सर्व जीवमात्रांचे जीवन मी फुलवू शकेन.

WATER POLLUTION ESSAY IN MARATHI LANGUAGE येथे पाण्याच्या प्रदुषणावर निबंध मिळेल.

यूट्यूब व्हिडिओ

हे निबंध सुद्धा वाचा –