हिवाळा ऋतू मराठी निबंध | ESSAY ON WINTER SEASON IN MARATHI | आठवणीतील हिवाळा

हिवाळा ऋतू मराठी निबंध | ESSAY ON WINTER SEASON IN MARATHI | आठवणीतील हिवाळा – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये हिवाळा ऋतू वर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये हिवाळ्यावर विसतृत माहिती लिहीलेली आहे, तसेच हिवाळ्यातील मज्जा, गमती जमती यांवरही या चर्चा केलेली आहे.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • घरातील सुरक्षित आठवण
  • स्वतःवर झालेला परिणाम
  • शाळाबाह्य मुलांची काळजी घेणे
  • रस्त्यावर राहणाऱ्यांची दैना
  • शाळाबाह्य मुलांना शाळेत आणणे

हिवाळा ऋतू मराठी निबंध | ESSAY ON WINTER SEASON IN MARATHI | आठवणीतील हिवाळा

नागपूर म्हटले की थंडीच्या दिवसांत कडाक्याची थंडी! आणि उन्हाळ्यात प्रचंड उकाडा! या दोन्ही ऋतूमध्ये हवामानाशी जुळवून घेताना आमची अगदी तारांबळ उडते.

या वर्षीचा हिवाळा माझ्यासाठी वेगळा अनुभव देणारा ठरला. नेहमीप्रमाणे आज सकाळी स्वेटर, कानटोपी, बूट-मोजे असा जामानिमा करून मी सकाळी शाळेत निघाले.

शाळेजवळ रस्त्याच्या कडेला काही मुला-मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. दगडफोरडीचे काम करणाऱ्या वस्तीवरची मुले थंडीने कुडकुडत होती आणि रडतही होती. खरे तर सगळी वस्ती गारठली होती.

शाळेत गेल्यावर मुख्याध्यापकांना ही घटना सांगितली. त्यांनी मुलांना शाळेत आणायला सांगितले. भसे बाईंच्याबरोबर आम्ही घटनास्थळी (वस्तीवर) गेलो. त्या मुलांच्या आई-वडिलांना मुलांना शाळेत पाठवण्याबद्दल विनंती केली. मुलांना शाळेत पाठवले तर काम कोण करणार? असे म्हणून मुलांना शाळेत पाठवायला नकार दिला.

शेवटी खाऊ-कपडे देतो असे सांगितल्यावर मुलांना शाळेत पाठवले.

अस्ताव्यस्त केस, मळलेले व फाटके कपडे, थंडीमुळे फुटलेले गाल-ओठ, अंगाला येणारी दुर्गंधी अशा अवस्थेत त्या मुलांना शाळेत आणले. पुढे त्यांना अंघोळ, जेवण, कपडे, बूट-मोजे देण्यात आले. वस्तू घेताना ही मुले ओढून-खेचून घेत होती. त्यांतल्या एका मुलीने माझ्या अंगातील स्वेटर खेचला. मी थोडीशी घाबरले! तिने स्वेटर अधिक घट्ट पकडला. ‘नाही देणार स्वेटर” ती मुलगी म्हणाली. ‘रातच्याला लई थंडी लागत्ये, म्या न्हाई देनार!” बाईनी तिला एक स्वेटर दिला. तिचा चेहरा खुलला.

खरेच थंडीमुळे होणारा त्रास उबदार कपड्यांमुळे मी सहन करू शकत होते. पण गार वारा, बोचरी हाडे गोठवणारी न थंडी ही मुले कशी सहन करीत असतील?

बाईंनी सर्व मुलांना देणगीदारांमार्फत स्वेटर दिले. सर्व मुले आनंदाने शाळेत बसली.

ज्या थंडीत आम्ही पर्यटनाला जातो, गरमागरम खाद्यपदार्थांवर ताव मारतो: तीच थंडी या उघड्यावरील लोकांना मात्र कशी वाटत असेल, असे मला वाटते.

हे निबंध सुद्धा वाचा-