महाराष्ट्रातील किल्ले | FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI –
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल. आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “महाराष्ट्रातील किल्ले” म्हणजेच “FORTS OF MAHARASHTRA” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे. या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे, खाली दिलेल्या महाराष्ट्रातील किल्ले या बटनवर क्लिक करुन तुम्ही सर्व किल्ल्यांची माहिती वाचू शकता. तसेच किल्ल्यांवरील मराठी निबंध वाचण्यासाठी येते जा.
महाराष्ट्रातील किल्ले / FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI
महाराष्ट्राचा इतिहास घडविण्यात गिरीदुर्गाइलकाच जलदुग्गाचाही वाटा आहे. विशेषतः समुद्रमार्गे भारताच्या भूमीवर उतरलेल्या फिरंगी, इंग्रज, डच व चाचे या परदेशी आक्रमक शत्रुंना वेळोवेळी तोंड देण्याची कामगिरी जलदुर्गानी बजावलेली आहे.
जेव्हा महाराष्ट्रात स्वराज्याचा इतिहास घडत होता, तेव्हा हे किल्ले म्हणजे एक महान शक्ती होती. गनिमांच्या उरामध्ये चळकंप उत्पन्न करणारी भवानीदेवी या गडावर संचारत होती. सर्वत्र एकच रस उफाळत होता, तो म्हणजे वीररस.
आजच्या आधुनिक काळात एवढेच सांगावेसे वाटते की, महाराष्ट्रातल्या नव्हे तर सर्व भारतातील युवकांनी या किल्ल्यांचा अनादर करू नये, त्यांची उपेक्षा करू नये. आपल्याला शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त किल्ले पाहावेत. या गडदुर्गाच्या भ्रमंतीत महाराष्ट्रातल्या बऱ्याच पुण्यसरिता तुम्हास दर्शन देतील. सह्याद्रीची प्रचंड शिखरे आरोहणाचे आव्हान देतील, सह्याद्रीच्या विविध रूपांचे दर्शन घडेल.
किल्लांचे / गडकोटांचे महत्त्व
प्रजाभग्न होऊन देश उच्वस्त होतो. देश उध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे ? याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. है राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वार्मीनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश न होय त्या त्या देशी स्थलविशेष पाहून गड बांधिले तसेच जलदुर्ग बांधिले, त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादिले.
औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर, भागानगरांसारखी महासंस्थाने आक्रमिली. संपूर्ण तीस-बत्तीस वर्षेपर्यंत या राज्याशी अतिश्रम केला. त्याचे यत्नास असाध्य काय होते ? परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अविशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत् करावयास अवकाश जाहला. या उपरही ज्यापेक्षा राज्य संरक्षण करणे आहे, त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी स्वतः गड किल्ल्यांची उपेक्षा न करिता, परम सावधपणे असतील त्या गड किल्ल्यांची यथोक्त मजबुदी करावी. ज्या देशात गडकोट नसतील त्या देशात आपले राज्याचे सरहद्दीपासून पुढे जबरदस्तीने नूतन स्थळ बांधीत बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थळांचे आयी सेना ठेवून पुढील देश स्वशासनाने वश करावा. असे करीत करीत राज्य वाढवावे.
गडकोटाचा आश्रय नसता फौजेच्याने परमुलुखी टिकाव धरून राहवत नाही. फौजेविरहीत परमुलुखी प्रवेश होणेच नाही. इतक्याचे कारण, गडकोटविरहीत जे राज्य त्या राज्याची स्थिती म्हणजे अभ्रपटलन्याय आहे. याकरिता ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण, असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरवशावर न राहता आहे त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वत:च करावा, कोणाचा विश्वास मानू नये.
किल्लांची / गडाची रचना व बांधणी
राज्य रक्षणाचे मुख्य कारण किल्ले, देशोदेशी स्थळे पाहून बांधावे. किल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदयी असू नये. कदाचित् असला तरी तोही तिही जागा मोकळी न सोडिता बांधून मजबूत करावा. गडाची इमारत गरजेची करू नये. तट, बुरुज, चिलखते, पहारे, पडकोट जेथे जेथे असावे ते बरे मजबूत बांधावे. नाजूक
जागे जे असतील ते सुरंगादि प्रयलेकरुन, अवघड करुन, पक्की इमारत बांधून गडाचा आयब काढावा. दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन ते येतिजाति मार्ग बुरूजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून एक दोन, तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करुन ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबल्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.
इमारतीवरील मामलेदार वगैरे आदिकरुन ठेवणे ते बरे राहणे कृतकर्मे निरालस्य पाहून ठेवावे. गडाची इमारत मुस्तेद करावी. कित्येक किल्ले प्रत्येक पर्वताचे आहेत, कित्येक पर्वत थोर थोर, त्याचा एखादा कोन, कोपऱ्याची जागा पाहून बांधावा लागतो. त्यास दरवाजापुढे तटाखाली जितके मैदान असेल तितका खंदक खोल आणि रुंद खणून तटाचे पायी दुसरा पडकोट मजबूत बांधावा. बांधीन त्यावर भांडी, झुंबरे ठेवून खंदकाचे कडेस एकाएकी परकी फौज येऊन नपावे असे करावे, गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असेल तर ते मार्ग मोडून, त्यावर झाडी वाढवून आणखीकडे परके फौजेस येता कठीण असे मार्ग घालावे. या विरहीत बलकबुलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सर्वकाळ चालू देऊ नयेत. समयास तेच दिंडी अथवा दरवाज्याच्या राबता करून साजवादा चढवीत जावा.
किल्लांची / गडाची राखण
गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोडो न द्यावी, बलकबुलीस त्या झाडीमध्ये हशम बंदुके घालावया कारणाजोगे असो द्यावे. गडासभोवती नेहमी मेटे असावी. घेरीयाची घस्ती करीत जावी घस्तीचा जाव मेटकरी यासी देत जावा. गडाखालती इमारतीचे घर किंवा घराभोवती दगडाचे कुसू सर्वथा असो न द्यावे तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी.
गडावरी झराही आहे, जसे तसे पाणीही पुरते, म्हणून तितकियावरीच निश्चिती न मानाबी. उद्योग करावा, कि निमित्य की, झुंझामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जाखिरियांचे पाणी म्हणून दोन-चार तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च न होऊ द्यावे, गडाचे पाणी बहुत जतन राखावे. गडावरी राजमंदिरा विरहीत थोर इमारतीचे घर बांधो नये. राजमंदिरासही भिंती इटांच्या बांधोन त्यास चुना दाट गच्च घालावा. घरात कोठे उंदीर, विंचू, किडा, मुंगी राहील अशी दरद न ठेवावी. धरात कुसू पाहिजे ते निरगुंडी आदिकरून झाडांचे पातळ घालावे. गडकरी यांनी राजमंदीर म्हणून खाली न ठेवावे.
सर्व काळ वरती करून धुरे करुन घर शाबूत राही, जीव जंतू न राही ते करावे. धनी गहावरी येतात असे कळताच अगोदर दोन-चार दिवस = मामलेदाराने येऊन, खासा उभा राहून, संपूर्ण घर सारवून, रांगोळी आदि करुन घालून – धनी गडावरी येईपर्यंत त्याची जागा सदर करून बसत जावे. गडावरील मार्गामार्गावरी – बाजारात तटोतट केर कसपट किमपि पडो न द्यावे. ताकीद करून झाला. केरगडाखाली: न टाकता जागोजाग जाळून तो राखही परसात टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करावे.
किल्लांवरील / गडावरील साहित्य व युध्दाची सामुग्री
गडावरील घान्यगृहे, इस्तादेची घरे, ही सकळही (आहेत त्यास) अग्नी, उंदीर, किडा, मुंगी, वाळवी यांचा उपद्रव न बाधे अशी भुईस दगडांची छावणी करून गच्ची बांधावी, ज्या किल्यास काळा खडक दरजेविरहीत असेल तसे ठिकाणी ते कड्यास टाकी करावी. स्वल्पमात्र दरज असेल तरी गच्च लावून पाझर न फुटे असे करावे. तेथे गच्चीघरे करून थोर थोर काचेचे मर्तबान, झोलमाठ, मडकी आणून त्यास मजबूत बसका करून त्यात तेल, तूप साठवावे. दारुखाना घराजवळ घराचे परिघाखाली नसावा.
सदरेपासून सुमारात जागा बांधून भोवते निरगुडी आदिकरून झाडांचे दाट कुसू घालून बांधावे. त्यास तळघर करावे, तळघरात गच्च करावा. त्यावर दारूचे बस्ते, महकी ठेवावी. माण, होके आदिकरून मध्यघरात ठेवावे. सर्दी न पावोद्यावी. आठ-पंधरा दिवसात हवालदाराने येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मागुती मुद्रा करून ठेवीत जावे. दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्यांनी रात्रंदिवस पहायाप्रमाणे जागत जावे. परवानगी-विरहीत आसपास मनुष्य येऊ नद्यावे. किल्ला संरक्षणाचे कारण ते भांडी व बंदुका याकरिता किल्ल्यात हशम ठेवावेत. (ते) बंदुकीचे ठेवावेत. तट, सरनोबत, बारगीर, सदर-सरनौबत, हवालदार यांसी बंदुकीचा व भांडी डागायचा अभ्यास करावा. ( संपूर्ण हशमांनी तलवार, टाकणी हेही हत्यारे बाळगीत जावी. ) गड पाहून, गडाचे नाजुक जागे पाहून त्या त्या जागी वगडाचे उपराचे जागा त्या त्या सारखी भांडे, झुंबरे, चरक्या आदिकरून यंत्रे बुरुजा- बुरुजात तटोतर टप्पे, गुजरे बांधून ठेवावी.
दारूच्या खलित्या, गंज, भांडे निववायच्या कुंच्या, गोळे, कीट आदिकरून रेजगिरी सुपारीप्रमाणे लहानथोर नदीतले खडे, बाणाच्या पलाखा, जामग्या, तरझा, दुरुस्त करावयाचे सामते, आदिकरून हा जिन्नस भांडियाचा भांड्याजवळ हमेशा तयार असावा. अहिनी दगडी जिन्नस दारुचे अंतरी ठेवावे. होके, बाण हेही पहारे पहाऱ्यास तयार असो द्यावे. दरम्यान, मुलखा गनीम कोठे आहे, येईल ते समयी कोठीतून आणून तयारी करेन म्हणेल तो मामलेदार नामाकुल, आळशी तशास मामला सांगो नये. एक वेळ केली आज्ञाप्रमाणे अंधपरंपरेने निरालस्यपणे उगेच वर्तावे, तरीच समयी दगा होत नाही. लावून दिला कायदा अव्याहत चालतो.
पर्जन्यकाळी भांडियास व दरवाज्यास तेल, मेण देऊन भांडियाचे कोने मेणाने भरून भांडियावर भांडियापुरती आघाडी घालून जाया होऊ न द्यावी. वरकड जिन्नस सर्दी न लागे असे आबादान ठेवावे. इमारतीचे काम आधी तयार झालेच असते तथापि तट, पाहारे, बुरुज कोट काही जाया होतच आहे ते वरचेवरी मजबूत करावे लागतात. तटास झाड वाढते ते वरचेवरी कापून काढावे. तटाचे व तटाखालील गवत जाळून गड नाहणावा लागतो.
किल्लांवरील / गडाचा कारखाना
या कामास गडीगडास गड पाहून इमारतीचा कारखाना नेहमी ठेवून मुद्राधारी यांचे स्वाधीन करावा. तसेच गोलंदाज विश्वासूक कबिलेदार नेमिला जागा दुरुस्त मारणार, असे मर्दान, गड व गडाची भांडी पाहून जितके लागत असतील तितके ठेवावे. गडावरील झाडे जी असतील ती राखावी. या विरहीत जी जी झाडे आहेत ती फणस, चिंच, वड, पिंपळ आदिकरून थोर वृक्ष, निबे, नारिंगे आदिकरून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्ष बल्ली किंबहूना प्रयोजक अप्रयोजक जे झाड होत असेल ते गडावर लावावे, जतन करावे.
समयी तितकेही लाकडाचे तरी प्रयोजनास येतील. गडोगडी ब्राह्मण, ज्योतिषी, वैदिक, व्युत्पन्न तसेच रसायण वैद्य व झाडपाल्याचे वैद्य वशस्त्रवैद्य, पंचाक्षरी, जखमा बांधणारे, व लोहार, सुतार, पाथरवट, चांभार यांच्याही गडपाहून एक-एक, दोन-दोन असाम्या करून ठेवावे. लहान सहान गडावर या लोकांचे नित्य काम पडते असे नाही, याकरिता त्यांचे कामाची हत्यारे त्याजवळी तयार असो द्यावी. जे समयी काम पडेल ते समयी काम करतील, नाही ते समयी आदिकरून तहशील तलब चाकरी घ्यावी.रिकामे न ठेवावे.
गडोगडी तनखा, दास्ताद, इस्तान आदिकरून गडाच्या प्रयोजनाची वस्तूजात गडास संग्रह करून ठेवावेच लागते. याविरहित गड म्हणजे आपले कार्याचे नव्हेत, असे बरे समजून आधी लिहिलेप्रमाणे उस्तवारी गडाची करावी.
महाराष्ट्रातील किल्ले | FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI ही पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद…! आम्ही आशा करतो की या FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI मधून तुम्हांला माहिती देण्यास आम्ही सक्शम राहिलो, तसेच आणखी FORTS OF MAHARASHTRA वर माहिती वाचण्यासाठी यावर जा.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- महाराष्ट्रातील किल्ले | FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI
- सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये | SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पुरंदर किल्ल्याची माहिती | PURANDAR FORT INFORMATION IN MARATHI
- राजगड किल्ला माहिती मराठी | RAJGAD FORT INFORMATION IN MARATHI
- तोरणा किल्ल्याची माहिती | TORNA FORT INFORMATION IN MARATHI
- रोहिडा किल्ला माहिती | ROHIDA FORT INFORMATION IN MARATHI
- चाकण किल्ला इतिहास | CHAKAN FORT INFORMATION IN MARATHI
- शिवनेरी किल्ल्याची माहिती | SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI
- लोहगड किल्ल्याची माहिती | LOHAGAD INFORMATION IN MARATHI
- सज्जनगड ची माहिती मराठी | SAJJANGAD FORT INFORMATION IN MARATHI
- चंदन वंदन किल्ल्याची माहिती | CHANDAN VANDAN FORT INFORMATION IN MARATHI
- वासोटा किल्ला माहिती मराठी | VASOTA FORT INFORMATION IN MARATHI
- अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी | AJINKYATARA FORT INFORMATION IN MARATHI
- प्रतापगडाची माहिती | PRATAPGAD FORT HISTORY INFORMATION IN MARATHI
- रायगड किल्ला माहिती | RAIGAD FORT INFORMATION IN MARATHI
- कर्नाळा किल्ला मराठी माहिती | KARNALA FORT INFORMATION IN MARATHI
- जंजिरा किल्ला माहिती मराठी | JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI
- लिंगाणा किल्ल्याची माहिती | LINGANA FORT INFORMATION IN MARATHI
- गडदचा किल्ला, गडद गणपती | GADAD FORT INFORMATION IN MARATHI
- हरिश्चंद्रगड माहिती मराठी | HARISHCHANDRAGAD IN MARATHI
- धोडप किल्ला माहिती | DHODAP FORT INFORMATION IN MARATHI
- पन्हाळगड किल्ला मराठी माहिती | PANHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पारगड किल्ला माहिती मराठी | PARGAD FORT INFORMATION IN MARATHI
- विशाळगड किल्ला माहिती मराठी | VISHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- देवगिरी किल्ला माहिती | DEVGIRI FORT INFORMATION IN MARATHI
- सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी | SUVARNADURG FORT INFORMATION IN MARATHI
- सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI