गडदचा किल्ला, गडद गणपती | GADAD FORT INFORMATION IN MARATHI

गडदचा किल्ला, गडद गणपती | GADAD FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही गडदचा किल्ला, गडद गणपती म्हणजेच GADAD FORT INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

गडदचा किल्ला, गडद गणपती रचना

गडदचा बहिरी है दैवत १२६५ मीटर उंचीवर कड्यामध्ये दुर्गम जागी आहे. उंची लाभलेल्या गडावर साहस, अरुंद चिंचोळी वाट.

कड्यावर खोदलेल्या छोट्या पाणवठ्यावर एक भक्कम झाडाचे खोड आहे. त्याच्यावर वेल टांगलेला आहे.

त्याला चक्क आपल्याला लोंबकळत अक्षरशः देवाचे नाव घेतच तेथे असलेल्या गुहेत प्रवेश करायला लागतो.

एखाद्याच्या घरी स्त्री ऋतुमती असता जर पुरुष तसाच देवाच्या दर्शनाकरिता या ठिकाणी आला तर त्याला अपघात होतो असे सांगितले जाते.

येथील दाट झाडीमुळे येथील पर्वतसृष्टीची उंची आपणास चटकन कळत नाही. गडावर आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात.

आपली नजर खाली गेली की डोळे गरगरतात. या ठिकाणी जाताना गिर्यारोहकास अनुभव असल्यास उत्तम, वाट अतिशय कठीण आहे.

उभा करा चढ़ावा लागतो. केवळ पुरुषांनाच जाता येते.

किल्ल्यावर जायला या ठिकाणी रायगडासारख्या पायऱ्या नाहीत.

गडदचा किल्ला, गडद गणपती, ठिकाण

निरनिराळे दगडही आपल्याला आढळतात. उदा. जैक्पर, कार्थेलियम, क्वार्टझ.

वीस ते पंचवीस घरांची वस्ती या ठिकाणी असावी. उन्हामध्ये गडदचा कडा काही वेगळाच दिसतो.

हा किल्ला चढताना अतिशय सावधगिरीने जायला लागते.

या गडावर कित्येक वर्षे रहदारी नाही. संपूर्ण पुणे जिल्हयाचा आपण विचार करतो त्या वेळेस गडदचाबहिरी प्रथम डोळ्यांसमोर येतो.

भरपूर झाडी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. ( गुगल मॅप )

भरमसाठ पडलेल्या पिवळ्या पालापाचोळ्यातून चालताना पानांचा वेगळा आवाज आपल्याला अनुभवायला मिळतो.

पालथे पडून माथ्यावरून खाली पाहाण्याचा नुसता प्रयत्न केला तरी अंगाचा थरकाप होतो.

निसर्गाचे खरे रुप या ठिकाणी पाहायला मिळते. गडदचाबहिरी पहाड खरोखरच एक चित्तथरारक अनुभव होय.

केवळ पाय ठेवण्यापुरतीच जागा या ठिकाणी आहे.

कड्याला हात टेकवत टेकवत आपलीनजर शाबूत ठेवीत अतिशय काळजीपूर्वक गडद चढावा लागतो.

नुसत्या शब्दामध्ये सांगून समजणार नाही, त्याकरिता या ठिकाणी जाऊन यायला हवे.

निसर्गनिर्मित गुहा

गडदचा किल्ला, गडद गणपती | GADAD FORT INFORMATION IN MARATHI

वरती आपणास चाळीस फूट लांब, वीस फूट रुंद आणि आठ फूट उंच अशी जागा आढळते.

त्याच्या तोंडाशी भक्कम वेल बांधलेला आहे. समोरच भैरव आहे. शेंदराने माखलेला.

त्याच्या आसपास लहान-मोठे दगड त्याच अवस्थेत दिसतात. एकाशेजारी एक अशी दोन टाकी आहेत.

या गुहेच्यानंतर थोड्याच अंतरावर अजून एक गुहा कोरीव अशी आहे.

जत्रेचा उत्सव असो वा एरवीसुध्दा येथील गावकरी लोक आपल्या खांद्यावर वजनदार मेंढरू घेऊन वरपर्यंत चढ़न येतात.

वरील पाण्याच्या टाकीत जुन्या घडणीची मजबूत मोठ्या आकाराची स्वैपाकाची भांडी आहेत.

या भांड्यांची अजून एकदाही चोरी झालेली नाही. अश्विन महिन्यात गडावर जत्रा भरते.

एरवी मात्र फारसे कोणी या ठिकाणी फिरकत नाही. अशा निसर्गाने नटलेल्या अवघड जागी पुन:पुन्हा जावेसे वाटते.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा