गौताळा अभयारण्य माहिती | GAUTALA SANCTUARY INFORMATION IN MARATHI

गौताळा अभयारण्य माहिती | GAUTALA SANCTUARY INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “गौताळा अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच “GAUTALA SANCTUARY INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

गौताळा अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

आपल्याला गौताळा अभयारण्य पाहण्याकरता पुणे-औरंगाबाद प्रवास करावा लागतो. औरंगाबादपासून ३३ किलो मीटर असणाऱ्या कन्नड गावाच्या जवळच हे अभयारण्य आहे. कन्नड व सोयेगाव तालुक्यातील सुमारे ४०० हेक्टर्स परिसर गौताळा अभयारण्याने व्यापलेला आहे.

गुगल मॅप लोकेशन )

महाराष्ट्र शासनाने १९८५ साली या अभयारण्याची स्थापना केली. या वनाचा प्रदेश प्रामुख्याने पानझडी वृक्षांचे जंगल या नात्याने ओळखला जातो. या गौताळा अभयारण्यामध्ये खैर, धावडा, बांबू, बाभूळ अशा प्रकारची झाडे आहेत.

प्राणी संपत्ती

साहजिकच अभयारण्य म्हटले म्हणजे अस्वल, बिबट्या, वाघ अशा प्रकारचे बन्यपशूही आपल्याला दर्शन देतात. कालांतराने हेही स्थळ पर्यटकांचे आवडते ठिकाण होईल.

जसजसे वृक्षांची संख्या व इतर सुविधा वाढतील तसा इथला निसर्गही हवाहवासा वाटेल. एकंदरीत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रयत्नांनी नवनवीन अभयारण्याचा जन्म होईल. माणसाला आता निसर्गाची नितांत गरज आहे.

अस्वल

गौताळा अभयारण्य अस्वल

कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, नगर, अकोला, बुलढाणा, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, अमरावती या प्रदेशातील जंगलात अस्वल हा प्राणी दिसतो. याच्या अंगाचा रंग गडद मातकट व पाय मळकट पांढरे असतात.

याचे खाद्य म्हणजे निरनिराळ्या प्रकारची फळे, मुंग्या, वाळवी इत्यादी. उन्हाळ्यात वड, पिंपळ, उंबर, बेल, जांभूळ, आंबा ही फळे खायला मिळतात.

अस्वल झाडावरच्या पोळ्यातील मध खातो.पावसाळ्यात अस्वल आपले संरक्षण व्यवस्थित करतो. मोहाच्या झाडाची फुले अस्वलाला फार आवडतात.

महाराष्ट्रामध्ये दिसून येणाऱ्या अस्वलांचा समागमाचा काळ मार्च एप्रिल असतो. डिसेंबर ते जानेवारीत त्यांना पिले होतात. पिलांचे संगोपन मादी उत्तमरित्या करते. अस्वलाचे आयुष्य सुमारे चाळीस वर्षांचे असते.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा