हरिश्चंद्रगड माहिती मराठी | HARISHCHANDRAGAD IN MARATHI

हरिश्चंद्रगड माहिती मराठी | HARISHCHANDRAGAD IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “हरिश्चंद्रगड माहिती मराठी” म्हणजेच “HARISHCHANDRAGAD IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

ठिकाण

तीन मार्गांनी या गडावर जाता येते. पुणे-ठाणे-नगर या तिन्ही जिल्हयात हा किल्ला मोडतो.

कळसुबाई या सर्वात उंच असलेल्या शिखराच्या रांगेतच हरिश्चंद्र वसलेला आहे. या गडावर तीन मार्गांनी जाता येते. किल्ल्याचा विस्तार खूपच मोठा आहे. ( गुगल मॅप )

हरिश्चंद्रगड माहिती मराठी व रचना

दोन हजार वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली असावी. या गडावर दाट झाडी आहे.

दाट झाडीतून चालताना निसर्गाची खरी गंमत अनुभवायला मिळते. परिसर मोठा मोहक वाटतो. हा किल्ला चढायला अवघड आहे. पहिल्यांदा आपल्याला तारामती, रोहिदास अशी दोन शिखरे लागतात.

दक्षिणेस १३ कोनाडे आहेत. त्यात भगवान विष्णूची मूर्ती आढळते. देवळाच्या जवळच काही गुहा आहेत. सर्वात मोठ्या गुहेत आपल्याला ३ मीटर लांबीची गणपतीची मूर्ती आढळते.

देवळाभोवती तटबंदी घातलेली आहे. त्या तटबंदीच्या मध्यावर सुमारे ६०० ते ७०० वर्षांपूर्वी कोरलेले शिलालेख दिसतात. गडावर प्रमुख मंदिर हरिश्चंद्रेश्वराचे आहे.

या मंदिराच्या गाभार्याच्या बाहेरील बाजूस काही शिलालेख आढळतात. मंदिरातून बाहेर पडल्यावर एक ओढा वाहताना दिसतो.

ओढ्याच्या प्रवाहाच्या दिशेने आपण गेल्यास अदमासे १५ मीटर रुंद व तितक्याच लांब अशा गुहेपाशी आपण येऊन पोहोचतो.

या गुहेच्या बाहेरील दिशेस असलेल्या खांबावर अतिप्राचीन शैलीच्या देवनागरीत कोरलेले दोन शिलालेख आढळतात.

या ठिकाणी आपल्या छाती इतके पाणी आढळते. मध्यभागी एक चौरस आकाराचा ओटाव प्रचंड आकाराचे शिवलिंग आहे. असे सांगितले जाते की, सातशे वर्षापूर्वी वटेश्वर चांगदेव हे योगीराज इथे तपश्चर्येला बसायचे.

तत्त्वज्ञानसारविषयक एक चांगला ग्रंथ या ठिकाणी बसून त्यांनी पुरा केला. यांच्यानंतरही अनेक योगी या गडावर तपश्चर्येस यायचे.

हरिश्चंद्रगड हा एक सिध्दपीठ म्हणून बऱ्याच काळापासून प्रसिध्द आहे. पश्चिम दिशेच्या टेकाडानंतर १.६ कि.मी. अंतरावर एक अव्दितीय कडा आहे. हा कड़ा अंतर्गोल आहे हे त्याचे वैशिष्टच आहे.

भरगच्च झाडीमुळे हरिश्चंद्र हा मोठा ताण देखणा दिसतो. इतकी दाट झाडी अन्य गडांबर आढळत नाही.

हरिश्चंद्र गडावर जाण्याकरिता तीन मार्ग आहेत. ओतूरच्याजवळ खिरेश्वर नावाचे गाव आहे. तिथल्या मो रस्त्याने गेलो की खिंड चढून जाऊन आपल्याला गडावर जाता येते.

कोतुळकडून दकि टोलार खिंडीकडे जो रस्ता जातो तो माथ्याच्या जवळ चक्रेश्वरापासून येणाऱ्या रस्त्यासः मिळतो.

तिसरा मार्ग म्हणजे पाचनई नावाचे आदिवासींचे खेडे आहे. तेथूनच – आपल्याला गडावर जाता येते.

निरनिराळ्या ठिकाणी जाण्याकरिता बससेवा सुधारत आहे ही एक चांगली गोष्ट ज्याला निसर्गाची आवड आहे अशा निसर्गवेड्या माणसाने वेगळ्या वातावरणात जाण्याकरिता निश्चित हरिश्चंद्रगड पाहिला पाहिजे.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा