पृथ्वी बोलू लागली तर मराठी निबंध | PRUTHVI JAR BOLU LAGLI TAR ESSAY IN MARATHI

पृथ्वी बोलू लागली तर मराठी निबंध | PRUTHVI JAR BOLU LAGLI TAR ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “पृथ्वी बोलू लागली तर मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये PRUTHVI JAR BOLU LAGLI TAR ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • पृथ्वीची तक्रार
  • लोकसंख्यावाढीचा परिणाम
  • खनिजे, भूजल, रेती यांचा उपसा
  • लढायांमुळे निसर्गाचे नुकसान

पृथ्वी बोलू लागली तर मराठी निबंध | PRUTHVI JAR BOLU LAGLI TAR ESSAY IN MARATHI

खण खण खणताय मला! माझ्या पोटात मोठी यंत्रे घुसवता. मला पोखरता. कारण तुम्हांला माझ्या पोटातून रेल्वे न्यायची आहे. काहीजणांना उंच इमारतींसाठी पाया खोदायचा आहे.

तुमचे हेतू वाईट नाहीत. पण मला वेदना होतात. मी अशक्त बनत आहे. हळूहळू नष्ट होईन मी. अरे, हे काय चालले आहे? तुम्ही मला दणके देता. आघात करता. असे करताना तुम्हांला काहीच कसे वाटत नाही? खनिजे हवीत म्हणून खाणी खोदल्या. भूजलासाठी मला पोखरले, माझ्या देहात रेती उपसली.

मला खोदून खोदून दगड काढले. एवढे सगळे करून तुमची गरज काही संपत नाही. माझ्या अंगावर घाण, कचरा, प्लास्टिक, थर्माकोल प्रचंड प्रमाणात साठलंय. मला उबग आलाय या घाणीचा! पूर्वी

पाऊस पडला की माझ्यावरील मातीचा मोहक सुगंध यायचा. हल्ली तर श्वास घेणे कठीण झाले आहे. थांबवा हे सगळं! तुम्ही मला भूमाता म्हणता. परंतु स्वतःच्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी लढाया करता. त्या लढायांमुळे निसर्गाचे रूप बदलते. हवामान दूषित होते. हे अत्यंत घातक आहे.

प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येच्या निवाऱ्यांसाठी झाडे तोडली जातात. प्राणी मारले जातात. निसर्गातील अनेक गोष्टींची नासधूस केली जाते. त्यामुळे माझ्या शरीराचे तापमान वाढले आहे.

माणूस कसेबसे सहन करतो पण, प्राण्यांचे काय? त्यांचे हाल मला पाहवत नाहीत. आणि हो, असेच सुरू राहिले तर तुमचे काय होईल?

हे निबंध सुद्धा वाचा –