पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा | GAVAT BOLU LAGLE TAR MARATHI NIBANDH

पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा | GAVAT BOLU LAGLE TAR MARATHI NIBANDH – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये GAVAT BOLU LAGLE TAR MARATHI NIBANDH यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • बागेत फेरफटका
  • गवताची काळजी घेणे
  • गवताचे समजावणे
  • गवताचा जन्म माणसासाठी
  • फुले, कीटक यांना होणारा त्रास
  • मैदानावरील हिरवळ

पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा | GAVAT BOLU LAGLE TAR MARATHI NIBANDH

आज बागेत गेल्यावर चपला काढून हिरव्या गवतावर चालायला सुरुवात केली. तो स्पर्श अगदी हवाहवासा वाटला. तेवढ्यात गवतावर कोणीतरी जोरात पाय घासले. गवत तुटू लागले.

बागेत आला आहात ना? हळुवार पावले टाका. तुमच्या पायांखाली आम्ही पसरलो आहोत ना? अहो, इथे पाहा!

मी गवत बोलतेय!

तुम्ही सगळेजण बागेत फिरायला येता. आम्हांला पाहून आनंदित होता. आम्हांला खूप बरे वाटते. पण तुमच्यातील

काहीजण आम्हांला तुडवतात. तेव्हा आम्ही खूप दुखावतो. आमच्या अंगावरील रंगीबेरंगी फुले चुरगळतात. छोटे छोटे कीटक आमच्या अंगाखांद्यांवर सुखाने राहत असतात. ते कीटक चिरडले जातात. म्हणून आमच्या हिरव्यागार रंगाचा आनंद घ्या. मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावर आम्ही पसरलेलो असतो.

खेळाडूंना इजा होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतो. ती हिरवीगार मैदान तुम्हाला आवडत असतील. होय ना!

आम्ही जमिनीचा ओलावा टिकवून ठेवतो. जमिनीची धूप थांबवतो. अनेक सूक्ष्मजीवांना जगण्याचा आधार देतो. शाकाहारी प्राण्यांची भूक भागवतो आणि संपूर्ण परिसराला सौंदर्य बहाल करतो. म्हणून आम्हांला सांभाळणे तुमचे कर्तव्यच आहे!

हे निबंध सुद्धा वाचा –