मी पक्षी झाले तर मराठी निबंध | IF I BECOME A BIRD ESSAY IN MARATHI

मी पक्षी झाले तर मराठी निबंध | ESSAY ON IF I BECAME A BIRD IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “मी पक्षी झाले तर मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये ESSAY ON IF I BECAME A BIRD IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • एकटेपणाचा कंटाळा
  • मित्र-मैत्रिणी न भेटणे
  • निसर्गाचे दर्शन
  • प्रवासात तिकीट नको
  • पक्षी होण्याचे वरदान
  • स्वच्छंदी जीवन
  • खूप भ्रमंती
  • व्हिसा, पासपोर्ट नको

मी पक्षी झाले तर मराठी निबंध | IF I BECOME A BIRD ESSAY IN MARATHI

समजा, मला कधीकाळी देव भेटला आणि “काय हवे ते माग,” असे म्हणाला, तर मी क्षणाचाही विलंब न लावता

सांगेन, “देवा, मला पक्षी कर!”

पक्षी झाले, तर किती मजा येईल! दररोजच शाळेत जातानाचा त्रास सर्वप्रथम टळेल मी तर उडत उडतच शाळेत जाईन. वाहतूक कोंडी, रस्त्यावरचे खड्डे, सायकलवर बसून सायकल चालवण्याऐवजी तिला धरून धरून चालवत नेण्याचा त्रास हैे सारे टळेल. कुठे जायचे, तर रांगा लावा, तिकिटे काढा, महिना-महिना आधी तिकिटांची चिंता करीत बसा, हे सगळे सगळे नाहीसे होईल. आमच्या शेजारचा दादा शिक्षणासाठी परदेशी चालला होता, त्या वेळी पासपोर्ट व व्हिसा यांनी त्याचा जीव खाल्ला होता, हे असले त्रास तर नावालाही नसतील.

कुठे जायचे झाले, तर “इथे जाऊ का? तिथे जाऊ का?” अशा परवानग्या काढाव्या लागणार नाहीत. पंख पसरायचे आणि भरारी मारायची, हवी तिकडे, हवी तशी. कधी फांदीवर बसायचे, कधी झाडाच्या शेंड्यावर बसायचे, निवांतपणे सर्व परिसर डोळ्यात साठवायचा. तर कधी उंच, उंच थेट आभाळात जायचे. नेहमी नेहमी झाडावरच का बसायचे? ढगावर जाऊन

बसेन. काय बहार येईल! नुसती कल्पना करून पाहा.

हे विचार माझ्या मनात नेहमी येतात. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मी पक्षी झाले, तर शाळा कुठे असेल? मित्र कुठे असतील? वेगवेगळे खेळ खेळायचे कसे? हे कशाला? भाषा कोणती असेल? भाषा नसेलच. फक्त एकटी एकटीच आकाशात भरारत राहायचे! नको, नको. हे मात्र जमणार नाही. पक्षी होण्यापेक्षा मनुष्य म्हणून राहणे हेच चांगले !

हे निबंध सुद्धा वाचा –