मी शिक्षक झालो तर निबंध मराठी | IF I BECOME A TEACHER ESSAY IN MARATHI

मी शिक्षक झालो तर निबंध मराठी | IF I BECOME A TEACHER ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “मी शिक्षक झालो तर निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये IF I BECOME A TEACHER ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • कार्यक्रमांना प्रोत्साहन
  • आवडता तास
  • आवडते शिक्षक
  • कृतियुक्त अध्यापन
  • शिक्षक होण्याचे स्वप्न
  • मुलांना तणावमुक्त करणे
  • आनंददायी शिक्षण

मी शिक्षक झालो तर निबंध मराठी | IF I BECOME A TEACHER ESSAY IN MARATHI

आम्ही सगळे वर्गात धावतच शिरलो. दमलो होतो. घामाघूम झालो होतो. वर्गात वडके बाई येण्याची वाट पाहत बसलो. वडके बाई भूगोल शिकवतात. भूगोल शिकवताना राजस्थान असो की केरळ असो, वर्गात बसूनच त्या प्रदेशाच्या सफारीला जाऊन येतो. त्यामुळे भूगोल विषय शिकताना मजा येते. मला अनेक विषयांसाठी असे उत्तम शिक्षक लाभले. त्यामुळे मलाही वाटते मी शिक्षक व्हावे…

मला माहिती आहे, विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी खूप आदर असतो. हा आदर त्यांच्या मनात कायम राहावा, यासाठी वर्गात आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करीन. मुलांच्या मनात छोटे छोटे ताणतणाव असतात. त्यांना मोकळेपणाने बोलते करून तणावमुक्त करणे हे माझे सर्वांत महत्त्वाचे काम असेल.

मला आठवते, मी प्राथमिक शाळेत असताना मला गणिताच्या तासाला खूप ताण यायचा. हातचे घेताना घोटाळा व्हायचा. गणित चुकायचे. तीनअंकी, चारअंकी संख्यांचा गुणाकार करताना तर माझी दमछाक व्हायची. मी शिक्षक झालो, तर मला आल्या त्या अडचणी मी मुलांना येऊ देणार नाही. अडथळ्याच्या नेमक्या जागा शोधून त्या दूर करीन. गणितस्य कथाः रम्यः’ त्यांना सांगेन. कवितांचे रसग्रहण कसे करायचे, हे बारकाईने सांगेन. निबंध लिहायला शिकवीन. मुले आनंदाने शिकतील.

वर्गात कृतियुक्त अध्यापन पद्धतीचा वापर करीन. त्यामुळे विदयार्थी आनंदाने शिकतील. शैक्षणिक उपक्रम, क्षेत्रभेट, सहल, करमणुकीचे कार्यक्रम यामुळे विद्यार्थी मनाने खूप मोकळे होतात. आपला आत्मविश्वास वाढवतात. मी अशा कार्यक्रमांना नेहमी प्रोत्साहन देईन.

शिक्षक होणे हे माझे ‘स्वप्न’ आहे. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन.

हे निबंध सुद्धा वाचा –