जंजिरा किल्ला माहिती मराठी | JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI

जंजिरा किल्ला माहिती मराठी | JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “जंजिरा किल्ला माहिती मराठी” म्हणजेच “JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

जंजिरा किल्ला माहिती मराठी व ठिकाण

जंजिरा आज पर्यटकांच्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक झाला आहे.

या देखण्या किल्ल्याची ही तोंडओळख, हा जबरदस्त बेलाग जलदुर्ग रायगड जिल्ह्यात मुरूड गावाजवळ आहे.

पुण्यामुंबईहून रुपयांत राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांनी मुरुडला पोहोचता येते. ( गुगल मॅप )

पण या दुर्गाभोवती अद्यापही वेढा पडलाय तो रात्रंदिवस गरजणाऱ्या अथाग द्याचा.

किल्ल्याची रचना

पूर्वाभिमुख समुद्राच्या लाटांशी खेळणाऱ्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवरून किल्ल्यात प्रवेश होतो.

दरवाज्याच्या कमानीच्या वर एका पांढऱ्या दगडावर कोरून एक शिलालेख बसवलेला आढळतो. तो अरबी लिपीत आहे.

त्यातल्या योहोर था शब्दावरून ते बांधकाम इ.स. १६९४ मध्ये (११११ हिजरी सनात) झाल्याचे अनुमान काढता येते.

कमानीतून आत येताच उजव्या हाताला एक वाघाचे चित्र आहे.

त्याच्या चारही पायांत प्रत्येकी एक, शेपटीत एक अन तोंडात एक असे सहा हत्ती पकडलेले आहेत.

रायगडाच्या नगारखान्याच्या कमानीवर देखील असेच पाच हत्ती जेरबंद केल्याचे चित्र कोरले आहे.

हे चित्र उजवीकडील बुरुजाच्या भिंतीवर तर डावीकडील भिंतीवर एक सिंहीण व मागे वाघ असे चित्र कोरलेले आहे.

याशिवाय येथे काही अरबी लिपीतील शिलालेखही आहेत.

यानंतर समोरची देवडी उजवीकडे ठेवून दुसऱ्या कमानीतून किल्ल्यात प्रवेश करता येतो.

त्याच्या फळ्या अद्यापही शाबूत आहेत.

प्रवेशद्वाराजवळ लगेच उजवीकडे एक मंदिरासारखे बांधकाम आहे. पूर्वी तेथे रामपंचायतन होते असे मानतात. आता त्यास पंचायतन पीर’ म्हणतात.

तेथे कार्तिकी पौर्णिमेस (नोव्हेंबरात) जत्रा भरते. पूर्वी नबाबालर्फे त्या दिवशी गालिचाचे कापड त्यावर अंथरले जाई.

तेथून पुढे जाताच किल्ल्याच्या दक्षिण भागात एक प्रचंड तलाव आहे.

त्यातील पाणी वापरले जाते. याशिवाय किल्ल्यात वायव्येस आणखी एक तलाव आहे. दक्षिण तलावाला लागून एक इमारत आहे.

बालेकिल्ल्यात ६० मी. उंचीवर एक अतिभव्य, चार खणी बाडा आहे. त्याला सुरूलखानचा वाडा म्हणतात.

वारा, वादळ, ऊन पाऊस या जोडीला दुर्लक्ष व अव्यवस्था यामुळे याची अगदी दुर्दशा झालेली आहे.

याखेरीज गडावर काही पडिक इमारतीचे अवशेष, कबरी व काही जुन्या हिंदू शिल्पांचे अवशेष दिसतात.

किल्ल्याच्या चारही अंगांना असलेल्या तटबंदीस एकोणीस बुरूज आहेत.

प्रत्येक बुरुजाचा व्यास २५ मीटर असून तो १०-१५ मीटर उंचीचा आहे.

दोन बुरुजांमधील अंतर तीस मीटरहून कमी नाही. ऐन महाद्वाराचे वर असणाऱ्या बुरूजाचे माथ्यावर तीन अजस्र तोफा आहेत.

ध्वजस्तंभाचे शेजारील अतिभव्य तोफेचे नाव आहे ‘कलाल बांगडी.

तिच्या शेजारची चाबरी व तिगरी, ‘लांडा कासम. पैकी कलाल बांगडी तोफेच्या कानात दोन कड्या आहेत.

ती तोफ जंजिरा हस्तगत करण्यासाठी पेशव्यांनी आणली होती.

पण त्यात यश न आल्याने ती तशीच किनाऱ्यावर सोडून त्यांना जावे लागले. व नंतर सिद्दीने तिची येथे स्थापना केली.

उरलेल्या सर्व बुरूजांवर दोन ते सात तोफा आहेत म्हणजे सर्व मिळून किल्ल्यावर दीडदोनशे तोफा सहज आहेत.

वायव्येच्या बुरूजावरून शिवरायांच्या प्रेरणेने बांधला गेलेला पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ला दिसतो व पश्चिमेला दर्या दरवाजा आहे. तेथे काही थडगी आहेत.

तेथील धक्का हा भरतीचे वेळी देखील पाण्याखाली जात नाही. सिद्दीची अनेक पलायने या पश्चिम दरवाज्याने पाहिली आहेत.

जंजिरा व पद्मदुर्गाच्या तटबुरुजांकडे पाहिले असता एक गोष्ट प्रकनि डोळ्यात भरते.

ती म्हणजे जेथे लाटांचा मारा होतो, तेथे दगडी चिरे झिजून गेले आहेत, पण दर्जामधील चुना अजून शाबूत आहे.

पूर्वी किल्ल्यावर युरोपियन बनावटीच्या ७ पितळी तोफा होत्या. त्या आता नाहीत.

त्यांचे काय झाले असावे ते कळत नाही. सबंध किल्ला पाहवयाचा म्हणजे चारपाच तास सहज लागतात.

आता किल्ल्यात वस्ती नाही. पण मुरूडला इन्स्पेक्शन बंगला व हॉलिडे कॅम्प्स आहेत. तेथे अल्प खर्चात राहता येते.

ऐतिहासिक निर्देश – JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. राजापुरीच्या खाडीत ऐन तोंडावर एक बेट होते.

उसळणाऱ्या दर्यात होड्या लोटून मासेमारी करणाऱ्या कोळ्यांनी लुटारु चाच्यांपासून संरक्षण करण्यासाठी राजापुरीच्या शाही ठाणेदारांची परवानगी मागून त्या बेटावर एक मेटेकोट उभारला.

मेढेकोट म्हणजे मोठमोठे ओंडके जमिनीत एकापुढे एक रोवून बंदिस्त केलेली जागा.

राम पाटील हा त्या कोळ्यांचा म्होरक्या. त्या स्थानाचे महत्त्व कालांतराने त्यांच्या ध्यानी आले.

आणि त्याने राजापुरीच्या ठाणेदारालाच तिथे यायला प्रतिबंध केला. त्या कर्तव्यनिष्ठ सुभेदाराने बादशहाला कळविले.

पिरमखानची नेमणूक

निजामशहाने हा गुंता सोडवायला पिरमखान नावाच्या धूर्त सरदाराची नेमणूक केली.

त्याने सर्व स्थिती न्याहाळली अन शक्तीचा उपयोग होणार नाही हे जाणले.

एके दिवशी राम पाटलाकडे सांगावा गेला – एक दारुचा व्यापारी त्याची भेट घेऊ इच्छितो. राम पाटलाने त्याचे उत्तम स्वागत केले.

खूष होऊन त्या दारूच्या व्यापाऱ्याने राम पाटलाला अन् त्याच्या लोकांना उंची दारूच्या बाटल्या नजर केल्या.

हा स्नेह वाढतच राहिला. एके दिवशी त्या व्यापाऱ्याने हा मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

राम पाटलाने ती मान्य केली, दिवस कलला आणि ती गलबते मेढेकोटास आणून लावली गेली.

रात्री राम पाटील आणि मंडळांनी यथेच्छ मदिरापान केले आणि ते त्या नशेत बेहोष होऊन गेले.

आता पिरमखानाने आपले खरे स्वरूप उघडे केले.

सारी मंडळी कापून काढली आणि मेदेकोटावर ताबा मिळवला.

बुन्हाणखान

पिरमखानच्या मृत्यूनंतर त्या जागी बुन्हाणखान आला. हा मूळचा अ‍ॅबिसिनीयातला हबशी. काळा, दणकट प्रकृतीचा आणि डोकेबाज, त्याने बादशहाची परवानगी मिळविली.

इ.स.१५६७ ते १५७१ या कालखंडात त्याने एक बुलंद जलदुर्ग आकारास आणला.

बुन्हाणने नामकरण केले, जंझीरे मेहरुब’, जंजिरा हा शब्दत्यात आला आहे.

जंझीराया अरबी शब्दावरून त्याचा अर्थ बेट व मेहराब म्हणजे चंद्रकोर.

ठळक वैशिष्टये

इ.स. १६१७ मध्ये सिदी अंबर बादशहाकडून स्वतंत्र जहागिरीची सनद घेऊन आला. जंजिऱ्याच्या सिद्दी घराण्याचा हा मूळ पुरुष पुढे जुन्नर प्रांती महाराष्ट्राचा स्वातंत्र्यसूर्य उगवला.

१६५६ पर्यंत पुरंदराभोवती वावरणाच्या शिववाने जावळीच्या चंद्रराव मोरे पाडाव केला.

राज्य कक्षा रुंदावली, रायरी, भोरप्या, वासोट्यासारखी बुलंद ठाणी स्वराज्यात मोडू लागली. १६५७ च्या जुलैत रघुनाथ बल्लाळ सबनीस आणि निळोपंतांची रवानगी जंजिन्याकडे झाली. दंडा राजापुरी पर्यंत धडक बसली.

पण सिद्दी जंजिऱ्यात सुखरूप राहिला अन ही पहिली मोहिम अपयशी झाली. राजे खटू झाले.

पण निराशा माहित नसलेल्या या राजाने पुन्हा १६५९ मध्ये खुद्द पेशव्यांना शामराव निळकंठाना जंजिऱ्यावर पाठविले.

सिद्दीने घ्यायल्याचे सोंग आणले. पेशवे स्वतः जातीने तहाची बोलणी करण्यास जंजिऱ्यात दाखल झाले आणि शामराव नीळकंठांना सिद्दीने विश्वासघाताने कैद केले.

पुन्हा वाटेस जाणार नाही या अपमानास्पद अटीवर त्यांची सुटकाही झाली. पण ती गोष्ट शिवाजीमहाराजांच्या मनास लागून राहिली. त्यानी नरहरी आनंदराबांची पेशवेपदी नेमणूक केली.

अन त्यानंतर वर्षभरात मोरोपंतांची नेमणूक पेशवे पदावर झाली.

१६६९ त खुद्द मोरोपंत पेशवे दंडा राजापुरीपावेत आले. जंजिन्याच्या वायव्येस अवध्या ३ कि.मी. वरील एका खडकाळ बेटावर ( त्याचे नाव कासा ) एक जलदुर्ग उभारला. अन् नाव ठेवले पट्टदुर्ग.

सर्व बाजूंनी सिद्दीची नाकेबंदी झाली. सिद्दी पुरा कोंडला गेला. सिद्दी फत्तेखानाने बिनशर्त शरणागती पत्करावयाचे ठरविले. इतकी वर्ष हुलकावणी दिलेला हा बलदंड किल्ला स्वराज्यात सामील होणार इतक्यात सिद्दी संबूळ सिद्दी कासीम व सिद्दी खैर्यत यांनी सिद्दी फत्तेखानालाच कैदेत टाकले.

दिल्लीपती औरंगजेबाचे स्वामित्व मान्य करुन त्याची मदत मागविली अन हे एक स्वप्न हवेत विरले. १६७२ ची गोष्ट. मार्च महिन्यातले दिवस.

होळीपौर्णिमिच्या रात्री पद्मदुर्गावरचे सारे सैनिक दारु पिऊन बेहोष झाले होते. सिद्दीने डाव साधला. पद्मदुर्गदिखील सिद्दीच्या ताब्यात गेला. महाराजांच्या मनी हे शल्य डाचत राहिले.

१६७५ च्या साली मोरोपंतांनी पुन्हा एकदा जंजिऱ्यावर मोर्चा वळवला.

ऑगस्ट महिन्यातले दिवस. काळीकुट्ट रात्र. उफाळलेला द्या नेहमीप्रमाणे जंजिन्याच्या तटबंदीशी धडका देत होता. त्या भयाण रात्री चार दोन होड्या जंजिऱ्याच्या तटाला भिडल्या.

बरोबरच्या शिड्या तटाला लावल्या. तटाला लावलेल्या शिड्यांवरून सैन्य वर जाणार होते.

एक तुंबळ युद्ध होणार होते. सिद्दीचा काटा नाहीसा होणार होता.

पण… मोरोपंतांची माणसे तिथवर येऊच शकली नाहीत. प्रहर दोन प्रहर वाट पाहून त्या होड्या अन शिड्या परत किनाऱ्यावर आल्या. १६७८ च्या जुलैत पुन्हा एकदा जंजिऱ्यावर स्वारी झाली.

दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला होता. राजे सिंहासनाधिष्ठित झाले होते. बळही वाढले होते. आरमार आकाराला आले होते.

सिंधुदुर्गसारख्या शिवलंकेने त्याची शोभाही वाढली होती. पण हा जंजिरा तेथे हरप्रयले उपाय करुन देखील हात टेकावे लागत होते. १६७८ त्या या स्वारीत खुद्द राजे जातीन सामील झाले होते.

पश सिद्दी कासीम गलबतातून मुंबईस पळाला. तेथून पोर्तुगीजाच मदत मिळविली. राजांच्या प्रयत्नांवर पाणी पहले. सिद्दी जंजिऱ्यात सुरक्षित राहिला.

१६७८ च्या डिसेंबरात याचीच पुनरावृत्ती झाली.

संभाजी राजे

शिवरायांनंतर संभाजी राजे गादीवर आले. त्यांनी इ.स. १६८२ मध्ये दादजी रघुनाथांना जंजिऱ्यावर पाठवले. त्यांनी महिनाभर लढा दिला.

दर्यासागर दौलतखानच्या दीडशे गलबतांच्या आरमाराचाही उपयोग होत नाही हे पाहून संभाजी राजे स्वतः जातीने तेथे आले वीस हजार फौजेला दाद न देता सिद्दी कासीम जंजिरा शनि लढवित होता.

संभाजी राजे संतापले. त्यांनी हुकूम दिला, ” राजापूर चा डोंगर फोडा.

44 ही (अवधी आठशे मीटर रुंद अन तीस मीटर खोलीची) टीचभर खाड़ी बुजवून टाका. समुद्रातला जंजिरा मग आपल्या पायदळाचे सहाय्याने जिंकून घेऊ.” झाले, सारे कामाला लागले.

अर्धी अधिक खाडी बुजवूनहींटाकली. जंजिऱ्याचा स्थलमार्ग तयार होऊ लागला.

पुन्हा एकदा हा बुलंद दुर्ग स्वराज्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली. पण…

दिल्लीपती आलमगिरीची स्वारी स्वराज्यावर चाल करुन आली. स्वराज्याचे दुर्दैव आड आले. हा डाव अर्धवट टाकून छत्रपती संभाजी महाराजांना निघून जावे लागले.

मग या दिल्ली पतीच्या वावटळीत स्वराज्याचे दोन छत्रपती गेले. ताराराणीने होते स्वराज्य राखले. पुढे शाहूची सुटका झाली.

तो वेळेपर्यंत जंजिरा जिंकणे तर राहू द्याच पण खुद्द स्वराज्याची राजधानी, तख्तची जागा किल्ले रायगड इस्लामगड बनून सिद्दीच्या ताब्यात गेला होता. इ.स. १७१६ मध्ये कान्होजी आंग्रे अन पेशवे यांनी संयुक्त मोहिम काढली.

पुन्हा एकदा अपयश पदरी घेऊन तिची समाप्ती झाली. पुढे १७४६ साली नानाजी सुर्वेने सिद्दीलाच ठार केले. सिद्दी रहमान घाबरला.

आपल्या ताब्यातील बारा महालांपैकी सहा महाल त्याने पेशव्यांना दिले.

पण जंजिरा त्यांच्याकडेच राहिला. इ.स. १७६१ मध्ये पुन्हा एक स्वारी पेशव्यांनी केली पण यश काही आले नाही.

नाना फडणिसांनी देखील जंजिरा जिंकून घेण्याचे प्रयत्न केले.

सिद्दीचा वारस बाळूमिया यालाच आपल्या बाजूस वळवून घेतले. सिद्दी अब्दूलनंतर बाळूमियाला डावलून सिद्दी जोहर गादीवर आला.

हा काटा स्वराज्याचे साम्राज्य झाले तरी सलतच राहिला.

जंजिरा किल्ला माहिती मराठी JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI खालील किल्ल्यांबद्दल सुद्धा माहिती वाचा.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा