जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती | JAYAKWADI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI

जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती | JAYAKWADI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती” म्हणजेच “JAYAKWADI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

जायकवाडी अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठणपासून ३ किलोमीटरवर आहे. शेवगाव (जिल्हा अहमदनगर) पासून जायकवाडी ४० किलोमीटरवर आहे. औरंगाबादपासून ८० किलोमीटरवर आहे.

गुगल मॅप लोकेशन )

पुण्यापासून जायकवाडी पक्षी अभयारण्य ३१० किलोमीटर वर आहे. पैठणजवळ जायकवाडी येथे एक प्रचंड धरण आहे. या घरणाचे काम १८ ऑक्टोवर १९६५ रोजी सुरू झाले व १९७५ मध्ये पूर्ण झाले.

नाथसागर जलाशय २४ फेब्रुवारी १९७६ मध्ये इंदिराजी गांधी यांच्या हस्ते राष्ट्रास अर्पण करण्यात आला.

नाथ सागराचा परिसर ४५० चौरस किलोमीटर पसरलेला आहे. या नाथरसागरास ४५ किलोमीटरचा रम्य किनारा लाभलेला आहे. हिवाळ्यात पक्ष्यांच्या मोठया संख्येने येथील परिसर मोहक दिसतो.

या ठिकाणी पक्ष्यांच्या रक्षणासाठी १३ नोव्हेंबर १९८६ रोजी महाराष्ट्र शासनाने जायकवाडी पक्षी अभयारण्याची स्थापना केली.

नाथसागरचा परिसर १० किलोमीटर रुंद व ४५ किलोमीटर लांब आहे. येथील धरणामध्ये १०० हजार दशलक्ष पाण्याचा. साठा आहे. पाण्यामध्ये जलवनस्पती, लहान-मोठ्या आकाराची मासोळी, खेकडे, गांडूळ तसेच विविध जलजीवांची निर्मिती भरपूर प्रमाणात होते. या ठिकाणातील सर्व परिसर सुंदर आहे.

निसर्ग व प्राणी, पक्षी संपत्ती

या ठिकाणी आपल्याला पक्ष्यांचे दर्शन अथवा निरीक्षण करावयाचे असल्यास पहाटे पहाटे जायला हवे. विविध प्रकारचे पक्षी व त्यांच्या दैनंदिन व्यवहारातल्या गमतीशीर हालचाली आपल्याला पाहयला मिळतात.

पाणी उडवणे, सूर मारणे, मासे पकडणे, मासे खाणे, कीटक पकडणे, हवेत गिरक्या घेणे, चोचीतील मासा एक टक पाहणे, माशाचा मोठ्या खुबीने पाठलाग करणे, शीळ घालणे अशा प्रकारच्या सर्व क्रिया आपल्याला पाहयला मिळतात.

वनक्षेत्रामध्ये विविध प्रकारचे वन्य प्राणी आहेत. उदा. रानमांजर, उदमांजर, पाणमांजर, देवर, मुंगूस इत्यादी. सरपटणारे प्राणी आहेत. उदा- साप, नाग, अजगर, घोरपड, सरडे, खारी इत्यादी.

अशा प्रकारचा आगळा वेगळा निसर्गातील अनुभव घेण्यास जायकवाडीस एकदा तरी जावे व या ठिकाणातील आनंद घ्यावा. निसर्ग आपल्या जीवनास हातभार लावतो. निसर्ग जिवंत ठेवण्याचे काम वन्यपशु, पक्षी, वृक्ष, वेली, झाडी करतात. या पक्षी अभयारण्यातले मनाला संतोष देणारे ठिकाण म्हणजे येथील ज्ञानेश्वर उद्यान.

३१० एकर जागेत या भव्य उद्यानाची सुंदर रचना करण्यात आली आहे.

पर्यटकांचा विचार प्रामुख्याने केलेला जाणवतो. शेकडो वृक्ष, निरनिराळ्या वेली, रंगीबेरंगी आकर्षित करणारी फुलझाडे, पाण्याची कारंजी, जलकुंड, घबधवे अशा अनेक गोष्टी पाहवयास मिळतात.

या भव्य उद्यानाचे अभ्यासपूर्वक चार भाग केले आहेत. फुलोद्यान, फलोद्यान, निसर्गोद्यान व आध्यात्मिक शांती देणारे उद्यान अशी त्यांची नावे आहेत.

दमलेला पर्यटक या ठिकाणी आला की शांत वाटते.

या अभयारण्याला भेट देण्यास नोव्हेंबर ते मार्च हा खऱ्या अर्थाने उत्तम काळ आहे.

आपल्या ज्ञानात नव्याने भर पडण्यासाठी एकदा तरी अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा