कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती | KARNALA BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI

कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती | KARNALA BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती” म्हणजेच KARNALA BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती व ठिकाण

कर्नाळा हे अभयारण्य मुख्यत: पक्ष्यांकरता विकसित केलेले पक्षी अभयारण्य आहे. निसर्गप्रेमींना तसेच पक्षिमित्रांना कर्नाळा येथील पक्षी अभयारण्य म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी आहे. विशेषतः पुणेकर व मुंबईकर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येतात व या ठिकाणी असलेल्या विविध पक्ष्यांचे निरीक्षण करतात.

गुगल मॅप लोकेशन )

पुणे-पनवेल गाडी पकडावयाची व पुढे पनवेल पासून १२ किलोमीटर असलेले हे ठिकाण पाहयचे. मुंबईपासून ६० किलोमीटरवर असलेले हे ठिकाण मुंबईकर शनिवार- रविवार साधून मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. इसवी. सन १९६९ मध्ये महाराष्ट्र शासनने कर्नाळा अभयारण्याची स्थापना केली. या ठिकाणच्या पक्ष्यांबद्दल सांगायचे झाले तर मुंबई नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या सखोल अभ्यासक सौ. शैलजा ग्रब यांनी येथे आढळणाऱ्या सुमारे १५० पक्ष्यांची अभ्यासपूर्वक नोंद केली आहे.

पर्यटन

या ठिकाणी पर्यटक आला की जवळचा असलेला कर्नाळा किल्ला त्याचे लक्ष वेधून घेतो. कर्नाळ्याचा सुळका १६० फूटाहून अधिक उंच असल्याकारणाने तो बऱ्याच लांबूनही आपल्याला दिसतो. गो. नी. दांडेकर, ना. धो. महानोर, मोहन आगाशे, जब्बार पटेल यांचा’ जैत रे जैत’ चित्रपट अशा कितीतरी गोष्टींचे स्मरण होते. कर्नाळा अभयारण्य पर्यटकांना पाहयला किमान दोन दिवस हवेत. आपल्याबरोबर एखाद्या पक्ष्यातील जाणकार असेल तर आपल्या ज्ञानात बरीच भर पडते, पक्ष्यांव्यतिरीक्त आपल्याला निरनिराळे मोठाले वृक्ष, रंगीबेरंगी रंगाची विविध फुले, धूळ उडवणारी पायाखालची लाल माती अशा कितीतरी गोष्टी अनुभवायला मिळतात.

अलीकडे बरेच पक्षिमित्र अशा स्थळांना भेटी देऊन तरुणांना माहिती देण्याचा प्रयत्न करताना आढळतात. कर्नाळा अभयारण्यात महाराष्ट्र शासनाने राहण्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे.

पनवेलला या ठिकाणच्या आरक्षणाची सोय आहे. थंडीच्या दिवसात या ठिकाणी जाण्यास व येथील समृद्ध निसर्गाची मनसोक्त मजा लुटण्यात एक वेगळाच आनंद असतो.

निसर्ग व प्राणी, पक्षी संपत्ती

कोतवाल या आक्रमक पक्ष्यासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. कोतवाल पक्ष्याच्या विविध जाती आपल्याला पाहवयास मिळतात. मोर, पोपट, भारद्वाज, धनेश, बदक, कावळा, तितर, कोतवाल, भृंगराज, नर्तक, खंड्या, पावशा, सातभाई असे अनेक पक्षी आपल्याला मिळतात.

याचे कारण म्हणजे निसर्गाचे वरदान व या ठिकाणी असलेली शासनाची व्यवस्था यामुळे हजारो पर्यटकांना येणे सुखकर झाले आहे. हे अभयारण्य गारमाळ, वानरटोक, सरडामाळ या टेकड्यांच्या कुशीमध्ये विकसित केलेले आहे.

ससा

ससा हा प्राणी सर्वांनाच आवडतो. त्याचा पांढरा रंग, गुबगुबीत शरीर व उभे कान यामुळे हा प्राणी आकर्षक दिसतो. पूर्णपणे वाढलेल्या सशाची लांबी १७ ते १९ इंच असते.

काहींचा रंग तांबटसर मातकट असतो. त्यामध्ये काळपट रंग पसरल्यासारखा असतो. याचे शेपूट तांबटसर असते. टोकाकडे काळसर असते. मान, छाती वहात पाय तांबटसर असतात.

८००० फूटावरही ससा हा प्राणी आरामात राहू शकतो. आपल्या येथे ससे लागवडीखालच्या प्रदेशात आढळतात. ससा या प्राण्याचे शत्रू म्हणजे रानमांजर, मुंगूस, कोल्हा, कुत्रे इत्यादी असतात.

जंगलातदेखील ससे मोठ्या प्रमाणावर असतात. ससे गवतात लपून बसल्यावर सहसा ओळखता येत नाहीत.

ससे लपून राहण्यास खळग्याचा उपयोग करतात. याला हिरवे गवत खाण्यास फार आवडते.

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सशाच्या विणीचा हंगाम असतो. गर्भ- धारणेचा काल साधारण एक महिनाभर असतो.

एका वेळेस एक अथवा दोन पिले होतात. जन्मल्यानंतर ती साधारण बारा तासातच हालचाल करतात.

सदाहरित जंगले

महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, आंबोली या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या ठिकाणी सदाहरित अरण्ये आहेत.

या भागात आपल्याला विशेषतः अंजनी, हिरडा, अंबा, चिंच, शिसव, महागनी, साल, मागचाफा, जांभूळ, पिसा इत्यादी प्रकारचे वृक्ष दिसून येतात.

या प्रदेशातील जंगले वर्षभर हिरवीगार व घनदाट असतात. या दिकाणील मोठ मोठाले वृक्ष हिरव्या गार पानांनी सतत बहरलेले असतात.

घनदाट आरण्यात उन्हाळा देखील सुखद जातो.

१) पानझडी वृक्षांची अरण्ये

वर्षाच्या काही काळामध्ये हिरवीगार दिसून येणारी जंगले सह्याद्रीच्या कुशीत सदाहरित जंगलाच्याखालच्या पट्यामध्ये आपल्याला आढळून येतात. कोल्हापूर येथील चांदघर, साताऱ्यातील कोयनेचे जंगल तसेच कुलाबा या ठिकाणी दिसून येतात.

अशा प्रकारच्या जंगलामध्ये दिसणाऱ्या वृक्षांबरोबर हिरडा, बेहडा, किडाल, कवठ, जांब अशासारखे ठराविक काळामध्ये पाने जाणारे वृक्ष व झाडे देखील असतात.

अशा ठिकाणी वन्यप्राण्याचे प्रमाण झडून कमी असते.

२) पानझडी वृक्षांची साधारण हिरवी जंगले

या प्रकारची जंगले आपल्याला सह्याद्रीच्या उतरणीवर ज्या ठिकाणी १५०० ते २००० मि.मी. इतका पाऊस पडतो. अशा ठिकाणी आढळतात. कुलाबा, रत्नागिरी, ठाणे, नाशिक या जिल्ह्यात व चंद्रपूर, भंडारा या ठिकाणी दिसतात.

या ठिकाणी बेहडा, धावडा, शिसव, साग, मोह, ऐन अशा प्रकारची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

३) पानझडी वृक्षांची सुकी जंगले

नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, मेळघाट, भंडारा, यावल या भागामधील जगलेया प्रकारात मोडतात. ह्या भागात पावसाचे प्रमाण बरेच कमी आढ़ळते. या जगलात धावडा, साग, ऐन, सलाई, बीबा, लेंडीया, मोह, मोवीन याप्रकारचे व अन्यही वृक्ष दिसून येतात.

पुणे, सातारा, अहमदनगर, धुळे, जळगाव व सोलापूर है प्रदेश उष्ण कटिबंधात येत असल्याने या जिल्ह्यात खुरट्या झुडपांची जंगले आपल्याला दिसून येतात.

या ठिकाणी विशेषतः बाभूळ व बोरी असतात.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा